
सखी: पांढऱ्या केसांमुळे त्रस्त आहात? काळ्या केसांसाठी ३ घरगुती उपाय.
कमी वयात केस पांढरे? कढीपत्ता, आवळा, जास्वंदाचे तेल आणि मेथी-दही हेअर मास्क मदत करू शकतात. निरोगी, काळ्या केसांसाठी हे उपाय करून बघा.

छत्रपती संभाजीनगर: अतिवृष्टीचा मराठवाड्यातील एमआयडीसींना फटका; उत्पादन ठप्प
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील एमआयडीसींना मोठा फटका बसला, कारखान्यांमध्ये पाणी शिरल्याने उत्पादन थांबले. अनेक कंपन्यांनी मोठे नुकसान, पायाभूत सुविधांचे नुकसान आणि कामगारांच्या अडचणींची तक्रार केली. रस्ते दुरुस्तीसाठी आर्थिक मदत मंजूर.

आंतरराष्ट्रीय: डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! 'या' उद्योगावर लादला १००% कर...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (29 सप्टेंबर 2025) संपूर्ण जगाला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर निर्मित झालेल्या सर्व चित्रपटांवर 100 टक्के टॅरिफ (कर) लावण्याची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या ट्रुथ सोशल अकाउंटवरुन याची घोषणा केली. या निर्णयाचा फटका भारतात तयार होणाऱ्या चित्रपटांनाही बसणार आहे.

नांदेड: तुटपुंजी मदत नाकारली; करमोडी ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक ठराव!
नांदेडमधील करमोडी गावाने शासनाची प्रति गुंठा ८५ रुपयांची मदत नाकारली. गावकऱ्यांनी प्रति हेक्टर ५० हजार रुपये, पीक विम्याची पूर्ण भरपाई आणि कर्जमाफीची मागणी केली असून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. इतर गावेही ठराव करण्याच्या तयारीत.

महाराष्ट्र: पूर स्थितीत गैरहजर राहणाऱ्या ३४ आगारप्रमुखांवर कारवाई होणार
महाराष्ट्रात सध्या भीषण पूरस्थिती आहे. अशा संवेदनशील परिस्थितीत राज्य परिवहन मंडळाच्या आगारातील ३४ आगारप्रमुख गैरहजर आढळले. या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. कारणे दाखवा नोटीस जारी करून विभाग नियंत्रकांचीही चौकशी केली जाणार आहे.

सखी: गरम पाण्यात पाय बुडवाणे ठरते आरोग्यदाायी साधा उपाय
गरम पाण्यात पाय बुडवून थकलेल्या, दुखऱ्या पायांना आराम द्या. रक्ताभिसरण सुधारते, सूज कमी होते, त्वचा स्वच्छ होते आणि चांगली झोप लागते. हा एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे. नक्की करुन पाहा.

परभणी: खळी नदीच्या पुरातून मृतदेह नेण्याची हृदयद्रावक वेळ
गोदावरी नदीकाठच्या गावांवर अतिवृष्टी आणि बॅकवॉटरमुळे मोठे संकट कोसळले असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. यातच गंगाखेडमध्ये पुरामुळे एका कुटुंबाला मृत व्यक्तीचा देह तराफ्यावर खळी नदीतून न्यावा लागला. पुलाची उंची कमी असल्याने संकट वाढले, सततच्या पुरात पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष आणि उंच पुलाच्या मागणी पुन्हा समोर आली.

बीड: टीचभर मदतीने शेतकरी उभा राहणार का?: बीडमधील शेतकऱ्याचा अनोखा निषेध
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर तुटपुंज्या मदतीमुळे त्रस्त झालेल्या बीडमधील एका शेतकऱ्याने नेत्यांच्या फोटोसमोर शीर्षासन करून निषेध व्यक्त केला. वाढीव मदत आणि तातडीने कर्जमाफीची मागणी करत शेतकऱ्यांच्या दयनीय स्थितीकडे लक्ष वेधले.

हिंगोली: ओला दुष्काळ, कर्जमाफीसाठी सरणावर बसून शेतकऱ्यांचे आंदोलन
हिंगोलीत अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरण रचून आंदोलन; ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई द्या, कर्जमाफी करा, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केली.

अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
धार्मिक भावना दुखावल्याच्या मुद्द्यावरून अहिल्यानगरमध्ये तणाव निर्माण झाला. एका समाजातील व्यक्तींनी दुसऱ्या समाजातील धर्मगुरूंबद्दल रस्त्यावर रांगोळी काढल्यावरून दगडफेकीचा प्रकार घडला. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान, ज्या रांगोळीवरून या वादाला तोंड फुटलं, ती रांगोळी काढणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

फिल्मी: दिग्दर्शक सुभाष घईंनी अभिनेत्रींच्या आरोपांचं केलं खंडन, शेअर केली पोस्ट
दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका अभिनेत्रीने आरोप लावला होता. अभिनेत्रीने मुलाखतीत सुभाष घईंसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगत त्यांनी किस करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावला. तर आता सुभाष घईंनी या आरोपांचं थेट पोस्ट शेअर करत खंडन केलं आहे. आजकाल कोणा अनोळखई व्यक्तीला भेटणंही भीतीदायक झाल्याचं ते म्हणाले.

राष्ट्रीय: एका सल्ल्याचे ₹11 कोटी! प्रशांत किशोर यांनी केला कमाईचा खुलासा
निवडणूक रणनीतिकार आणि 'जन सुराज' पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर (पीके) यांनी आपल्या उत्पन्न आणि फंडिंगबाबत मोठा खुलासा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या संपत्तीबाबत विविध दावे आणि टीका केली जात होती. पीकेंनी स्पष्ट केले की, आर्थिक वर्ष २०२१-२२ पासून आतापर्यंत, म्हणजे गेल्या तीन वर्षांत पीकेंनी तब्बल ₹२४१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यांची संपूर्ण कमाई निवडणूक रणनीती आणि सल्लागार सेवांमधून मिळालेली आहे.

फिल्मी: रणबीरने 'अॅनिमल पार्क'संदर्भात दिली मोठी अपडेट, म्हणाला- ''यावेळेस सगळं...''
रणबीर कपूर 'अॅनिमल पार्क' या आगामी चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका व्हिडीओमध्ये रणबीर कपूरने या चित्रपटाशी संबंधित माहिती दिली आहे. या व्हिडीओमध्ये रणबीरने दिग्दर्शकासोबत झालेल्या संवादाचा उल्लेख केला. त्याने 'अॅनिमल पार्क' संदर्भात दिलेल्या माहितीमुळे चाहत्यांचे मन आनंदित झालंय.

सखी: आरोग्य रक्षणासाठी फ्रिज वापरण्याचे हे ४ नियम माहिती हवेत!
आजकाल फ्रिज सर्रास वापरले जातात, पण चुकीच्या वापरामुळे आरोग्य बिघडते. तापमान ४°C किंवा त्याहून कमी ठेवा. दुग्धजन्य पदार्थ मध्यभागी, इतर पदार्थ वरच्या बाजूला, भाज्या/फळे खालच्या ड्रॉवरमध्ये आणि चटण्या-लोणची दाराच्या कप्प्यात ठेवा. नेहमी अन्न झाकून ठेवा आणि आधी साठवलेले पदार्थ लवकर वापरा.

महाराष्ट्र: अहिल्यानगर: रांगोळीवरून तणाव; CM फडणवीसांना प्रतिक्रिया समोर
केवळ प्राथमिक माहिती माझ्याकडे आहे. याची संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच मी यावर बोलेन. येथील सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यामागे नेमके कोण आहे, हेदेखील आपल्याला शोधावे लागेल. ते नक्की आम्ही शोधू आणि त्यावर कारवाई करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

बीड: पुराचे पाणी पार करत प्रशासनाकडून ६१ कुटुंबांना मदतीचा हात
आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथे पुरामुळे बेघर झालेल्या ६१ कुटुंबांना प्रशासनाने पुराचे पाणी पार करत प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत दिली. मंडळधिकारी, तलाठ्यांनी जीव धोक्यात घालून मदत पोहोचवली. जिवाची पर्वा न करता मदत घेऊन आलेल्या मंडळधिकारी आणि तलाठ्याचे गावकऱ्यांकडून कौतुक.

