मुंबई: मुंबईत लवकरच बीएसएनएल नेटवर्क; २ हजार टॉवर उभारणार
बीएसएनएल लवकरच मुंबईत दूरसंचार सेवा सुरू करणार असून, त्यासाठी २ हजार टॉवर उभारणार आहे. सुरुवातीला इंट्रा-सर्कल रोमिंगद्वारे सेवा सुरू होईल. ५ लाख सीम विक्रीचे ध्येय असून, बीएसएनएल मुंबई मेट्रोसाठी दूरसंचार भागीदारी करत आहे. त्यानंतर दुर्गम भागात सेवा विस्तारणार आहे.
पिंपरी -चिंचवड: पिंपरी-चिंचवड निवडणूक: पावणेनऊ वर्षांनंतर निवडणूक; सर्वच पक्षांचा लागणार कस
पिंपरी : महापालिकेची आगामी निवडणूक शहराच्या भविष्यातील विकासाची दिशा ठरवणारी असेल, असे मानले जात आहे. मागील वेळी म्हणजे २०१७ मध्ये भाजपने स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवत वर्चस्व निर्माण केले होते. मात्र, गेल्या पावणेनऊ वर्षांत राज्यातील राजकारणात झालेली उलथापालथ, फाटाफूट, पक्षांतर्गत विभाजन आणि नव्या आघाड्यांमुळे यावेळी राजकीय चित्र पूर्णपणे बदलले आहे.
पिंपरी -चिंचवड: बिगुल वाजले...! ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी रणधुमाळी सुरू...
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल सोमवारी (दि. १५) वाजले. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, सुमारे पावणे नऊ वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यावेळीही चार सदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार असून, १५ जानेवारीला मतदान होणार आहे. एकूण ३२ प्रभागांमधून १२८ जागांसाठी ही निवडणूक आहे, अशी माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय: पंतप्रधान मोदींचा जॉर्डन दौरा: भारतासाठी का महत्वाचा आहे हा देश? जाणून घ्या...
मध्य पूर्वेतील बहुतांश देश अमेरिका, सौदी अरेबिया किंवा इराण यांच्यापैकी एखाद्या देशाशी जोडलेले दिसतात. मात्र, जॉर्डन हा देश याला अपवाद ठरतो. अरब देशांसोबतच इस्रायल आणि पाश्चात्त्य राष्ट्रांशी संतुलित संबंध ठेवणारा जॉर्डन संपूर्ण मिडिल ईस्टमधील एक अनोखी आणि शांत ताकद म्हणून ओळखला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या याच देशाच्या दौऱ्यावर गेल्याने भारत-जॉर्डन संबंधांना नवे महत्त्व प्राप्त झाले आहे.
सोशल वायरल: वादळाचा तडाखा अन् खेळण्यासारखा कोसळली सात मजली उंचीची स्टॅच्यू ऑफ लिबर्टी
ब्राझीलच्या रियो ग्रांडे डो सुलमधील गुआईबामध्ये उभारण्यात आलेल्या भल्यामोठ्या स्ट्रॅच्यू ऑफ लिबर्टीला वादळाचा तडाखा बसला. अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीप्रमाणे प्रतिकृती ब्राझीलमध्ये उभारण्यात आली होती. सात मजली इमारती इतकी उंची असलेला हा पुतळा कोसळला.
परभणी: गंगाखेड-परळी मार्गावर बस-ट्रॅक्टर अपघात: एक ठार, नऊ जखमी
गंगाखेड-परळी मार्गावर पडेगावजवळ बस-ट्रॅक्टरच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू, नऊ जखमी. नागपूर-आंबेजोगाई बसला समोरून ट्रॅक्टरने धडक दिल्याने अपघात झाला. जखमी प्रवाशांवर गंगाखेड रुग्णालयात उपचार सुरू.
