दिशा पाटनी (Disha Patani) ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री असून ती आपल्या अभिनयासह सौंदर्य आणि खासकरून फिटनेससाठी बरीच चर्चेत असते. दिशा पाटनी फिट राहण्यासाठी काय करते, तिचा आहार कसा आहे, लाईफस्टाईल कशी आहे असे प्रश्न अनेकांना पडतात. दिशा पाटनीच्या फिट राहण्यामागचं सोपं सिक्रेट समजून घेऊ. (Disha Patani Fitness Secrets What Is The OMAD Diet That Disha Patani Has Been Following For Years What All Is Included In This Diet)
फक्त भारतातच नाही तर विदेशातही तिचे फॅन्स आहेत. ही अभिनेत्री इतकी फिट कशी राहते असा प्रश्न अनेकांना पडतो. तिचे बरेच फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मेंटेन फिगर मिळवण्यासाठी ती एक खास डाएट फॉलो करते ते म्हणजे OMAD डाएट म्हणजेच वन मील ए डे यात ती दिवसभरातून फक्त एकदा जेवते.
OMAD डाएट नेमकं काय असतं? (What Is OMAD Diet)
अनेक वर्षांपासून दिशा सातत्यानं हे डाएट फॉलो करत आहे. ती आपल्या फिटनेसचं क्रेडीट या डाएटला देते. या प्रकारच्या डाएटमध्ये दिवसभरातून फक्त एकदाच खाल्लं जातं. बाकीचा वेळ चहा, कॉफी किंवा पाणी प्यायले जाते. ज्यामुळे शरीर फॅट बर्न होते आणि वजन नियंत्रणात राहते.
दिशा या डाएटमध्ये काय खाते?
दिशानं एका मुलाखतीत सांगितलं की तिनं मलंग चित्रपटाच्यावेळी हे डाएट खूप कडक पाळलं होतं. या डाएटमध्ये संध्याकाळच्यावेळेस ती जेवायची. जवळपास ४ ते ८ च्या दरम्यान आहार घेतला जातो. यात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश असतो. ज्यात कार्ब्स, ब्राऊन राईस, चपाती किंवा ब्रेड असते. यात भाज्या जास्त प्रमाणात असतात. दिशा सांगते की साधं जेवण जेवते. तिला रोज एकाच प्रकारचं जेवायला आवडतं. कोणतेही नवीन एक्सपरिमेंट्स करायला आवडत नाहीत.
सकाळच्यावेळी काय करते?
सकाळी उठल्यानंनंतर दिशा २ ते ३ ग्लास पाणी पिते. त्यानंतर ती हळदीचं पाणी पिते. घश्यासाठी ती स्पेशल चहा पिते. नंतर इंटरमिटेंट फास्टिंग फॉलो करते. जर तुम्हालाही हे डाएट फॉलो करायचं असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. सर्वांसाठीच हे उत्तम ठरतं असं नाही. महिलांना हॉर्मोनल समस्या होऊ शकतात. मसल्स कमी झाल्यामुळे थकवा कमी होतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हे डाएट करा.