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरात पावसाचा कहर, हर्सूल तलाव तुडुंब
मुसळधार पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जलमय झाले. शहर परिसरातील आठही मंडळांत म्हणजेच सुमारे १६० वसाहतींमध्ये अतिवृष्टी झाली. हर्सूल तलाव रातोरात ओव्हरफ्लो झाला. खाम नदीला पूर आल्याने सतर्कतेचा इशारा. इटखेड्यात पाणी साचले. तलाव भरल्याने १४ प्रभागांचा पाणीप्रश्न मिटला.

पुणे: 'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, अधिकाऱ्याला दिला दम
'मी तुला सांगतोय, मी तुला तुरुंगात टाकेन हा. तुमच्या काय बापाची आहे का मार्केट कमिटी?', असा सवाल करत अजित पवारांनी बाजार समितीच्या व्यवस्थापकांना आणि इतरांना दम दिला. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सभा पार पडली. यावेळी अजित पवारांना एक निवेदन देण्यात आले. या निवेदनातील पेट्रोल पंप उधारीबद्दलचा मुद्दा वाचल्यानंतर अजित पवारांचा पारा चढला.

मुंबई: हृदयस्पर्शी! जन्मदात्या आईने सोडले; ३८ वर्षांनी लेक भेटली
जन्मदात्या आईने ११ दिवसांची असताना अनाथाश्रमात सोडले. त्यानंतर १ वर्षांनी तिला परदेशातील जोडप्याने दत्तक घेतले. स्वित्झर्लंडमध्ये वाढलेल्या नताशाने आपल्या जैविक आईचा मागील १५ वर्षे शोध घेतला. अखेर ३८ व्या वर्षी नताशाचा शोध मुंबईत येऊन थांबला. नताशा तिच्या खऱ्या आईला भेटली. अवघ्या ३० मिनिटांच्या या भेटीत दोघीही भावनिक झाल्या. नताशाला जन्मताच का सोडावे लागले याचं कारणही आईने तिला सांगितले.

सखी: रेस्टॉरंट स्टाईल नान करा घरीच तव्यावर, सोपी रेसिपी!
तंदूरशिवाय रेस्टॉरंटसारखे नान घरीच बनवा! ही सोपी रेसिपी वापरून करा मऊ, लुसलुशीत नान. तुमचा नेहमीचा तवा वापरा. पाहा कसे करायचे. आपल्या आवडत्या भाजीसोबत गरमागरम, चविष्ट नानचा आनंद घ्या.

छत्रपती संभाजीनगर: गोदावरीला रौद्ररूप, यापूर्वी कधी झाला होता जायकवाडीतून मोठा विसर्ग?
जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत ३ लाख क्युसेकपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग, १९ वर्षांनंतर पैठणमध्ये पूर. सहा गावांतील नागरिकांचे स्थलांतर. आवक घटल्याने विसर्ग कमी होणार. यापूर्वी १९७६, १९८०, १९९४, २००६, २००८ आणि २०२२ मध्ये उच्च विसर्ग झाला.

सखी: कॉटनच्या कपड्यांचा रंग जाणार नाही, सोपे उपाय
तुरटी आणि मीठाच्या पाण्यात भिजवून कॉटनच्या कपड्यांचा रंग फिकट होण्यापासून वाचवा. मुलायम करण्यासाठी व्हिनेगर टाका. या सोप्या उपायांमुळे रंग चमकदार राहतात, आकसणार नाहीत . सूट, साड्या व बेडशीटवरील प्रिंटही छान राहतील.

सखी: कोंडा, केस गळती आणि पांढऱ्या केसांवर उपाय.
नारळ तेलाने केसांच्या समस्यांवर मात करा! लिंबाचा रस, कढीपत्ता किंवा केळी आणि दूध मिसळून निरोगी, काळे आणि चमकदार केस मिळवा. हे घरगुती उपाय केस गळती, कोंडा आणि अकाली पांढरे होणे यावर प्रभावीपणे मात करतात.

