ठळक मुद्देदेवयानी फेम अभिनेत्री शिवानी सुर्वेने बिग बॉसचे आदेश धुडकावून लावले आहेत. स्ट्राँग कंटेस्टंट मानल्या जाणाऱ्या शिवानीने आता थेट बिग बॉसलाच धमकी दिली आहे.शिवानीने बुधवारी (12 जून) प्रसारित झालेल्या भागात 'मला घरातून बाहेर काढा नाहीतर मी बिग बॉसवर कारवाई करेन' असं म्हटलं आहे. 

मुंबई - बिग बॉस मराठीचा दुसरा सीझन घरातील भांडणांमुळे जास्त चर्चेत आला आहे. मैत्री, प्रेम, वाद-विवाद, भांडण, नॉमिनेशन टास्क अशा सर्वच गोष्टी घरात पाहायला मिळत आहेत. सर्व स्पर्धक बिग बॉसने दिलेल्या आदेशाचं आवर्जून पालन करतात. मात्र देवयानी फेम अभिनेत्री शिवानी सुर्वेने बिग बॉसचे हेच आदेश धुडकावून लावले आहेत. स्ट्राँग कंटेस्टंट मानल्या जाणाऱ्या शिवानीने आता थेट बिग बॉसलाच धमकी दिली आहे. शिवानीने बुधवारी (12 जून) प्रसारित झालेल्या भागात 'मला घरातून बाहेर काढा नाहीतर मी बिग बॉसवर कारवाई करेन' असं म्हटलं आहे. 

बिग बॉसच्या घरात शिवानी नेहमीच इतर स्पर्धकांशी भांडताना दिसली. महेश मांजरेकरांनी शिवानीला रागाला आवर घालण्याचा सल्ला दिला होता. मात्र आता तिने थेट बिग बॉसशी पंगा घेत त्यांनाच कायदेशीर कारवाई करेन अशी धमकी दिली आहे. बिग बॉसच्या घरात होणारी भांडणं आणि येणारा राग यामुळे मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्यावर परिणाम होत असल्याचं शिवानीने म्हटलं आहे. घरातून बाहेर काढण्यासाठी शिवानी वारंवार बिग बॉसला विनवणी करत आहे. पण बिग बॉसने तिचे म्हणणे ऐकले नसल्याने तिने आता घरातील नियम न पाळण्याचं ठरवलं आहे. 

'बिग बॉस जोपर्यंत मला कनफेशन रूममध्ये बोलावणार नाही तोपर्यंत मी माईक घालणार नाही. कोणताही टास्क खेळणार नाही' असं शिवानीने म्हटलं आहे.  तसेच  बिग बॉस कोणत्याही स्पर्धकाला त्याच्या इच्छेविरोधात इथे थांबवून ठेवू शकत नाहीत. त्यांनी असं केलं तर मी कोर्टात जाईन अशी धमकीच थेट शिवानीने दिली आहे. शिवानीच्या अशा प्रकारच्या वागण्यामुळे घरातील इतर स्पर्धकांनी तिला असं न करण्याचा सल्ला दिला. तसेच समजावून सांगितलं. मात्र शिवानी कोणाचंही ऐकत नाही. 

बिग बॉसच्या घरात बुधवारी हा संपूर्ण प्रकार झाल्यावर मध्यरात्री दोन वाजता बिग बॉसने शिवानी आणि नेहाला कनफेशन रुममध्ये बोलावले. शिवानीला तिचे म्हणणे मांडण्याची संधी दिली. त्यावेळी तिने बिग बॉसच्या घरातून तिला बाहेर काढावं असं बिग बॉसला सांगितलं. शिवानीने याआधी घरामध्ये कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे बिग बॉसने कायद्याच्या चौकटीतच राहून निर्णय होईल असं सांगितलं. मात्र यानंतर लगेचच शिवानीने राग अनावर झाल्याने चुकून असं बोलून गेल्याचं सांगितलं. तसेच आर्थिक अडचण असल्याचं सांगितलं. मित्र-मैत्रिणीकडून पैसे उधार घेऊन या कार्यक्रमात आल्याचं तिने सांगितलं. कायदेशीर कारवाई परवडणार नाही. आणखी काम करायचं आहे. त्यामुळे कायद्याच्या मार्गाने न जाता आपण सामोपचाराने मार्ग काढावा अशी विनंती शिवानीने बिग बॉसला केली आहे. 

