८ - ९ वर्षांच्या मुलीला पाळी येण्यापूर्वी दिसतात ५ लक्षणं, पाहा शरीरात होणारे बदल ओळखून आईबाबांनी काय करायला हवे...

Updated:April 18, 2026 16:30 IST2026-04-18T15:14:20+5:302026-04-18T16:30:11+5:30

5 early signs before first period in girls : signs of puberty before menstruation : what happens before first period starts : igns before first period : लहान वयात पाळी सुरू होण्यापूर्वी दिसणारी सुरुवातीची महत्त्वाची लक्षणं कोणती ते पाहा...

८ - ९ वर्षांच्या मुलीला पाळी येण्यापूर्वी दिसतात ५ लक्षणं, पाहा शरीरात होणारे बदल ओळखून आईबाबांनी काय करायला हवे...

मुलींच्या आयुष्यातील 'मासिक पाळी' हा टप्पा शारीरिक आणि मानसिक बदलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. पूर्वी साधारणपणे १३ ते १५ व्या वर्षी सुरू होणारी पाळी, बदलती लाईफस्टाईल आणि आहारामुळे आता वयाच्या ९ व्या किंवा १० व्या वर्षीच येताना दिसत आहे. अचानक आलेल्या या बदलामुळे लहान मुली गोंधळून जाऊ शकतात किंवा घाबरू शकतात(signs before first period).

८ - ९ वर्षांच्या मुलीला पाळी येण्यापूर्वी दिसतात ५ लक्षणं, पाहा शरीरात होणारे बदल ओळखून आईबाबांनी काय करायला हवे...

पण, मासिक पाळी ही कधीच अचानक येत नाही. निसर्गतः शरीर पाळी येण्याच्या ६ ते १२ महिने आधीच काही विशिष्ट संकेत देऊ लागतं. जर पालकांनी, विशेषतः मातांनी ही लक्षणं वेळीच ओळखली, तर आपण आपल्या मुलीला या बदलासाठी मानसिकदृष्ट्या तयार करू शकतो आणि तिला योग्य तो आधार देऊ शकतो. यामुळे तिचा हा प्रवास भीतीदायक न ठरता सहज आणि नैसर्गिक होईल.

८ - ९ वर्षांच्या मुलीला पाळी येण्यापूर्वी दिसतात ५ लक्षणं, पाहा शरीरात होणारे बदल ओळखून आईबाबांनी काय करायला हवे...

लहान मुलींना अगदी कमी वयातच पाळी आली असता, घाबरण्याऐवजी या बदलांकडे समजूतदारपणे पाहणं गरजेचं आहे. लहान वयात पाळी सुरू होण्यापूर्वी दिसणारी सुरुवातीची महत्त्वाची लक्षणं कोणती दिसतात ते पाहूयात.

८ - ९ वर्षांच्या मुलीला पाळी येण्यापूर्वी दिसतात ५ लक्षणं, पाहा शरीरात होणारे बदल ओळखून आईबाबांनी काय करायला हवे...

मुलींच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांचा हा सर्वात महत्त्वाचा आणि प्राथमिक संकेत आहे. साधारणपणे मासिक पाळी सुरू होण्याच्या ६ महिने ते १ वर्ष आधी हा स्त्राव दिसू लागतो. हा पूर्णपणे नैसर्गिक आणि शरीराची आतील स्वच्छता राखणारी प्रक्रिया आहे, त्यामुळे पालकांनी मुलीला हे नॉर्मल असल्याचे समजावून सांगावे जेणेकरून ती घाबरणार नाही.

८ - ९ वर्षांच्या मुलीला पाळी येण्यापूर्वी दिसतात ५ लक्षणं, पाहा शरीरात होणारे बदल ओळखून आईबाबांनी काय करायला हवे...

निप्पलच्या खाली लहान आणि हलकी सूज जाणवणे, हे वयात येण्याचे (Puberty) सर्वात पहिले बाह्य लक्षण आहे. साधारणपणे मासिक पाळी सुरू होण्याच्या १.५ ते २.५ वर्षे आधी हा बदल शरीरात दिसून येतो. सुरुवातीला हा भाग स्पर्श केल्यास थोडा संवेदनशील किंवा दुखणारा असू शकतो, परंतु हा विकास पूर्णपणे नैसर्गिक असून मुलीच्या शरीरातील वाढीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

८ - ९ वर्षांच्या मुलीला पाळी येण्यापूर्वी दिसतात ५ लक्षणं, पाहा शरीरात होणारे बदल ओळखून आईबाबांनी काय करायला हवे...

मुलींच्या शरीरात हार्मोन्सची पातळी बदलू लागली की बगल आणि प्रायव्हेट भागात लव किंवा बारीक केस येऊ लागतात. याच काळात घाम येण्याचे प्रमाण वाढते आणि शरीराला एक विशिष्ट प्रकारचा वास येऊ लागतो, ज्याला आपण 'बॉडी ओडर' म्हणतो. हा बदल मुलगी वयात येत असल्याचे स्पष्ट संकेत देतो, त्यामुळे अशा वेळी तिला वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगणे गरजेचे असते.

८ - ९ वर्षांच्या मुलीला पाळी येण्यापूर्वी दिसतात ५ लक्षणं, पाहा शरीरात होणारे बदल ओळखून आईबाबांनी काय करायला हवे...

मुलींची उंची एकाएकी वेगाने वाढू लागणे, हे पाळी येण्यापूर्वीचे एक महत्त्वाचे शारीरिक लक्षण आहे. जेव्हा ही वाढ होत असते, त्यानंतर साधारण ६ ते १२ महिन्यांच्या कालावधीत पहिली मासिक पाळी येऊ शकते. हा बदल सूचित करतो की शरीरातील हाडांची आणि स्नायूंची वाढ वयात येण्याच्या प्रक्रियेनुसार वेगाने होत आहे.

८ - ९ वर्षांच्या मुलीला पाळी येण्यापूर्वी दिसतात ५ लक्षणं, पाहा शरीरात होणारे बदल ओळखून आईबाबांनी काय करायला हवे...

शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन यांसारख्या हार्मोन्सची पातळी वाढू लागल्यामुळे मुलींच्या स्वभावात बदल जाणवू लागतात. विनाकारण चिडचिड होणे, लहान गोष्टींवरून रडू येणे, अतिसंवेदनशीलता किंवा मनात एक प्रकारची चिंता निर्माण होणे असे भावनिक चढ-उतार दिसू शकतात. अशा वेळी मुलींना ओरडण्याऐवजी त्यांना प्रेमळ आधाराची आणि संवादाची जास्त गरज असते.

८ - ९ वर्षांच्या मुलीला पाळी येण्यापूर्वी दिसतात ५ लक्षणं, पाहा शरीरात होणारे बदल ओळखून आईबाबांनी काय करायला हवे...

हे केवळ शारीरिक बदल नसून, भावनिक बदल असतात, अशावेळी तिला गरज असते ती तुमच्या आधाराची... तिच्याशी मनमोकळेपणाने आणि शांतपणे संवाद साधणे. पाळी येण्यापूर्वीच तिला या नैसर्गिक प्रक्रियेची योग्य माहिती देऊन मानसिकदृष्ट्या तयार करणे. तिला हे पटवून देणे की, शरीरात होणारे हे बदल पूर्णपणे सामान्य आहेत आणि तुम्ही प्रत्येक पावलावर तिच्यासोबत आहात.