छत्रपती संभाजीनगर: पैठणची बाजारपेठ जलमय; धरणामुळे रहिवाशांचे स्थलांतर
जायकवाडी धरणातून विसर्ग वाढल्याने पैठण शहरात पाणी शिरले. शहरातील १५८० रहिवासी आणि ११ गावांतील ४७९ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवले. येथील सहाशे दुकानांपैकी सुमारे साडेतीनशे व इतर भागांतील ५० ते ६० दुकानांमधील सामान, साहित्य व्यापाऱ्यांनी इतरत्र हलवले. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला.

सखी: केसांसाठी राईस वाॅटर घरी बनवा आणि मिळवा सुंदर- रेशमी केस!
अमिनो ॲसिड आणि व्हिटॅमिनयुक्त तांदळाचे पाणी केस आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. तांदूळ पाण्यात भिजवून, आंबवून, पातळ करून मुळांना लावा. एका तासाने केस धुवा. नियमित वापराने केस निरोगी आणि रेशमी होतात.

महाराष्ट्र: कॅमेऱ्यासाठी राष्ट्रवादाचे नाटक; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
भारताने आशिया चषक स्पर्धा जिंकली. त्यानंतर मोठ्या नाट्यमय घटना घडल्या. भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्याकडून चषक स्वीकरला नाही. त्यानंतर नकवी निघून गेले. त्यांनी चषकही सोबत नेल्याचा आरोप बीसीसीआयने केलाय. याच सगळ्या वादात आता शिवसेनेचे (युबीटी) खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला सुनावले आहे.

जालना: गोदावरीच्या पुराचे पाणी जालन्यातील १६ गावात, १० हजार जणांना वाचवले
गोदावरी नदीच्या पुरामुळे अंबड तालुक्यातील १६ गावांना फटका बसला. घरात आणि मंदिरांमध्ये पाणी शिरल्याने सुमारे १० हजार लोकांना वाचवण्यात आले. कुटुंबे शाळा आणि नातेवाईकांच्या घरी स्थलांतरित झाली. माजी मंत्री राजेश टोपे यांनी शाळांमध्ये निवारा व्यवस्था केली.

महाराष्ट्र: राज्यात 'पूर'संकट! विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांची मागणी
मराठवाड्यातील भीषण पूरस्थितीवर तोडगा काढण्यासाठी विरोधी पक्षांनी राज्यपालांकडे विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली. यात पिकांचे नुकसान, जनावरांची हानी आणि उद्ध्वस्त घरांसाठी मदत पॅकेजची गरज आहे. विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी राज्यपालांना पत्र लिहिले आहे. राज्यातील पूर परिस्थितीनंतर शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट आणि मदतीच्या पॅकेजवर चर्चा करावी असं त्यांनी म्हटलं आहे.

सखी: डाळ शिजताना फेस का येतो? तो आरोग्यासाठी घातक आहे का?
डाळ शिजवताना येणारा फेस स्टार्च, प्रोटीन आणि सॅपोनिन्समुळे असतो. पोषणतज्ज्ञच्या मते, हा सहसा हानिकारक नसतो. डाळ भिजवून, तूप टाकून किंवा कमी आचेवर शिजवून फेस कमी करता येतो.

राष्ट्रीय: "राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी नेते आणि सध्याचे भाजप प्रवक्ते प्रिंटु महादेव यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या छातीत गोळ्या घालू अशी धमकी दिली. एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान त्यांनी हे विधान केले. यानंतर काँग्रेसने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून तक्रार केली.

क्रिकेट: भारताचा आशिया चषक विजय, बीसीसीआयची २१ कोटींची घोषणा!
भारताने आशिया चषकात पाकिस्तानला हरवले. बीसीसीआयने भारतीय संघ आणि सपोर्ट स्टाफसाठी २१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. आशिया स्पर्धेत विजेता म्हणून भारताला USD 300,000, तर उपविजेता म्हणून पाकिस्तानला USD 75,000 मिळाले. भारतीय खेळाडूंनाही भरघोस बक्षिसे मिळाली. भारतीय संघाने जिंकलेली ट्रॉफी, पदके जरी पाकिस्तानी गृहमंत्री चोरून घेऊन गेला असला तरी प्राईज मनी काही पाकिस्तान चोरू शकणार नाहीय.