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातली सर्वाधिक स्ट्राँग कंटेस्टंट मानल्या जाणाऱ्या देवयानी फेम अभिनेत्री शिवानी सुर्वेने आपली संघर्षकथा काही दिवसांपूर्वी बिग बॉसमध्ये संपूर्ण महाराष्ट्रासमोर पहिल्यांदाच मांडली होती. दोन वेळच्या जेवणापासून ते समुद्रापासून 15 मिनीटांच्या अंतरावर घर घेऊन आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेला संघर्षमयी आणि प्रेरणादायी प्रवास शिवानीने बिग बॉसमध्ये सगळ्यांना सांगितला. मुळची चिपळूणची आणि लहानाची मोठी डोंबिवलीत झाली. 'एकवेळ अशी आली की, जेव्हा घरात खायचे पैसे नव्हते. कित्येकदा माझ्या लहान बहिणीला पार्ले-जीच्या पुड्यावर अख्खा दिवस काढायची वेळ आलीय. तेव्हा वाण्याकडून सामान आणताना अपू-या पैशाअभावी दहा रूपयाची डाळ, दहा रूपयाचे तांदूळ आणि दहा रूपयाचे तेल आणावे लागायचे. तेवढेच पैसे कसेबसे असायचे. त्यावेळी मी ठरवलं, की घरच्यांसाठी काहीतरी करायचं. आणि आज मला अभिमान आहे की, मी वयाच्या 16 वर्षी गाडी घेतली आणि सतराव्या वर्षी आईचे समुद्रापासून 15 मिनिटांवर स्वत:चं घर घ्यायचं स्वप्न पूर्ण केले' असं शिवानीने म्हटलं होतं. 

बिग बॉस मराठीच्या घरात आता हा सदस्य बनलाय ज्योतिषी... सांगतोय स्पर्धकांचे भविष्य

'बिग बॉस मराठी'चे घर हे अत्‍यंत अनपेक्षित आहे आणि तेथील स्‍पर्धक काय करू शकतात हे कोणी काहीच सांगू शकत नाही. या घरात प्रवेश केल्यापासून प्रत्येकजण या कार्यक्रमात टिकून राहाण्यासाठी आपल्यापरिने प्रयत्न करत असतो. बिग बॉस मराठी सुरू झाल्यापासून सगळेच स्पर्धक प्रेक्षकांचे लाडके बनले आहेत. पण त्यातही अभिजीत बिचुकलेला खूपच चांगले फॅन फॉलोव्हिंग मिळाले आहे. बिग बॉस मराठीच्या घरात आता अभिजीत बिचुकले एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण तो आता घरातील स्‍पर्धकांचे आता भविष्‍य सांगायला लागला आहे. वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये अभिजीत बिचुकले शिव ठाकरे आणि वैशाली माडेसोबत गप्पा मारताना दिसत आहे. गप्पांच्या ओघात तो या दोघांना सांगतो की, त्याला हस्‍तरेखा पाहून भविष्‍य सांगता येते. हे ऐकून शिव उत्‍सुक होतो आणि बिचुकलेला त्‍याच्‍या हस्‍तरेखा वाचण्‍यासाठी सांगतो.

काय म्हणता, बिग बॉस मराठीच्या घरात जाणार Ex Contestant सई लोकुर?

अभिनेत्री सई लोकुर ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात स्पर्धक होती. ती घरात शंभर दिवस राहून ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचली होती. आता पुन्हा एकदा सई ‘बिग बॉस मराठी’च्या घरात डोकावत आहे. पण ह्याचा अर्थ ती बिग बॉसच्या घरात जाणार नाही आहे. तर बिग बॉसच्या घरातल्या रोजच्या घडामोडींवर बारकाईने लक्ष घालून त्यावर भाष्य करणारा ‘एक घर बारा भानगडी’ हा शो ती मराठी बॉक्स ऑफिस वर घेऊन आलीय. याविषयी अभिनेत्री सई लोकुर म्हणते, “हा शो सुरू झाल्यापासून मला सोशल मीडियावरून माझ्या चाहत्यांचे सतत मेसेजेस येत होते. मी हा शो पाहते का, मला यातल्या स्पर्धकांविषयी काय वाटतं, ह्याविषयी ते जाणून घेऊ इच्छित होते. त्यामूळे माझी मतं सांगणारा हा शो मी घेऊन आलीय. या शोचं वैशिष्ट्य आहे, की, बिग बॉसच्या स्पर्धकांविषयी माझी परखड मत मी इथे मांडतेय, पुन्हा एकदा बिग बॉसशी या शोमुळे मी अप्रत्यक्षपणे जोडली गेलीय, याचा मला आनंद आहे.”

 


Web Title: Big Boss Marathi 2 shivani surve wants to leave the house immediately
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.