महाराष्ट्र निवडणूक निकालः कुडाळमध्ये सेनेचे वैभव नाईक विजयी, राणेसमर्थक देसाईंवर केली मात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 14:03 IST2019-10-24T14:02:06+5:302019-10-24T14:03:05+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मतदारसंघात शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

Maharashtra Election Results: ShivSena's Vaibhav Naik won in Kudal | महाराष्ट्र निवडणूक निकालः कुडाळमध्ये सेनेचे वैभव नाईक विजयी, राणेसमर्थक देसाईंवर केली मात  

महाराष्ट्र निवडणूक निकालः कुडाळमध्ये सेनेचे वैभव नाईक विजयी, राणेसमर्थक देसाईंवर केली मात  

सिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मतदारसंघात शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. वैभव नाईक यांनी राणे समर्थक आणि भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार रणजीत देसाई यांचा १४ हजार ३४९ मतांनी पराभव केला. 

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना पराभूत करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या वैभव नाईक यांच्यासमोर यावेळी नारायण राणे यांनी मोठे आव्हान उभे केले होते. कुडाळमध्ये वैभव नाईक आणि रणजीत देसाई यांच्यासोबत मनसे आणि काँग्रेसचे उमेदवारही मैदानात होते. त्यात राज्यात युती असतानाही राणे समर्थक अपक्ष उमेदवार रणजीत देसाई यांना भाजपाने पाठिंबा दिला होता. त्यामुळे येथे अटीतटीची लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. 

मात्र आज मतमोजणीली सुरुवात झाल्यापासूनच वैभव नाईक यांनी आघाडी घेतली. त्यानंतर ही आघाडी वाढवत नेली. रणजीत देसाई यांनी नाईक यांना जोरदार टक्कर दिली. मात्र वैभव नाईक यांनी मिळवलेली ही आघाडी मोडून काढणे शक्य झाले नाही. अखेरीस वैभव नाईक यांनी १४ हजार ३४९ मतांनी विजय मिळवला. 
 

Web Title: Maharashtra Election Results: ShivSena's Vaibhav Naik won in Kudal