Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > जाडजूड मांड्या आणि हिप्सवरील चरबी होईल कमी! आहारात हवेच ८ पदार्थ - सुपरफूड देतील स्लिम - फिट लूक...

जाडजूड मांड्या आणि हिप्सवरील चरबी होईल कमी! आहारात हवेच ८ पदार्थ - सुपरफूड देतील स्लिम - फिट लूक...

reduce stubborn hip & thigh fat with diet & exercises : food to reduce hip & thigh fat : तासंतास वर्कआऊट करूनही हीप्स - मांड्यांची चरबी कमी होत नाही? खा 'हे' ८ पदार्थ - फॅट्स होतील गायब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2026 13:23 IST2026-05-16T13:15:41+5:302026-05-16T13:23:13+5:30

reduce stubborn hip & thigh fat with diet & exercises : food to reduce hip & thigh fat : तासंतास वर्कआऊट करूनही हीप्स - मांड्यांची चरबी कमी होत नाही? खा 'हे' ८ पदार्थ - फॅट्स होतील गायब...

reduce stubborn hip & thigh fat with diet & exercises food to reduce hip & thigh fat | जाडजूड मांड्या आणि हिप्सवरील चरबी होईल कमी! आहारात हवेच ८ पदार्थ - सुपरफूड देतील स्लिम - फिट लूक...

जाडजूड मांड्या आणि हिप्सवरील चरबी होईल कमी! आहारात हवेच ८ पदार्थ - सुपरफूड देतील स्लिम - फिट लूक...

सध्याच्या बिझी आणि धावपळीच्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे अनेकांना शरीराच्या काही विशिष्ट भागांवर चरबी वाढण्याची समस्या जाणवते. विशेषतः हीप्स आणि थाईजवरील वाढलेले फॅट्स अनेकजणींसाठी मोठ्या चिंतेचं कारणं ठरते. वाढलेल्या हीप्स आणि थाईज शेपमुळे शरीराचा शेप बदलतो. फक्त व्यायाम करूनच नाही तर योग्य आहार घेतल्यानेही या भागांवरील चरबी कमी करण्यात मदत होऊ शकते. काही पौष्टिक आणि लो-कॅलरीज पदार्थ शरीरातील अतिरिक्त फॅट बर्न करण्यास मदत करतात तसेच मेटाबॉलिझम वाढवून वजन नियंत्रणात ठेवतात(reduce stubborn hip & thigh fat with diet & exercises).

वजन कमी करताना शरीराच्या इतर भागांवरची चरबी सहज वितळते, पण 'हीप्स' (Hips) आणि 'थाईज' (Thighs) म्हणजेच मांड्यांवर जमा झालेली चरबी कमी करणे हे अनेकांसाठी सर्वांत मोठे कठीण काम असते. तासंतास जिममध्ये घाम गाळला, वेगवेगळे व्यायाम केले, तरीही लोअर बॉडीचे हे हट्टी फॅट्स (Stubborn Fat) कमी व्हायचं नाव घेत नाहीत. फक्त व्यायाम करून मांड्या आणि हिप्सचे फॅट्स कमी होत नाहीत, जोपर्यंत आपण आपल्या आहारात योग्य बदल करत नाही. आपल्याकडे असे काही विशेष खाद्यपदार्थ आहेत, जे शरीरातील 'इस्ट्रोजेन' (Estrogen) हार्मोन्सची पातळी नियंत्रित ठेवतात आणि थेट लोअर बॉडीच्या चरबीवर (food to reduce hip & thigh fat) परिणाम करतात. जिममध्ये न जाताही, एक्सरसाइज - योग्य डाएटच्या मदतीने (best diet for hips & thigh fat loss) हिप्स आणि थाईज टोन्ड करुन चांगला शेप देऊ शकता.  

हीप्स-मांड्यांचे फॅट्स कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा... 

१. ब्रोकली (Broccoli) :- ब्रोकलीमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्ससारखे अनेक पोषक घटक असतात. यातील फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते, ज्यामुळे अति खाणे टाळता येते. तसेच, ब्रोकलीमध्ये असलेले 'सल्फोराफेन' (Sulforaphane) शरीरात अतिरिक्त चरबी साठून राहण्यास प्रतिबंध करते.

