बीड: बीड: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांचा स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न
बीड दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. अजित पवारांचा ताफा ज्या रस्त्यावरून जात होता, तिथे अचानक दोन तरुण आले. त्यांनी बॉटलमधून अंगावर पेट्रोल ओतले. हे बघताच पोलिसांनी धाव घेत त्यांना पकडले. यावेळी गोंधळ उडाला होता. बुधवारी सकाळी शहरात ही घटना घडली.
मुंबई: "मराठी माझी आई, उत्तर भारत मावशी; एकवेळ आई मेली तरी चालेल..."
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदेसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मराठी भाषेबाबत केलेल्या विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे. मराठी माझी आई तर उत्तर भारत माझी मावशी आहे. एकवेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे असं विधान सुर्वे यांनी उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात केले आहे. आईपेक्षा जास्त प्रेम तुम्ही मला दिले आहे असं प्रकाश सुर्वे यांनी म्हटलं.
बीड: 'तुमची मुलगी माझ्या ताब्यात'; ऊसतोड मजुराचा थेट मुलीच्या पित्याला फोन!
बीडमध्ये धक्कादायक अपहरण: एका १६ वर्षीय ऊसतोड मजुराने १५ वर्षीय मुलीचे अपहरण केले, पित्याला फोन करून सांगितले. अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपी तरुणाविरुद्ध केज पोलिसात गुन्हा (अपहरण, कलम ३६३) नोंद करण्यात आला आहे. पित्याने तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस आरोपी आणि मुलीचा शोध घेत आहेत.
बीड: परळीत बॅनर युद्ध: कराडचा फोटो लावला तर तुम्ही गित्तेचा लावा!
परळी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सज्ज! वाल्मीक कराड यांचे फोटो वापरल्यास बबन गित्तेंचे फोटो बॅनरवर लावा, असे देवराव लुगडे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन. गित्ते निर्दोष असल्याचा दावा. पक्ष स्थानिक निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणार.
महाराष्ट्र: "मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
कॅबिनेट मंत्री संजय शिरसाटांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडातील बालाजी कल्याणकरांचा किस्सा सांगितला. बालाजी कल्याणकर गुवाहाटीत असताना हॉटेलमधून उडी मारणार असे म्हणत होते. जेव्हा बालाजी कल्याणकरांना विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी त्यावेळी डोक्यात काय सुरू होते आणि कसे त्यांना कुणी धीर दिला, याबद्दल सांगितलं.
राष्ट्रीय: 'स्वतःच्याच वडिलाचे नाव घ्यायला लाज वाटते का?', 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या कटिहार जिल्ह्यातून राजद (RJD) आणि काँग्रेसवर तीव्र टीका केली. त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप केला की, काँग्रेसच्या नामदार नेत्याने छठ महापर्वाला ‘ड्रामा’ म्हटले, जेणेकरून बिहारची जनता राजदवर राग व्यक्त करेल आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागेल. राजदने काँग्रेसला “बंदूक” दाखवून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करवून घेतल्याचा दावाही मोदींनी केला.
सखी: मऊ लुसलुशीत इडलीसाठी: पिठात गरम तेल घाला, जादू बघा!
मऊ, हलकी इडली हवी आहे? दक्षिण भारतीय लोक इडलीच्या पिठात गरम तेल घालतात. यामुळे इडल्या हलक्या, चमकदार आणि चविष्ट होतात. पीठ फर्मेन्ट झाल्यावर १०-१५ मिनिटे गरम तेल घालून मिक्स करा. चविष्ट इडलीचा आनंद घ्या!
नांदेड: नंदिग्राम एक्सप्रेसला मुंबईत उशीर; कनेक्टिंग गाड्या चुकल्याने आर्थिक फटका
नंदिग्राम एक्सप्रेसच्या उशिरामुळे मुंबईतील प्रवाशांना गैरसोय, कनेक्टिंग गाड्या चुकल्याने आर्थिक फटका बसला. विद्यार्थ्यांपासून महिला, शासकीय कर्मचारी, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच या उशिराचा मोठा फटका बसत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रवाशांनी वेळेवर सेवा देण्याची मागणी केली.
