बिग बॉसच्या तेराव्या सीझनमधील स्पर्धकांमध्ये अंतिम फेरीमध्ये पोहचण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. याशिवाय पारस छाब्रा व शहनाज गिल यांच्यात जवळीकता वाढताना दिसते आहे. काही दिवसांपूर्वी पारसची गर्लफ्रेंड आकांक्षा पुरीने सर्वांसमोर येऊन जे वक्तव्य केलं ते ऐकून सगळे चकीत झाले होते. आता तर आकांक्षाने शहनाजवर खूप मोठा आरोप केला आहे.


आकांक्षाने एका मुलाखतीत शहनाजला डेस्परेट असं संबोधलं. तसेच ती अटेंशन मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते असं तिने शहनाजवर आरोप केले. 


IWM BUZZ शी बोलताना आकांक्षा म्हणाली की, सर्व ऑनलाईन हेटर्स जे पारसचे नाव घेऊन आरडाओरड करत आहेत, त्यांनी नाण्याची दुसरी बाजू का पाहत नाही. या गोष्टी दोन्ही बाजूने आहेत का?


ती पुढे म्हणाली की, शहनाज व महिरादेखील पारससोबत गेम खेळत नाहीत का? त्यांनी देखील एका मुलाच्या चादरीत जाण्यापूर्वी एकदाही विचार का केला नाही? 
आकांक्षा शहनाजबद्दल म्हणाली की, ती खूप डेस्परेट आहे जी अटेंशन मिळवण्यासाठी काहीही करेल. 


तर माहिराबद्दल आकांक्षाने सांगितलं की, ती खरंच स्मार्ट प्लेअर आहे आणि तिच्या व पारसच्या कनेक्शनशी मला काहीच प्रॉब्लेम नाही.


 पारस व आकांक्षा बऱ्याच कालावधीपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही सोशल मीडिया अकाउंटवर एकत्र फोटो शेअर करत असतात.

पारसने आपल्या हातावर आकांक्षाच्या नावाचा टॅटूदेखील बनावला आहे. आकांक्षाला जेव्हा पारसच्या हातावर बनवलेल्या टॅटूबद्दल विचारलं तर तिने सांगितलं की, त्याने खूप स्मार्ट पद्धतीने आपल्या हातावरील टॅटू बेस्ट फ्रेंड फॉरेव्हरच्या बॅण्डच्या मदतीने लपविला आहे. पारसने यावर्षी १२ फेब्रुवारीला टॅटू बनवला होता. आमच्या रिलेशनशीपला अॅनिव्हर्सरीला पारसने हा टॅटू मला गिफ्ट केला होता. 


पारसने बिग बॉसच्या घरात आकांक्षाबद्दल सांगितलं की, ती खूप इमोशनल आहे. मी जेव्हा तिच्यासोबत ब्रेकअपबद्दल बोलतो तेव्हा ती रडू लागते.

Web Title: Bigg Boss 13: Bigg Boss 13 Paras Chhabra Girlfriend Akaksha Puri Talk About Mahira Sharma And Shehnaz Gill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.