Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > रडताना डोळ्यातून पाणी येतंच, पण नाकाचा काय संबंध, ते का वाहू लागतं? पाहा काय असतं कनेक्शन

रडताना डोळ्यातून पाणी येतंच, पण नाकाचा काय संबंध, ते का वाहू लागतं? पाहा काय असतं कनेक्शन

Interesting Facts : डोळे आणि नाकामध्ये एक थेट कनेक्शन असतं, जे बहुतेकांना माहीत नसतं. डोळ्यात तयार होणारे अश्रू बाहेर पडतात तेव्हा त्यांचा मार्ग नाकापर्यंतही जातो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 13:12 IST2026-04-15T12:35:38+5:302026-04-15T13:12:54+5:30

Interesting Facts : डोळे आणि नाकामध्ये एक थेट कनेक्शन असतं, जे बहुतेकांना माहीत नसतं. डोळ्यात तयार होणारे अश्रू बाहेर पडतात तेव्हा त्यांचा मार्ग नाकापर्यंतही जातो.

Why does nose run when you cry, know the facts | रडताना डोळ्यातून पाणी येतंच, पण नाकाचा काय संबंध, ते का वाहू लागतं? पाहा काय असतं कनेक्शन

रडताना डोळ्यातून पाणी येतंच, पण नाकाचा काय संबंध, ते का वाहू लागतं? पाहा काय असतं कनेक्शन

Interesting Facts : रडायला येणं ही शरीराची एक नॅचरल प्रोसेस आहे. कधी काही चांगलं घडल्यावर तर कधी काही वाईट घडल्यावर आपल्याला रडू येतं. आपण पाहिलं असेल की, जेव्हा रडायला येतं तेव्हा केवळ डोळ्यांतूनच नाही तर नाकातून सुद्धा पाणी येऊ लागतं. पण असं का होतं हे अनेकांना माहीत नसतं. खरंतर यामागे शरीराचं एक खास मेकॅनिज्म काम करत असतं. डोळे आणि नाकामध्ये एक थेट कनेक्शन असतं, जे बहुतेकांना माहीत नसतं. डोळ्यात तयार होणारे अश्रू बाहेर पडतात तेव्हा त्यांचा मार्ग नाकापर्यंतही जातो.

रडणंही केवळ एक भावनिक प्रोसेस नाही, तर शरीरासाठी आवश्यक प्रोसेस आहे. आपल्या डोळ्यातील लॅक्रिमल ग्लँड सतत अश्रू बनवत असतात. हे अश्रू डोळ्यांमध्ये ओलावा ठेवतात, धूळ दूर करतात आणि इन्फेक्शनपासून बचाव करतात. जेव्हा आपण जास्त रडतो तेव्हा अश्रूंचं प्रमाण अचानक वाढतं आणि ते डोळ्यातून बाहेर येऊ लागतात.
   
डोळे आणि नाकाच्या मधे एक पातळ नळी असते, या नळीला नासोलॅक्रिमल डक्ट म्हटलं जातं. अश्रू डोळ्यांच्या कोपऱ्यांमधून या नळीवाटे नाकात पोहोचतात. सामान्यपणे ही प्रक्रिया हळूहळू होते, त्यामुळे आपल्याला जाणवत नाही. पण जेव्हा अश्रू जास्त तयार होतात, तेव्हा हाच मार्ग जास्त वेगाने काम करू लागतो. जेव्हा अश्रू जास्त तयार होतात, तेव्हा त्यांनी नासोलॅक्रिमल डक्ट पूर्णपणे भरतो.

त्यानंतर जास्तीचे अश्रू थेट नाकातून येऊ लागतात. हेच कारण आहे की, नाकात अचानक पाणी जमा होतं आणि वाहू लागतं. नाकात एक म्यूकस मेम्ब्रेन म्हणजे एक थर असतो. जो ओलावा कायम ठेवण्याचं काम करतो. जेव्हा अश्रू डोळ्यात पोहोचतात, तेव्हा हा थर पातळ होतो आणि बाहेर येऊ लागतो. त्यामुळे नाकातून स्वच्छ पाण्यासारखा पदार्थ बाहेर पडतो. 

रडण्यादरम्यान अश्रू तयार होत राहतात, त्यामुळे नाकात जाणारा तरल पदार्थही सतत वाढत राहतो. जोपर्यंत अश्रू येत राहतात, तोपर्यंत नाक वाहत राहतं. जसं रडणं बंद होतं, अश्रू तयार होणंही कमी होतं आणि नाक वाहणं बंद होतं.

Web Title : रोते समय आंसू और बहती नाक: क्या है संबंध, जानिए

Web Summary : आंसू एक नली के माध्यम से बहते हैं जो आंखों को नाक से जोड़ती है। अतिरिक्त आंसू इस नली को भर देते हैं, जिससे नाक बहने लगती है। यह शारीरिक क्रिया बताती है कि रोने पर नाक क्यों बहती है।

Web Title : Crying Tears and a Runny Nose: The Connection Explained

Web Summary : Tears drain through a duct connecting eyes to the nose. Excess tears overwhelm this duct, causing nasal discharge. This natural bodily mechanism explains why crying leads to a runny nose.