सखी: 'या' २ चुका टाळा आणि वजन नियंत्रणात ठेवा.
महिला अनेकदा नाश्ता टाळतात आणि दुपारी जास्त वेळ झोपतात, ज्यामुळे वजन वाढते. नाश्ता न केल्याने ॲसिडिटी वाढते आणि नंतर जास्त जेवण होते. जेवणानंतर जास्त वेळ झोपल्याने पचनक्रिया मंदावते, ज्यामुळे वजन वाढते. वजन नियंत्रणासाठी या सवयी टाळा.
महाराष्ट्र: राज ठाकरेंच्या रझा अकादमीविरोधातील मोर्चावेळी भाजपावाले कुठे होते?
राज ठाकरेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या भाजपावर मनसेचा पलटवार. रझा अकादमीच्या विरोधात राज ठाकरेंनी मोर्चा काढला तेव्हा भाजपावाले कुठे होती, राज ठाकरेंना हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता नाही. सत्तेसाठी, खुर्चीसाठी राज ठाकरे दुसऱ्यांचा पक्ष फोडत नाही. जय-पराजय झाला तो त्याच पद्धतीने ते स्वीकारतात. महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरे यांनी स्वत:वर १०० हून अधिक गुन्हे घेतले आहेत असं मनसेने म्हटलं.
परभणी: गोदावरीत बुडून दोघांचा मृत्यू: धार्मिक कार्यक्रमासाठी गेल्यानंतर पोहणे जिवावर बेतले!
परभणी जिल्ह्यातील दोन युवक शिरोरी येथे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले असताना गोदावरी नदीत बुडाले. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही मृत्यू झाला. शोधकार्यानंतर त्यांचे मृतदेह सापडले, ज्यामुळे परभणीत शोक पसरला आहे.
फिल्मी: आलिया भट्टच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली
यशराज फिल्म्सची बहुप्रतिक्षित एक्शन एंटरटेनर ‘अल्फा’ आता पुढील वर्षी १७ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. स्टुडिओने जाहीर केले की चित्रपटाचे व्हीएफएक्स सर्वोत्तम दर्जाचे करण्यासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या अॅक्शन थ्रिलरमध्ये आलियासह शर्वरी वाघ, अनिल कपूर आणि बॉबी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
आंतरराष्ट्रीय: 'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनविषयी वादग्रस्त आणि स्पष्ट वक्तव्य करून आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडवली आहे. ट्रम्प म्हणाले, 'जसा चीन अमेरिकेसाठी मोठा धोका आहे, अमेरिकादेखील चीनसाठी तितकाच धोका आहे. आम्ही त्यांच्याकडे पाहतो, ते आमच्याकडे पाहतात.' ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही महासत्तांमधील राजनैतिक आणि सामरिक संबंधांवर नवे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
व्यापार: चीनला शह देण्यासाठी भारताची मोठी योजना; ७००० कोटींची गुंतवणूक!
चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहन, संरक्षण तसंच रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रांसाठी आवश्यक असलेल्या क्रिटिकल मिनरल्सचा देशांतर्गत पुरवठा मजबूत करण्याच्या दिशेनं भारत एक मोठं पाऊल उचलत आहे. जगातील अनेक देश चीनवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेनं वेगानं काम करत असताना, भारत हे पाऊल उचलत आहे.
महाराष्ट्र: ...तर भाजपानेही आमच्यासोबत कोर्टात यावे; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
भाजपाकडून हिंदू मुस्लीम करण्याचा केविळवाणा प्रयत्न सुरू आहे. आम्ही अख्ख्या यादीत सुधारणा करण्याची मागणी केली आहे ज्यात हिंदू, मुस्लीम, शिख, ईसाई सगळेच आलेले आहेत. आशिष शेलारांनी आज धाडस दाखवले. शेलारांचं काहीतरी बिनसले आहे आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पप्पू ठरवून दाखवले. आमच्या आरोपांना किंमत नसेल तर आशिष शेलारांनी जी माहिती दिलीय त्यावर बोला असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
मुंबई: कोर्टातच वकिलाचा मृत्यू, शेजारच्या रुग्णालयात नेले नाही, पतीचा आरोप
एस्प्लेनेड कोर्टात ज्येष्ठ वकील मालती पवार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सीपीआर ज्ञानाचा अभाव आणि वैद्यकीय मदतीतील दिरंगाईमुळे मृत्यू झाल्याचा पतीचा आरोप. मदतीऐवजी लोकांनी कथितपणे व्हिडिओ काढल्याचे पतीने सांगितले.
