उन्हाळ्यात किचनमध्ये शिरताच घामाघूम होता? ८ गोष्टी करा, किचन राहील थंडगार-हवेशीर वाटेल
Updated:April 17, 2026 20:18 IST2026-04-17T19:52:44+5:302026-04-17T20:18:54+5:30
How To Keep Kitchen Cool In Summers : कुकरचा वापर अधिक करा. ज्यामुळे उष्णता बाहेर कमी पडते आणि अन्न लवकर शिजते.

उन्हाळ्याच्या कडाक्याच्या किचनमध्ये काम करणं खूपच कष्टाचं ठरतं. किचनमध्ये तापमान कमी ठेवण्यासाठी आणि स्वयंपाक करताना सुसह्य वाटावे यासाठी काही टिप्स उपयोगी ठरतील. (How To Keep Kitchen Cool In Summers)
स्वयंपाक करताना एक्झॉस्ट फॅन सतत सुरू ठेवा. जेणेकरून गरम हवा आणि वाफ बाहेर येईल. शक्य असल्यास खिडक्या उघड्या ठेवा. (How To Cool A Kitchen In The Summer)
दुपारी जेव्हा ऊन जास्त असते तेव्हा स्वयंपाक करणं टाळा. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ऊन कमी झाल्यावर जास्तीत जास्त स्वयंपाक उरकून घ्या.
किचनमध्ये जास्त उष्णता निर्माण करणारे पिवळे बल्ब टाळा. त्याऐवजी थंड प्रकाश देणारे एलईडी बल्बब वापरा आणि गरज नसेल तेव्हा लाईट्स बंद करा.
ओव्हन किंवा टोस्टर यांसारखी उपकरणं उष्णता निर्माण करतात. त्यामुळे उन्हाळ्यात त्यांचा वापर कमीत कमी करा.
किचनच्या खिडकीतून थेट ऊन येत असेल तर तिथे बांबूचे पडदे किंवा जाड कापडी पडदे लावा. यामुळे सुर्याची उष्णता आत येणार नाही.
उन्हाळ्यात जास्तवेळ गॅससमोर उभं राहावं लागेल असे पदार्थ टाळा. वाफेवरचे किंवा झटपट होणारे हलके पदार्थ तयार करण्यावर भर द्या.
कुकरचा वापर अधिक करा. ज्यामुळे उष्णता बाहेर कमी पडते आणि अन्न लवकर शिजते किचनच्या खिडकीजवळ छोटी रोपं लावा. यामुळे वातावरणात थोडा गारवा टिकून राहण्यास मदत होते.