5 easy tips to avoid sweating while cooking in summer, how to keep kitchen cool in summer
उन्हाळ्यात स्वयंपाकासाठी ओट्याजवळ उभं राहताच घामाघूम होता? ५ सोपे उपाय-मुळीच घाम येणार नाहीPublished:May 16, 2024 07:17 AM2024-05-16T07:17:11+5:302024-05-16T14:53:25+5:30Join usJoin usNext उन्हाळ्याच्या दिवसात स्वयंपाक करायला ओट्याजवळ अगदी जावंच वाटत नाही. कारण खूपच घाम घाम होतो. आधीच वातावरणात वाढलेली उष्णता आणि त्यात पुन्हा गॅसशेगडीची उष्णता यामुळे स्वयंपाक करताना खूपच घामाघूम होऊन जातं. म्हणूनच उन्हाळ्यात स्वयंपाक करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. यामुळे तुमचा कमीतकमी वेळ स्वयंपाक घरात जाईल आणि शिवाय घामाचा त्रासही जाणवणार नाही. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उन्हाळ्यात सकाळच्या स्वयंपाकाला थोडी लवकर सुरुवात करा. जेवढं पटकन सकाळचा स्वयंपाक कराल, तेवढा उष्णतेचा त्रास कमी होईल. आपण स्वयंपाकाची बरीच कामं ओट्याजवळ उभं राहून करतो. तसं करणं टाळा. भाज्या निवडणं, चिरणं, लसूण सोलणं, कणिक मळणं ही कामं तुम्ही दुसऱ्या एखाद्या खोलीत बसूनही करू शकता. यामुळे ओट्याजवळ उभं राहण्याचा वेळ कमी होईल. हल्ली अगदी ५००- ६०० रुपयांत छोटेसे पंखे मिळतात. तो एखादा पंखा विकत घ्या आणि तुमच्या चेहऱ्याला, मानेला, गळ्याला त्याची गार हवा लागेल अशा पद्धतीने स्वयंपाक घरात ठेवा. काम खूप सुसह्य होईल. तळण्याचे पदार्थ शक्यतो टाळा. कारण यामुळे गॅसजवळ खूप जास्त वेळ उभं राहावं लागतं. शिवाय तळताना जरा जास्तच उष्णता निर्माण होते. तळणं अगदी आवश्यकच असेल तर सकाळी वातावरण थोडं थंड असताना किंवा संध्याकाळनंतर तळा.. उन्हाळ्यात तसंही जास्त जेवण जात नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी शक्यतो वन डिश मील करण्यावर भर द्या. यामुळे काम पटापट होईल. स्वयंपाक करताना कॉटनचे सूती सैलसर कपडे घाला. त्यामुळे घाम- घाम होणार नाही. टॅग्स :सोशल व्हायरलकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्नसमर स्पेशलSocial ViralCooking Tipskitchen tipsfoodSummer Special