आजकाल लोक मोबाईल, लॅपटॉप वापरण्यात इतके व्यस्त होतात की त्यांचं पूर्ण रूटीन बिघडतं आणि शरीरही थकतं रात्री लवकर झोप येत नाही आणि सकाळी जाग येत नाही. थकवा, कमकुवतपणा, डोकेदुखी यांसारख्या वेदना जाणवतात. हेल्थ एक्सपर्ट्स या स्थितीला मंडे ब्लूजनंतर 'सोशल जेटलॅग' असं संबोधत आहेत. शरीराचे बायोलॉजिकल क्लॉक बिघडल्यामुळे संपूर्ण शरीराच्या झोपेवर परिणाम होतो. (How To Get Sleep Quickly At Night Tips By Baba Ramdev)
साऊंड स्लीप एखाद्या टॉनिकप्रमाणे काम करते. सायन्स जर्नलनुसार जे लोक ६ तास झोपत नाही त्यांच्यात डिमेंशिया, अल्जायमर अशा आजारांचा धोका वाढतो या आजारांपासून बचावासाठी सर्केडीयन रिदम सुधारणं गरजेचं आहे. म्हणूनच वेळेवर झोपणं आणि वेळेवर उठणं गरजेचं आहे.
चांगली झोप फक्त आरामासाठीच नाही तर शरीर आणि मेंदूला रिपेअर करण्यासाठी खूपच गरजेची असते. ज्याप्रमाणे स्मार्ट फोनला चार्जिंगची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे आपल्या शरीरालाही रिचार्जची आवश्यकता असते. योगगुरू बाबा रामदेव यांनी चांगल्या झोपेसाठी काय काय करावं याबाबत अधिक माहिती दिली आहे.
चांगल्या झोपेसाठी काय करावे? (How To Get Good Sleep Naturally)
ताजं अन्न खा, तळलेले पदार्थ खाणं टाळा, ५ ते ६ लिटर पाणी प्या, रोज न चुकता वर्कआऊट करा. इम्यूनिटी वाढवणंही गरजेचं आहे. इम्युनिटी वाढवण्यासाठी रोज अर्धा तास उन्हात बसा, व्हिटामीन सी युक्त पदार्थांचा आहारात समावेश करा, हिरव्या भाज्या खा, रात्री हळदीचं दूध प्या, रोज अर्धा तास योगा करा.
हायपरटेंशनची समस्या दूर करा
रोज खूप पाणी प्या, ताण-तणाव कमी घ्या, वेळेवर जेवा आणि जंक फूड खाणं टाळा. हृदयासाठी उपयुक्त अळशी, लसूण, दालचिनी, हळद या पदार्थांचा आहारात समावेश करा. हृदय निरोगी चांगले ठेवण्यासाठी दुधीचं सूप, दुधीची भाजी, दुधीचा रस प्या. झोप न येण्याची समस्या टाळण्यासाठी रोज न चुकता व्यायाम करा, वजन नियंत्रणात ठेवा, भरपूर पाणी प्या, जंक फूडचे सेवन करू नका. जास्त पेनकिलर घेऊ नका.
