निस्तेज कोरड्या त्वचेला ५ मिनिटांत फ्रेश करण्याचा उपाय- जावेद हबीब सांगतात मस्त ट्रिक
Updated:April 17, 2026 13:44 IST2026-04-17T13:39:32+5:302026-04-17T13:44:31+5:30

बऱ्याचदा असं होतं की आपली त्वचा खूप डल वाटू लागते. त्वचेचा ड्रायनेसही वाढायला लागतो. त्वचेवरचा ग्लो निघून जातो आणि ती अगदी निस्तेज दिसायला लागते.(home hacks to get rid of dull and dry skin)
असं झालं की आपण महागड्या ब्यूटी ट्रिटमेंट्स करायला जातो. ते केल्याने २- ३ दिवस त्वचा छान तर दिसते, पण पुन्हा पहिल्यासारखीच होऊन जाते. मग उगाच पैसे वाया गेले असं वाटायला लागतं.
म्हणूनच आता हा एक अगदी सोपा उपाय पाहा. हा उपाय अगदी चकटफू असून त्यासाठी तुम्हाला अजिबातच वेगळे पैसे खर्च करण्याची गरज नाही.
आता बऱ्याचदा आपण केळी विकत आणतो. केळी खातो आणि त्याचे साल मात्र टाकून देतो. पण कचरा वाटणारे हे साल त्वचेसाठी अतिशय उपयुक्त असतात. हे साल आतल्या बाजुने त्वचेवर चोळा आणि ५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. त्वचेमध्ये निश्चितच छान बदल जाणवेल.(how to use banana peel for glowing skin?)
दुसरा उपाय तुम्ही असाही करू शकता की केळीच्या सालाच्या आतल्या बाजुवर थोडी कॉफी पावडर आणि थोडी पिठीसाखर घाला. त्यावर थोडं लिंबू पिळा आणि हे साल तुमच्या चेहऱ्यावर चोळा. पिठीसाखर, कॉफी, लिंबू आणि केळी यांचा एकत्रित परिणाम तुम्हाला त्वचेवर जणू जादू करेल. एकदा हा प्रयोग करून बघाच..