भाजीत तेल जास्तच झालं? ३ सोप्या ट्रिक्स, वरचा तवंग निघून तेल होईल कमी

Updated:April 17, 2026 09:40 IST2026-04-17T09:37:05+5:302026-04-17T09:40:02+5:30

भाजीत तेल जास्तच झालं? ३ सोप्या ट्रिक्स, वरचा तवंग निघून तेल होईल कमी

कधी कधी घाई गडबडीत भाजीमध्ये किंवा आमटीमध्ये गरजेपेक्षा जास्त तेल पडतं आणि मग तेलाचा तवंग वर तरंगताना दिसू लागतो. एवढं तेल पाहून हेल्थ फ्रिक लाेकांना तो पदार्थ अजिबातच खावा वाटत नाही.(how to remove excess oil from cooked sabji?)

भाजीत तेल जास्तच झालं? ३ सोप्या ट्रिक्स, वरचा तवंग निघून तेल होईल कमी

शिवाय एवढं जास्त प्रमाणात असलेलं तेल आरोग्यासाठीही चांगलं नाहीच. म्हणूनच पुढे सांगितलेले काही उपाय करा आणि भाजीमध्ये जास्त झालेलं तेल कसं कमी करायचं ते पाहा..(3 cooking tips to remove extra oil from cooked sabji)

भाजीत तेल जास्तच झालं? ३ सोप्या ट्रिक्स, वरचा तवंग निघून तेल होईल कमी

पहिला उपाय म्हणजे भाजी एखाद्या उभट भांड्यात काढा आणि ती एकाजागी तशीच स्थिर ठेवा. तिच्यामधलं तेल वर आलं की पळीने किंवा खोलगट चमच्याने ते अलगद काढून घ्या.

भाजीत तेल जास्तच झालं? ३ सोप्या ट्रिक्स, वरचा तवंग निघून तेल होईल कमी

बर्फाचा तुकडा भाजीमध्ये फिरवल्यास जास्तीचं तेल त्याला लगेच चिटकून जातं असंही म्हणतात. हा प्रयोग करून पाहायलाही हरकत नाही.

भाजीत तेल जास्तच झालं? ३ सोप्या ट्रिक्स, वरचा तवंग निघून तेल होईल कमी

टिशू पेपर भाजीवरून अलगद फिरवा. अतिरिक्त तेल शोषून घ्यायला तो नक्कीच उपयुक्त ठरतो.