बीड: अंबाजोगाई-लातूर रस्त्यावर भीषण अपघात: लातूरचे तिघे जागीच ठार
अंबाजोगाई-लातूर रस्त्यावर जीप आणि कारच्या समोरासमोर झालेल्या धडकेत लातूरचे तिघे जागीच ठार झाले. बर्दापूर फाट्याजवळ रात्री 10:30 च्या सुमारास हा अपघात झाला. दोन जण गंभीर जखमी असून त्यांना लातूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
फिल्मी: ''दैव परंपरेची मस्करी नको''; ऋषभ शेट्टीचा रणवीर सिंगला टोला, स्पष्टच म्हणाला-
काही आठवड्यांपूर्वी अभिनेता रणवीर सिंगने गोव्यातील इफ्फी फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'कांतारा' चित्रपटातील 'दैव'ची नक्कल केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या घटनेनंतर रणवीर सिंगला सोशल मीडियावर टीकेला सामोरं जावं लागलं. आता 'कांतारा'चा दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टीने या संपूर्ण प्रकरणावर जाहीरपणे प्रतिक्रिया दिली आहे. अशा प्रकारची नक्कल किंवा सादरीकरणामुळे 'मला अस्वस्थ वाटतं', असं त्याने स्पष्ट केले आहे. काय म्हणाला ऋषभ? जाणून घ्या
मुंबई: मुंबई वाचवण्यासाठी लढा, बलिदानाची तयारी; राऊतांचा महायुतीवर निशाणा
खासदार संजय राऊतांनी भाजप-शिंदे सेनेवर निशाणा साधला, आगामी निवडणुका मुंबईतील मराठी अस्मितेची लढाई असल्याचे त्यांनी म्हटले. या महाराष्ट्रातील मराठी माणसांचा एक गट मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी, उद्योगपतीला देण्यासाठी आसूसलेला असताना शिवसेना आणि मनसेचे लोक मुंबई वाचवायला, मराठी माणसाच्या हाती ही मुंबई राहण्यासाठी शौर्याने या लढाईत उतरले होते ही इतिहासात नोंद राहील असं राऊतांनी म्हटलं.
महाराष्ट्र: भाजपासोबत युती तुटताच दोन्ही NCP एकत्र येण्याच्या हालचालींना वेग
भाजपा युती तुटल्यानंतर आगामी निवडणुकीत भाजपाला आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीचे दोन्ही गट पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र येण्याची शक्यता आहे. मतविभागणी टाळण्यासाठी स्थानिक पातळीवर दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. त्याशिवाय या आघाडीत शिंदेसेनेचाही समावेश होण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाशी एक नंबरचा शत्रू कोण असेल तर तो भारतीय जनता पार्टी आहे असं शरद पवार गटाने सांगितले.
आंतरराष्ट्रीय: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
इमर्जन्सी लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असतानाच एक खासगी विमान कोसळले. सोमवारी (१५ डिसेंबर) मेक्सिको हा भीषण अपघात झाला. यात आठ प्रवासी आणि विमानातील दोन क्रू मेंबर्ससह दहा जणांचा मृत्यू झाला आहे. एपी वृत्तसंस्थेने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, मेक्सिकोच्या राज्य संरक्षक समन्वयक एड्रियन हर्नांडेज यांनी या घटनेबद्दलची माहिती दिली आहे. मेक्सिको शहरापासून ५० किमी अंतरावर पश्चिमेला ही घटना घडली.
राष्ट्रीय: पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानात; सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल.
एनआयएने पहलगाम हल्ल्या प्रकरणी सहा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. हल्ल्यात 26 लोकांचा मृत्यू झाला होता. हा कट पाकिस्तानात रचला गेला, ज्याला दहशतवादी संघटनांचा पाठिंबा होता. या हल्ल्यात सहभागी तीन दहशतवादी एका ऑपरेशनमध्ये मारले गेले.
मुंबई: मुंबईत एक कोटी मतदार बजावणार हक्क; दुबार मतदार वगळले जाण्याची शक्यता
मुंबई महापालिका निवडणुकीत एक कोटी मतदार नोंदणीकृत आहेत, पण छाननीत एक लाख दुबार नावे वगळली जातील. दहा हजारांहून अधिक मतदान केंद्रे उभारली असून सत्तर हजार कर्मचारी तैनात असतील. उपनगरात तृतीयपंथी मतदारांची संख्या वाढली आहे.