राष्ट्रीय: यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
4 नोव्हेंबरपासून देशातील 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचे विशेष सखोल निरीक्षण (Special Intensive Revision- SIR) प्रक्रिया सुरू होत आहे. या मोहिमेद्वारे मतदारांची पडताळणी, नावे अपडेट करणे आणि दुहेरी नोंदी काढून टाकण्याचे काम होणार आहे. परंतु, अनेक राज्यांतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी या मोहिमेचा तीव्र विरोध केला आहे.
छत्रपती संभाजीनगर: खळबळजनक! गतिमंद विद्यार्थ्यांना मारहाण; दोघांवर पोलिसात गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगरमध्ये, दोन कर्मचाऱ्यांनी गतिमंद विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे, ज्यात हात बांधून मारहाण करणे समाविष्ट आहे. आणखी एक गतिमंद मुलगा शाळेतून परतल्यावर जखमी आढळला, ज्यामुळे पोलिस तपास सुरू झाला आहे.
महाराष्ट्र: Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल
उद्धव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीआधी मतदार यादी सुधारण्याची मागणी केली. निवडणूक घेऊ नका असं आम्ही म्हणत नाही तर सदोष मतदार यादी प्रसिद्ध करावी. शिवसेना शाखेत मतदार ओळख केंद्र उभारणार. १ जुलैनंतर १८ वर्ष पूर्ण होणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणांना मतदानापासून वंचित ठेवलं जातेय असा आरोप करत सरकार Gen Z युवकांना का घाबरतंय असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
मुंबई: राज ठाकरेंना मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? आशिष शेलार
आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर निवडक दुबार मतदारांवरांचा उल्लेख केल्याचा आरोप केला. MVA च्या मतदारसंघातील मुस्लिम दुबार मतदार का दिसले नाहीत? असा सवाल करत, त्यांनी 'वोट जिहाद'चा आरोप केला व भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.
बीड: बारावीत तीनदा नापास, श्रीकांतची MPSC मध्ये उत्तुंग भरारी!
बारावीत तीनवेळा नापास झालेल्या श्रीकांत होरमाळेने अकरा वर्षांच्या अथक परिश्रमाने MPSC परीक्षेत यश मिळवले. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे १४० वी रँक मिळवत त्याने शासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले. आईने त्याच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.
बीड: विक्रीनंतर 'थार' मालकानेच चोरली; पाच जणांवर गुन्हा दाखल.
केजमध्ये थार गाडी पाच लाखांना विकून मालकानेच ती परत चोरली. गाडी चोरीला गेल्याचे लक्षात येताच राहुल यांनी तातडीने व्यवहारात मध्यस्थी करणाऱ्या संजय पवारला फोन केला. त्याने माहिती नसल्याचे सांगितले. गाडी खरेदी करणाऱ्या तरुणाने फसवणूक आणि चोरीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी मालकासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
व्यापार: ई-आधार ॲप याच महिन्यात लाँच होणार; घरबसल्या आधार अपडेट करता येणार
भारतात लवकरच फोनवरून आधार कार्ड अपडेट करण्याची सेवा सुरू होणार आहे. ही सेवा सुरू झाल्यावर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार केंद्राच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) 'ई-आधार ॲप' नावाचे एक नवीन मोबाईल ॲप आणत आहे.
फिल्मी: शाहरुख खानच्या चाहत्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज; रात्री उशीरा काय घडलं?
