Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन कमी करण्याची योग्य पद्धत माहिती करुन घ्या, माहितीच्या माऱ्यात तब्येतीचे हाल नको..

वजन कमी करण्याची योग्य पद्धत माहिती करुन घ्या, माहितीच्या माऱ्यात तब्येतीचे हाल नको..

Weight Loss Tips : डॉक्टर अंजना कालिया यांनी Indiatv.in ला वजन कमी करण्यासाठी काय करावं आणि काय करू नये याबाबत सांगितलं आहे. वजन कमी करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्या खाण्या-पिण्याची काळजी घेतली पाहिजे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 20:15 IST2025-06-04T11:27:45+5:302025-06-04T20:15:35+5:30

Weight Loss Tips : डॉक्टर अंजना कालिया यांनी Indiatv.in ला वजन कमी करण्यासाठी काय करावं आणि काय करू नये याबाबत सांगितलं आहे. वजन कमी करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्या खाण्या-पिण्याची काळजी घेतली पाहिजे.

What is the right way to lose weight know what to eat what to not | वजन कमी करण्याची योग्य पद्धत माहिती करुन घ्या, माहितीच्या माऱ्यात तब्येतीचे हाल नको..

वजन कमी करण्याची योग्य पद्धत माहिती करुन घ्या, माहितीच्या माऱ्यात तब्येतीचे हाल नको..

Weight Loss Tips : लठ्ठपणा एकप्रकारे आज एक महामारी झाला आहे. जगभरातील लोक लठ्ठपणामुळे वैतागलेले आहेत. लहान मुले असो वा मोठे सगळ्यांनाच ही समस्या होत आहे. एकदा का लठ्ठपणा वाढला तर शरीरात अनेक आजार घर करायला वेळ लागत नाही. डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर, हृदयरोग आणि इतरही अनेक आजार शरीरात घर करतात. त्यामुळे लठ्ठपणा किंवा वजन कमी करणं खूप महत्वाचं ठरतं. पण वजन कमी करण्याची योग्य पद्धत फॉलो करणं खूप महत्वाचं ठरतं. द्वारकातील ब्लूम क्लीनिक्समधील आयुर्वेदिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट डॉ. अंजना कालिया यांनी वजन कमी करण्याची योग्य पद्धत सांगितली आहे.

वजन कमी करण्यासाठी काय खावं?

डॉक्टर अंजना कालिया यांनी Indiatv.in ला वजन कमी करण्यासाठी काय करावं आणि काय करू नये याबाबत सांगितलं आहे. वजन कमी करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्या खाण्या-पिण्याची काळजी घेतली पाहिजे. आहारात फायबर असलेल्या गोष्टी जसे की, दलिया, डाळी, हिरव्या पालेभाज्या, सफरचंद, संत्री अशी फळं आणि कडधान्याचा समावेश असावा. तसेच आहारात प्रोटीन असलेल्या गोष्टी जसे की, अंडी, टोफू, लो-फॅट पनीर आणि डाळींचा समावेश असावा. या गोष्टी खाल्ल्यानं भूक कमी लागते. तसेच मेटाबॉलिज्मही बूस्ट होतं. सकाळचा नाश्ता सुद्धा असाच पौष्टिक असायला हवा.

वजन कमी करण्यासाठी काय खाऊ नये?

तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर जंक फूड, तळलेले पदार्थ, गोड पेय, पांढरे ब्रेड, पास्ता, मिठाई, जास्त साखर आणि मीठ या गोष्टी टाळल्या पाहिजे. तसेच बाजारात मिळणारे पॅकेज्ड फूड आणि प्रोसेस्ड फूडमध्ये भरपूर कॅलरी व ट्रान्स फॅट असतं जे वजन वाढण्यासाठी कारणीभूत असतं.

वजन कमी करण्यासाठी किती करावा एक्सरसाईज?

वजन कमी करण्यासाठी नियमितपणे व्यायाम करणं फार गरजेचं असतं. आठवड्यातून किमान 5 दिवस, रोज 45 मिनिटं ते 1 तास एक्सरसाईज करायला हवा. यात ब्रिस्क वॉक, धावणं, सायकलिंग, स्वीमिंग, योगा यांचा समावेश असावा. सोबतच आठवड्यातून 2 ते 3 दिवस मसल्स स्ट्रेंथ वाढवणारे व्यायाम करा. 

Web Title: What is the right way to lose weight know what to eat what to not

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.