२. फ्लॉवर / फूलकोबी (Cauliflower) :- फ्लॉवरमध्ये कॅलरीजचे प्रमाण अत्यंत कमी आणि फायबरचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. हे खाल्ल्याने पोट लवकर भरते आणि वारंवार लागणाऱ्या भुकेवर नियंत्रण राहते.

रणरणत्या उन्हाळ्यात गरमागरम चहा पिणं बाधतं? आल्याऐवजी घाला 'हा' पदार्थ - शरीर राहील थंड वाटेल फ्रेश... 

आठवड्यातून एकदा कमोडमध्ये बर्फाचे तुकडे का टाकावेत? फायद्याची आहे व्हायरल ट्रिक - विनामेहनत कमोड स्वच्छ... 

३. जवस / अळशीच्या बिया (Flaxseeds) :- जवासामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि विद्राव्य (Soluble) फायबर भरपूर प्रमाणात असते. हे फायबर पचनक्रिया संथ करून पोट प्रदीर्घ काळ भरल्याची जाणीव करून देते, ज्यामुळे काहीतरी अनहेल्दी खाण्याची इच्छा (Cravings) कमी होते.

४. मूग डाळ (Moong Dal) :- प्रोटीन आणि फायबरयुक्त असलेली मूग डाळ स्नायूंना बळकटी देते आणि शरीराचा मेटाबॉलिज्म (Metabolism - चयापचय क्रिया) ॲक्टिव्ह ठेवते. ही डाळ खाल्ल्याने शरीरात तासंतास एनर्जी टिकून राहते.

५. ओट्स (Oats) :- ओट्समध्ये 'बीटा-ग्लुकन' (Beta-glucan) नावाचे फायबर भरपूर प्रमाणात असते, जे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू देत नाही. यामुळे अचानक लागणारी भूक आणि जंक फूड खाण्याची इच्छा कमी होण्यास मदत होते.

२१ दिवस पपई 'या' पद्धतीने खा! ढेरी होईल कमी, फॅटी लिव्हर आणि वेटलॉसही होईल झटपट, व्हाल सुपरफिट... 

६. ग्रीन टी (Green Tea) :- ग्रीन टीमध्ये 'कॅटेचिन्स' (Catechins) आणि कॅफीन असते, जे शरीराची कॅलरी बर्न करण्याची क्षमता वाढवतात. तसेच, हे शरीरातील फॅट्स वितळवण्याच्या प्रक्रियेला (Fat Oxidation) गती देते.

७. बेरीज (Berries) :- स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी यांसारख्या बेरीजमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर मोठ्या प्रमाणावर असते. जर तुम्हाला वजन कमी करताना गोड खाण्याची तीव्र इच्छा झाली, तर ती नियंत्रणात ठेवण्यासाठी बेरीज हा एक हेल्दी आणि चविष्ट पर्याय आहे.

८. लसूण (Garlic) :- लसणामध्ये 'ॲलिसिन' (Allicin) नावाचा घटक असतो, जो शरीराची अंतर्गत सूज (Inflammation) कमी करतो आणि मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करतो. यामुळे पचनक्रिया देखील उत्तम राहते.

फक्त एक-दोन पदार्थ खाण्याने वजन झटकन कमी होत नाही. त्यासाठी सकस आहार, पुरेशी झोप, मानसिक तणावावर नियंत्रण आणि नियमित व्यायाम असणे अत्यंत गरजेचे आहे.

Web Title : जांघ और कूल्हे की चर्बी कम करें: स्लिम लुक के लिए 8 सुपरफूड

Web Summary : आहार से कूल्हे और जांघ की चर्बी को लक्षित करें। ब्रोकली, फूलगोभी, अलसी, मूंग दाल, ओट्स, ग्रीन टी, बेरीज और लहसुन चयापचय को बढ़ावा देते हैं और वसा जलाते हैं। सर्वोत्तम परिणामों के लिए व्यायाम के साथ मिलाएं।

Web Title : Reduce Thigh and Hip Fat: 8 Superfoods for a Slim Look

Web Summary : Target hip and thigh fat with diet. Broccoli, cauliflower, flaxseeds, moong dal, oats, green tea, berries, and garlic boost metabolism and burn fat. Combine with exercise for best results.