शाहरुखने त्याच्या वाढदिवशी दरवर्षीप्रमाणे मन्नतवर भेटणार नाही, असं सांगितलं होतं. तरीही शाहरुखचे चाहते त्याच्या लाडक्या सुपरस्टारची वाट बघत उभे होते. त्यामुळे चाहत्यांचं मन राखण्यासाठी रात्री उशिरा शाहरुख सर्वांना भेटायला आला. त्यावेळी शाहरुखला भेटायला आलेल्या चाहत्यांनी त्याला बघण्यासाठी एकच गर्दी केली. अचानक मोठा जमाव शाहरुखच्या दिशेने पुढे आला. त्यामुळे शाहरुखही काहीसा गोंधळला होता. पोलीस पुढे आल्याने शाहरुख मागे फिरला. पुढे काय घडलं?
व्यापार: अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त
अनिल अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स समूहाविरुद्धच्या मनी लॉन्ड्रिंगच्या तपासादरम्यान (Money Laundering Probe) मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. सक्तवसूली संचलनालयानं ₹३००० कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता जप्त केली.
मुंबई: रिक्षा, टॅक्सी, बससाठी स्वतंत्र पार्किंग लवकरच: राज्य सरकारचे नवे धोरण
महाराष्ट्र परिवहन विभाग सार्वजनिक वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची योजना आखत आहे. पार्किंग मोफत की सशुल्क हे महापालिका ठरवणार आहे. पार्किंग धोरणातील त्रुटी दूर करून, रस्त्यांवरील कोंडी कमी करणे आणि स्मार्ट पार्किंग सुविधा समाविष्ट करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे कायदेशीर अडथळ्यांचा सखोल अभ्यास केला जाणार आहे.
महाराष्ट्र: मंत्र्यांच्या बंगल्यावरील कामात भ्रष्टाचार उघड; चौकशीत अभियंते दोषी
मंत्री बंगल्यांच्या नूतनीकरणात ३० कोटींचा घोटाळा 'लोकमत'ने उघडकीस आणला. चौकशीत अभियंते दोषी आढळले. अहवालानंतरही दोषी अभियंते पदावर कायम आहेत. यावरून भ्रष्टाचाराला पाठीशी घातल्याचा आरोप होत आहे.
राष्ट्रीय: 'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
इस्रोच्या 'बाहुबली' रॉकेटने ४,४१० किलो वजनाचा 'सीएमएस-3' उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केला. यामुळे हिंदी महासागरात भारतीय नौदलाची दळणवळण व देखरेख क्षमता वाढणार आहे. हे प्रक्षेपण भारताच्या अवकाश कार्यक्रमात आणि नौदल सामर्थ्यात पुढील १५ वर्षांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. हा भारतासाठी गौरवाचा क्षण आहे.
क्रिकेट: भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य
भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला हरवून पहिली वहिली महिला विश्वचषक स्पर्धा जिंकत नवा इतिहास रचला आहे. शफाली वर्मा आणि दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने आफ्रिकेला ५२ धावांनी पराभूत केले. १३ व्या हंगामात भारताच्या रुपात २५ वर्षांनी महिला वर्ल्ड कप इतिहासात नवा आणि चौथा नवा वर्ल्ड चॅम्पियन संघ मिळाला आहे.
राष्ट्रीय: 'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरा येथील जाहीर सभेतून काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (RJD) वर तीव्र प्रहार केला. त्यांनी म्हटले की, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशामुळे देशाचा आत्मविश्वास वाढला, मात्र काँग्रेस आणि त्यांचे सहयोगी पक्ष अस्वस्थ झाले.
फिल्मी: मलायका अरोरा पुन्हा प्रेमात?कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली
मलायका अरोरा काही दिवसांपूर्वी हॉलिवूड गायक एनरिक्यू इगलिसिसच्या कॉन्सर्टला पोहोचली होती. अनेक सेलिब्रिटी या कॉन्सर्टला आले होते. सर्वांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. एका व्हिडीओत मलायका एका मिस्ट्री मॅनसोबत कॉन्सर्ट एन्जॉय करताना दिसली. ती त्याच्यासोबत हसत होती, नाचत होती, गात होती. यावरुन तो नक्कीच कोणी खास असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी लावला.