Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कुत्रा चावल्यानं रेबिज झाल्यावर माणूस खरंच कुत्र्यासारखा भुंकतो-वागतो? न्यूरॉलॉजिस्टने सांगितलं ओरडण्याचं कारण..

कुत्रा चावल्यानं रेबिज झाल्यावर माणूस खरंच कुत्र्यासारखा भुंकतो-वागतो? न्यूरॉलॉजिस्टने सांगितलं ओरडण्याचं कारण..

Hydrophobia and laryngeal spasms in rabies: How rabies affects the human nervous System: 'रेबीज झालेला माणूस कुत्र्यासारखा भुंकू लागतो'पण हे खरं आहे की खोटं जाणून घेऊया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2026 17:43 IST2026-04-14T17:43:22+5:302026-04-14T17:43:46+5:30

Hydrophobia and laryngeal spasms in rabies: How rabies affects the human nervous System: 'रेबीज झालेला माणूस कुत्र्यासारखा भुंकू लागतो'पण हे खरं आहे की खोटं जाणून घेऊया.

Do rabies patients bark like dogs facts Neurological symptoms of rabies in humans Why do rabies patients make barking sounds Rabies vs Myth: Scientific explanation | कुत्रा चावल्यानं रेबिज झाल्यावर माणूस खरंच कुत्र्यासारखा भुंकतो-वागतो? न्यूरॉलॉजिस्टने सांगितलं ओरडण्याचं कारण..

कुत्रा चावल्यानं रेबिज झाल्यावर माणूस खरंच कुत्र्यासारखा भुंकतो-वागतो? न्यूरॉलॉजिस्टने सांगितलं ओरडण्याचं कारण..

रेबीज हा जगातील सर्वात घातक आजारांपैकी एक मानला जातो. या आजाराबद्दल समाजात अनेक भीतीदायक समज आणि अफवा आहेत. त्यापैकी सर्वात मोठी अफवा म्हणजे 'रेबीज झालेला माणूस कुत्र्यासारखा भुंकू लागतो'.(Do rabies patients bark like dogs facts) पण हे खरं आहे की खोटं हे अनेकांना माहित नाही. रेबीज हा पिसाळलेला कुत्रा, मांजर किंवा माकड चावल्यामुळे होणारा विषाणूजन्य आजार आहे. हा विषाणू मानवाच्या मज्जासंस्थेवर आणि मेंदूवर हल्ला करतो.(Neurological symptoms of rabies in humans) याची लक्षणे दिसल्यास माणसाचा मृत्यू होतो, म्हणूनच याला सायलंट किलर म्हटले जाते. पण चुकीच्या पद्धतीने या आजाराचे लक्षण समोर आल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. (Why do rabies patients make barking sounds)
अनेकांना असे वाटते की रुग्ण कुत्र्याप्रमाणे वागू लागतो, चावा घेतो किंवा भुंकतो. पण न्यूरोलॉजिस्ट याकडे वेगळ्या नजरेने पाहतात.(Hydrophobia and laryngeal spasms in rabies) रुग्णाच्या तोंडातून येणारे आवाज हे भुंकणे नसून, त्याच्या शरीरात होणाऱ्या वेदनादायी बदलांचा तो परिणाम असतो. न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनीत बंगा म्हणतात कुत्रा चावल्यानंतर व्यक्तीला रेबीज झाला तर त्याच्या फक्त मेंदूवर परिणाम होतो. (Truth behind rabies)

उन्हाळ्यात वेफर्स-पापडासाठी भरपूर बटाटे आणले? ५ टिप्स -बटाटे काळे पडणार नाहीत, मोड येणार नाहीत..

डॉक्टरांच्या मते रेबीजचा परिणाम फक्त मेंदूवर होतो. रेबीजमुळे स्नायूंचे आकुंचन होते, ज्यामुळे रुग्णाला पाणी पिणे कठीण होते. रेबीजमुळे हायड्रोफोबिया देखील होऊ शकतो. या आजारामुळे मेंदूच्या नसांवर गंभीर परिणाम होतो. व्यक्तीच्या वागणुकीत अडथळा येतो. रुग्णांना पाण्याची तीव्र भीती वाटू लागते. पाणी दिसल्यास ते घाबरुन किंचाळू शकतात. 

रेबीजची सुरुवातीची लक्षणे फ्लू सारखी असू शकतात. जी दोन ते तीन दिवसांत जीवघेणी ठरु शकतात. या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, अस्वस्थता आणि चिंता, घशात पेटके येणे आणि गिळण्यास त्रास होतो. हवा किंवा पाण्याची भीती, जास्त लाळ गळणे, मानसिक गोंधळ किंवा राग यांचा समावेश होतो. रेबीजमुळे मेंदूला मोठी सूज येते. यामुळे रुग्णाची विचार करण्याची क्षमता नष्ट होते. तो अत्यंत चिडचिड करतो. गोंधळलेल्या स्थितीत असतो आणि कधीकधी हिंसकही होऊ शकतो. या मानसिक स्थितीमुळे तो ओरडणे किंवा विचित्र हालचाली करणे अशा गोष्टी करतो. 

रुग्णाच्या लाळग्रंथींवर ताबा राहत नाही आणि घशाच्या स्नायूंमुळे ती गिळता येत नाही. यामुळे तोंडावाटे फेस येतो. हे दृश्य पाहून लोकांना वाटते की रुग्ण पिसाळलेल्या कुत्र्यासारखा दिसत आहे, पण ही केवळ आजाराची एक अवस्था आहे. 

Web Title : रेबीज: क्या इंसान कुत्तों की तरह भौंकते हैं? न्यूरोलॉजिस्ट ने बताया चीखने का कारण।

Web Summary : रेबीज मांसपेशियों में संकुचन और हाइड्रोफोबिया का कारण बनता है, जिससे मस्तिष्क प्रभावित होता है और परेशानी होती है। आवाजें भौंकने जैसी लगती हैं लेकिन कुत्ते के व्यवहार के कारण नहीं, दर्द के कारण होती हैं। शुरुआती लक्षण फ्लू जैसे होते हैं, जिससे भ्रम और उत्तेजना होती है।

Web Title : Rabies: Do humans bark like dogs? Neurologist reveals reason for cries.

Web Summary : Rabies causes muscle contractions and hydrophobia, affecting the brain and causing distress. Sounds resemble barking but are due to pain, not canine behavior. Initial symptoms mimic flu, leading to confusion and agitation.