२ मिनिटांत तव्यावरचे काळे डाग- चिकटपणा कमी करण्याचा घरगुती उपाय- तवा दिसेल नवाकोरा

Updated:April 17, 2026 16:33 IST2026-04-17T16:30:47+5:302026-04-17T16:33:59+5:30

Home remedies for burnt tawa: Easy way to clean greasy tawa: स्वयंपाकघरातील साध्या गोष्टींचा वापर करुन १० मिनिटांत आपण काळाकुट्ट झालेला तवा चांदीसारखा चमकवू शकतो.

२ मिनिटांत तव्यावरचे काळे डाग- चिकटपणा कमी करण्याचा घरगुती उपाय- तवा दिसेल नवाकोरा

स्वयंपाकघरात रोजच्या वापरामुळे तवा काळा पडणे किंवा त्यावर अन्नाचे जळकट थर साचणे ही सामान्य समस्या आहे. अनेकदा पोळ्या करताना किंवा पराठे भाजताना तेल आणि उष्णतेमुळे तव्यावर डाग तयार होतात. जे साध्या साबण किंवा लिक्विडने घासूनही निघत नाहीत. तासनतास तवा घासल्यामुळे हात तर दुखतातच, पण तव्याची चकाकीही निघून जाते. अशावेळी आपल्याला नवीन तवा घेण्याशिवाय पर्याय नसतो. (Home remedies for burnt tawa)

२ मिनिटांत तव्यावरचे काळे डाग- चिकटपणा कमी करण्याचा घरगुती उपाय- तवा दिसेल नवाकोरा

स्वयंपाकघरातील साध्या गोष्टींचा वापर करुन १० मिनिटांत आपण काळाकुट्ट झालेला तवा चांदीसारखा चमकवू शकतो. पाहूयात काही घरगुती उपाय. (Easy way to clean greasy tawa)

२ मिनिटांत तव्यावरचे काळे डाग- चिकटपणा कमी करण्याचा घरगुती उपाय- तवा दिसेल नवाकोरा

सगळ्यात आधी तवा गरम करुन त्यावर चमचाभर मीठ घाला. आता अर्धा लिंबू घेऊन ते मीठासोबत तव्यावर घासून घ्या. त्यानंतर त्यावर गरम पाणी ओता आणि ५ मिनिटे राहू द्या. ज्यामुळे डाग सहज निघतील. काथ्याने घासल्यास तवा लख्ख होईल.

२ मिनिटांत तव्यावरचे काळे डाग- चिकटपणा कमी करण्याचा घरगुती उपाय- तवा दिसेल नवाकोरा

तव्यावर चमचाभर बेकिंग सोडा पसरवा आणि त्यावर थोडे व्हिनेगर घाला. बुडबुडे यायला सुरुवात होईल तेव्हा जुन्या टूथब्रश किंवा स्क्रबर घेऊन घासा. व्हिनेगरमधील अॅसिड आणि सोड्याची रासायनिक प्रक्रिया थर काढून टाकण्यास मदत करते.

२ मिनिटांत तव्यावरचे काळे डाग- चिकटपणा कमी करण्याचा घरगुती उपाय- तवा दिसेल नवाकोरा

घरात असलेली जुनी एक्सपायरी झालेली टॅबलेट गोळी घ्या. तव्यावर थोडे पाणी घालून ती गोळी जळकट भागावर घासल्याने डाग निघण्यास मदत होईल.

२ मिनिटांत तव्यावरचे काळे डाग- चिकटपणा कमी करण्याचा घरगुती उपाय- तवा दिसेल नवाकोरा

तव्यावर खूप जुना आणि जाड काळा थर साचला असेल तर विटेचा छोटा तुकडा घेऊन त्याने तवा घासा. खरखरीतपणामुळे जळालेला भाग लवकर निघतो. नॉन-स्टिक तव्यासाठी ही पद्धत वापरु नका, तवा खराब होईल.

२ मिनिटांत तव्यावरचे काळे डाग- चिकटपणा कमी करण्याचा घरगुती उपाय- तवा दिसेल नवाकोरा

जर आपला नॉन-स्टिक तवा खराब झाला असेल, तर कधीही तारेच्या घासणीने घासू नका. त्यात पाणी आणि थोडे डिश वॉश घालून उकळवा. नंतर स्पंजने हलक्या हाताने साफ करा.