क्राइम: कोंबड्यांच्या आड अमली पदार्थांचा कारखाना; ११ जण अटकेत
मीरा रोड पोलिसांनी राजस्थानमध्ये कोंबडीपालनाच्या आड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना उद्ध्वस्त केला. दाऊद टोळीतील गुंडांसह ११ जणांना अटक करण्यात आली आहे. १०० कोटींचे एमडी जप्त केले असून आणखी १०० कोटींच्या ड्रगची विक्री पश्चिम भारतात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
राष्ट्रीय: कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला?
मोहाली येथे कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बंबीहा टोळीने सिद्धू मुसेवालाच्या मारेकऱ्यांना मदत केल्याच्या संशयावरून हल्ला केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर हत्येची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. मूसेवालाच्या हत्येचा बदला घेतल्याचा दावाही केला जात आहे.
क्राइम: पार्थ पवारांचे भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; कसून चौकशी
पुण्यातील मुंढवा येथील ४० हेक्टर जागेच्या खरेदी-विक्री घोटाळा प्रकरणात पार्थ पवार यांचे भागीदार दिग्विजय पाटील पोलिसांसमोर हजर झाले. जमीन खरेदी-विक्री व्यवहारांबाबत त्यांची चौकशी झाली. सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर: प्रेमप्रकरणातून तरुणाचे अपहरण; दीड वर्षांपूर्वीच्या घटनेचा मुलीच्या आईला राग.
छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रेमप्रकरणामुळे एका २३ वर्षीय तरुणाचे अपहरण करून मारहाण करण्यात आली. दीड वर्षांपूर्वी मुलगी पळून गेल्याने आईने हे कृत्य केले. पोलिसांनी आईला ताब्यात घेतल्याचे कळताच तीन अपहरणकर्ते घाबरून गेले. त्यांनी तरुणाला रस्त्यात सोडून पलायन केले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
राष्ट्रीय: लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने आज(15 डिसेंबर 2025) रोजी जम्मू येथील विशेष NIA न्यायालयात पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी चार्जशीट दाखल केली आहे. या चार्जशीटमध्ये लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर सैफुल्लाह साजिद जट्ट उर्फ साजिद जट्ट याला या भीषण हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे सांगण्यात आले आहे. NIAने साजिद जट्टवर 10 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे.
छत्रपती संभाजीनगर: थरारक! सेलूजवळ रेल्वेतून पडून युवतीचा मृत्यू, युवक गंभीर जखमी
सेलूजवळ पुणे-नांदेड एक्सप्रेसमधून पडून १६ वर्षीय युवतीचा मृत्यू झाला. तिच्यासोबत असलेला युवक गंभीर जखमी असून व्हेंटिलेटरवर आहे. बहिणीच्या मृत्यूचा जबरदस्त धक्का बसल्याने तरुणी बेशुद्ध पडली. दरम्यान, दोन बहिणींसोबत पुसदचा युवक कसा व कोठे सोबत आला? आणि रेल्वेतून खाली पडण्याचा नेमका प्रकार काय होता? याचे गूढ कायम
महाराष्ट्र: ठाकरे एकत्र आले तरी मुंबईत युतीच जिंकणार: देवेंद्र फडणवीस
ठाकरे बंधू काँग्रेससोबत आले तरी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीच जिंकेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विकास आणि मुंबईकरांसाठी केलेल्या कामामुळे विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला. मतदार यादीतील त्रुटी असूनही वेळेवर निवडणुका व्हाव्यात, असेही ते म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर: ग्रामस्थांचा आक्रोश! स्मशानभूमीसाठी संघर्षानंतर प्रशासनाकडून जागा, निधी मंजूर!
खांडीपिंपळगावात स्मशानभूमी नसल्याने तरुणाच्या अंत्यसंस्कारासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर आंदोलन केले. प्रशासनाने नमते घेत २० गुंठे जागा व २० लाखांचा निधी मंजूर केला. त्यानंतर तरुणावर नवीन जागेत अंत्यसंस्कार करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर: लेकीच्या शिक्षणासाठी लालपरी थेट बांधावर; पत्राने जिंकले मंत्र्यांचे मन!
