lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वेटलॉससाठी तुम्हीही लिंबू पिळून कॉफी पिता? खरंच त्याचा फायदा होतो की.. एक्सपर्ट सांगतात...

वेटलॉससाठी तुम्हीही लिंबू पिळून कॉफी पिता? खरंच त्याचा फायदा होतो की.. एक्सपर्ट सांगतात...

Black Coffee With Lemon: वेटलॉसचा हा नवा फंडा सध्या खूप जास्त लोक फॉलो करत आहेत. पण यातलं नेमकं काय खरं आणि काय खोटं हे तज्ज्ञांकडून जाणून घेतलेलंच बरं.(weight loss tips)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2022 03:54 PM2022-11-30T15:54:23+5:302022-11-30T16:11:17+5:30

Black Coffee With Lemon: वेटलॉसचा हा नवा फंडा सध्या खूप जास्त लोक फॉलो करत आहेत. पण यातलं नेमकं काय खरं आणि काय खोटं हे तज्ज्ञांकडून जाणून घेतलेलंच बरं.(weight loss tips)

Really black coffee with lemon is useful for weight loss? Read expert's opinion about having black coffee with lemon | वेटलॉससाठी तुम्हीही लिंबू पिळून कॉफी पिता? खरंच त्याचा फायदा होतो की.. एक्सपर्ट सांगतात...

वेटलॉससाठी तुम्हीही लिंबू पिळून कॉफी पिता? खरंच त्याचा फायदा होतो की.. एक्सपर्ट सांगतात...

Highlightsखरंच ही कॉफी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते का? याविषयी बघा एक्सपर्ट काय सांगत आहेत.

वजन कमी करण्यासाठी अनेक जणांचे आपापल्या परीने प्रयत्न सुरू असतात. त्यात कुणी खरोखरंच डॉक्टरांचा, आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊन वजन कमी करतं, तर कुणी केवळ आपल्या आजूबाजूचे लोक जे करत आहेत, त्यांचं ऐकून किंवा बघून वेटलॉससाठी वेगवेगळे डाएट प्लॅन्स ट्राय करत असतात. सध्या अशाच एका वेटलॉस कॉफीची (Black Coffee With Lemon for weight loss) चर्चा सुरू आहे. कोरी कॉफी म्हणजेच दूध न टाकता केलेली कॉफी आणि त्यात लिंबाचा रस... अशा या कॉफीचा फॉर्म्युला सध्या गाजतो आहे. पण खरंच ही कॉफी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते का, याविषयी बघा एक्सपर्ट काय सांगत आहेत.

 

बिनादुधाचा आणि बिनासाखरेचा चहा आणि त्यात लिंबू असं आपल्याला माहिती आहे. अनेक जण असा चहा घेतातही. तशाच प्रकारची कॉफी आता वजन कमी करण्यासाठी घेतली जात आहे.

गाजर- मुळ्याचं चटपटीत लोणचं! तोंडाला सुटेल पाणी- जेवणात येईल रंगत, बघा चटकदार रेसिपी

त्याचा खरंच किती उपयोग होतो, याविषयी आयुर्वेदतज्ज्ञ डाॅ. गरिमा श्रीवास्तव यांनी हेल्थशॉट्स या साईटला विशेष माहिती दिली. त्या सांगतात की आयुर्वेदानुसार कॉफी मेटाबॉलिझम म्हणजेच चयापचय क्रिया वाढविण्यास आणि भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्यामुळे निश्चितच वजन नियंत्रणात  ठेवण्यास मदत होते. तसेच लिंबू हे देखील वजन कमी करण्यासाठी तसेच इन्सुलिनचे स्त्रवण नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे अशी कॉफी घेतल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास नक्कीच फायदा होताे. पण त्यासोबतच इतरही काही पथ्ये पाळणं गरजेचं आहे.

 

तुम्हीही लिंबू टाकून कॉफी घेत असाल तर...
याविषयी अधिक सांगताना डॉक्टर म्हणतात की, वजन कमी होतं म्हणून दिवसभरातून वारंवार अशी कॉफी घेऊ नये. सकाळच्या वेळी फक्त एकदाच अशी कॉफी घ्या.

हिवाळ्यात गूळ- फुटाणे खाण्याचे ५ जबरदस्त फायदे, तब्येतीसाठी स्वस्तात मस्त टॉनिक, खा रोज..

कारण लिंबू आणि कॉफी हे दोन्ही ॲसिडिक असतात. त्यामुळे ॲसिडिटी वाढून डोकेदुखी, मळमळ, यकृतावर ताण येणे अशा समस्या होऊ शकतात. शिवाय रात्रीच्या वेळी अशी कॉफी घेतल्याने झोपेवर परिणाम होऊ शकतो. कॉफी घेतल्याने शरीराचे डिहायड्रेशन होण्याचा वेग वाढतो. त्यामुळे कॉफीचे सेवन कधीही मर्यादितच असावे. 

 

Web Title: Really black coffee with lemon is useful for weight loss? Read expert's opinion about having black coffee with lemon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.