lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > बाप रे बाप! घटस्फोटानंतर किम कार्दशियनला पतीकडून मिळणार दरमहा चक्क १.६ कोटी..

बाप रे बाप! घटस्फोटानंतर किम कार्दशियनला पतीकडून मिळणार दरमहा चक्क १.६ कोटी..

Kim Kardashian and Kanye West: मुलांचा सांभाळ करण्यासाठी अमेरिकन सेलिब्रिटी किम कार्दशियनला तिच्या पतीकडून घटस्फोटानंतर जी काही पोटगी मिळणार आहे, तो आकडा ऐकूनच सर्वसामान्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2022 05:44 PM2022-11-30T17:44:47+5:302022-12-01T14:14:03+5:30

Kim Kardashian and Kanye West: मुलांचा सांभाळ करण्यासाठी अमेरिकन सेलिब्रिटी किम कार्दशियनला तिच्या पतीकडून घटस्फोटानंतर जी काही पोटगी मिळणार आहे, तो आकडा ऐकूनच सर्वसामान्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे..

After divorce Kim Kardashian to get ₹1.6 crore monthly for the child support settlement  | बाप रे बाप! घटस्फोटानंतर किम कार्दशियनला पतीकडून मिळणार दरमहा चक्क १.६ कोटी..

बाप रे बाप! घटस्फोटानंतर किम कार्दशियनला पतीकडून मिळणार दरमहा चक्क १.६ कोटी..

Highlightsकिमचं हे तिसरं लग्न होतं. मागील अनेक महिन्यांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या येत होत्या.

किम कार्दशियन नेहमीच वेगवेगळ्या कारणांवरून चर्चेत असते. कधी तिची बोल्ड विधाने चर्चेचं निमित्त ठरतात तर कधी तिच्या कपड्यांची आणि स्टाईलची चर्चा होते. मागील अनेक दिवसांपासून किम आणि तिचा पती कान्ये वेस्ट यांच्यातील वादाच्या आणि नंतर त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या येत होत्या. अखेरीस त्यांचा घटस्फोट झाला असून तब्बल १. ६ कोटी ($200000 or ₹1.6 crore monthly) पोटगी एवढ्या रकमेवर त्यांच्यातली सेटलमेंट झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळेच जगभरातील जे काही महागडे घटस्फोट आहेत, त्यात आता किम आणि कान्ये (Kim Kardashian and Kanye West) यांच्या घटस्फोटाचाही (divorce) उल्लेख केला जाईल, अशी चर्चा सध्या रंगते आहे. 

 

किम आणि कान्ये यांना चार मुले असून मुलांची कस्टडी दोघांकडेही सारखीच राहील, तरीही मुले किमसोबत तिच्या हिडन हिल्स प्रॉपर्टी येथे राहतील. शिवाय मुले जोपर्यंत १९ वर्षांची होत नाहीत तोपर्यंत त्यांना किमच्या राहत्या घरापासून १०० किमी अंतरापेक्षा जास्त लांब जाता येणार नाही, असं कोर्टाने सांगितलं आहे.

हिवाळ्यात गूळ- फुटाणे खाण्याचे ५ जबरदस्त फायदे, तब्येतीसाठी स्वस्तात मस्त टॉनिक, खा रोज..

AP न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार किम आणि तिचा नवरा हे दोघेही मुलांच्या शिक्षणाचा किंवा त्यांच्या इतर गोष्टींचा खर्च  समप्रमाणात करतील. तसेच दोघेही त्यांच्या त्यांच्या नावावर असलेली कर्ज स्वत:च फेडतील. मुलांच्या वाढदिवसाला दोन्हीही पालकांना मुलांसोबत राहता येईल. 

 

२०१२ पासून किम आणि कान्ये यांच्या अफेअरच्या चर्चा रंगत होत्या. २०१३ मध्ये त्यांना पहिले अपत्य झाले. त्यानंतर मे- २०१४ मध्ये दोघांनी लग्न केले. त्यानंतर त्यांना आणखी ३ अपत्ये झाली.

वेटलॉससाठी तुम्हीही लिंबू पिळून कॉफी पिता? खरंच त्याचा फायदा होतो की.. एक्सपर्ट सांगतात...

किमचं हे तिसरं लग्न होतं. मागील अनेक महिन्यांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या येत होत्या. पण मुलांची आणि प्रोपर्टीची कस्टडी आणि मिळणारी रक्कम यावर त्यांचे एकमत होत नव्हते. 

 

Web Title: After divorce Kim Kardashian to get ₹1.6 crore monthly for the child support settlement 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.