Actress Preity Talreja alleges assault, threats by husband | धर्मांतरणासाठी नवरा करतोय मारहाण, अभिनेत्रीने केली पोलिसांत तक्रार दाखल

धर्मांतरणासाठी नवरा करतोय मारहाण, अभिनेत्रीने केली पोलिसांत तक्रार दाखल

ठळक मुद्देप्रीतीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये आपल्याला तिच्या चेहऱ्यावर मारहाण केल्याच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत. तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, माझ्या पतीने प्रेमाच्या नावावर मला फसवले असून त्याने माझा वापर करून घेतला.

अभिनेत्री प्रीती तलरेजाने कृष्णदासी या मालिकेत काम केले होते. ही अभिनेत्री आता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिने काही वर्षांपूर्वी एका युवकाशी लग्न केले होते. पण आता हा युवक धर्मांतर करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत असून तिला मारहाण करत असल्याची तक्रार तिने पोलिसांकडे नोंदवली आहे.

प्रीतीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. तिने या पोस्टद्वारे पतीवर मारहाण केल्याचा तसेच धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. प्रीतीने याआधी या संदर्भात पोलिसात तक्रार नोंदवली होती. पण पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नव्हती. अखेर तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिचा कशाप्रकारे छळ करण्यात आला याविषयी सांगितले आहे. तिने या पोस्टमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केले आहे. 

प्रीतीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये आपल्याला तिच्या चेहऱ्यावर मारहाण केल्याच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत. तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, माझ्या पतीने प्रेमाच्या नावावर मला फसवले असून त्याने माझा वापर करून घेतला. तो माझा मानसिक आणि शारीरिक छळ करत आहे. तो मला कायम फसवत आला आहे.  

प्रितीने अभिजीत पेटकर या जिम चालकासोबत तीन वर्षांपूर्वी लग्न केलं होतं. आपल्या पोस्टमध्ये प्रितीने सांगितलं आहे की, अभिजीत मुस्लिम असून त्या दोघांनी निकाह केला आहे. पण मुस्लीम लॉअंतर्गत त्यांना मस्जिदकडून सर्टिफिकेट मिळालं नाही. आता अभिजीत धर्म बदलण्यावरून प्रितीला सतत मारहाण आणि जबरदस्ती करतोय. 

प्रीतीने सोशल मीडियावर ही पोस्ट केल्यानंतर आता कल्याण खडकपाडा पोलीस स्थानकात केस दाखल करण्यात आली आहे. 

Read in English

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actress Preity Talreja alleges assault, threats by husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.