हुशार जान्हवीच्या पत्रामुळे तिच्या शिक्षणासाठी बस थेट शेताच्या बांधावर थांबते. मंत्री सरनाईक यांनी पत्र वाचून जान्हवीसाठी शेताच्या बांधावर एसटी बस थांबविण्याचे आदेश दिले. जळगावचे विभाग नियंत्रक दिलीप बंजारा आणि पाचोरा आगार व्यवस्थापक प्रकाश पाटील यांनी तत्काळ कारवाई केली. त्यांनी जान्हवीशी संवाद साधून कुटुंबीयांची शेतावर जाऊन भेट घेतली. सकाळी ९ व सायंकाळी ५ वाजता बसची सोय केली, ज्यामुळे शिक्षण सुलभ झाले.
महाराष्ट्र: महापालिका निवडणुका: १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल!
राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. नामनिर्देशन पत्रे ऑफलाईन स्वीकारली जाणार आहेत. ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असलेल्या ठिकाणीही निवडणूक घेण्यास न्यायालयाची मनाई नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.
महाराष्ट्र: "ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संशोधक विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या मुद्द्यावर एक विधान केले. त्यांच्या या विधानावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संताप व्यक्त करत थेट इशारा दिला आहे. 'गैरप्रकार असतील तर कारवाई करा; पण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर हात टाकू नका', असे म्हणत रामदास आठवले यांनी यांनी या मुद्द्यावर भूमिका मांडली.
महाराष्ट्र: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचे आज बिगुल वाजण्याची शक्यता
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाची संध्याकाळी ४ वाजता पत्रकार परिषद आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ३१ जानेवारीच्या आत सर्व निवडणुका पार पाडायच्या आहेत. त्यात राजकीय आरक्षणाची ५० टक्के मर्यादा ओलांडल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लांबणीवर पडल्याचे चित्र आहे. त्यात महापालिका निवडणुका आधी होण्याची शक्यता आहे.
फिल्मी: 'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण..
'धुरंधर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर तसेच लोकांच्या मनावरही अधिराज्य गाजवतोय. रणवीर सिंग, अक्षय खन्नापासून ते अर्जुन रामपालपर्यंत,यातील प्रत्येक भूमिकेला एक नवीन ओळख मिळालीय. याच यादीत सुनील ग्रोवरचे नाव जोडले जाणार होते, परंतु तो या उत्कृष्ट चित्रपटाचा भाग होता होता राहून गेला.
बीड: ओबीसी नेते मंगेश ससाणेंच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक
धारूर येथे ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. गाडीच्या काचा फुटल्या. या घटनेनंतर मंगेश ससाणे यांनी तत्काळ धारूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रारीवरून धारूर ठाण्यात दोन अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे: कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार
राजगुरूनगरमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये ही घटना घडली आहे. सोमवारी सकाळी दहावीचे विद्यार्थी क्लाससाठी आले होते. त्याचवेळी मुलांमधील वाद उफाळला आणि त्यातून एकाची हत्या करण्यात आली. शिक्षक शिकवत असतानाच काही विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. त्यातून एका विद्यार्थ्याने धारदार शस्त्राने वार केले.
मुंबई: तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपात पक्ष प्रवेश, कुणावर साधला निशाणा?
माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. खूप काही गोष्टी बोलायच्या आहेत परंतु त्या कसं बोलू माहिती नाही. मला विकासाची कामे करायची आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात माझी सगळी कामे होतील अशी मला अपेक्षा आहे. त्याशिवाय अभिषेकच्या हत्येचा सीबीआय तपास जलदगतीने करावी अशी मागणी केली.
मुंबई: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस गेले. त्यावेळी गुंडांनी पोलिसांनाचीच कॉलर पकडत हुज्जत घातली. पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांवरच गावगुंडांनी हल्ला केला. पोलिसांना गुंडांकडून मारहाण करण्यात आली. कांदिवलीमध्ये रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
मुंबई: तेजस्वी घोसाळकरांचं भावनिक पत्र: ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा
तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला असून त्या भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. जनतेची सेवा व मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. अभिषेकच्या जाण्यानंतर माझ्या आयुष्यात एकच ध्येय उरले आहे, समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणे आणि माझ्या मुलांची व सहकाऱ्यांची काळजी घेणे. बदलत्या परिस्थितीत मला घ्यावा लागणारा हा निर्णय आपण समजून घ्याल असं त्यांनी म्हटलं आहे.