Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > गारेगार कैरीचे सरबत करा ५ मिनिटांत, आंबट-गोड-तिखट चव; पोटाला मिळेल गारवा-जि‍भेला सुख ..

गारेगार कैरीचे सरबत करा ५ मिनिटांत, आंबट-गोड-तिखट चव; पोटाला मिळेल गारवा-जि‍भेला सुख ..

Make a refreshing mango sarbat in 5 minutes, with a sour-sweet-bitter taste; it will satisfy your gut : कैरीचे सरबत करण्याची सोपी रेसिपी. नक्की करुन पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2026 14:26 IST2026-04-15T14:23:48+5:302026-04-15T14:26:47+5:30

Make a refreshing mango sarbat in 5 minutes, with a sour-sweet-bitter taste; it will satisfy your gut : कैरीचे सरबत करण्याची सोपी रेसिपी. नक्की करुन पाहा.

Make a refreshing mango sarbat in 5 minutes, with a sour-sweet-bitter taste; it will satisfy your gut | गारेगार कैरीचे सरबत करा ५ मिनिटांत, आंबट-गोड-तिखट चव; पोटाला मिळेल गारवा-जि‍भेला सुख ..

गारेगार कैरीचे सरबत करा ५ मिनिटांत, आंबट-गोड-तिखट चव; पोटाला मिळेल गारवा-जि‍भेला सुख ..

मे महिन्यात आंब्याला खास महत्व असतं. आंबा फळांचा राजा आहेच पण कैरीचीही स्वतःची वेगळीच खासियत आहे. कैरी प्रेमीही आपल्याकडे कमी नाहीत. कैरीचे विविध पदार्थ करुन खाल्ले जातात. तसेच नुसती कैरीही मिटक्या मारत खायला मजा येते. (Make a refreshing mango sarbat in 5 minutes, with a sour-sweet-bitter taste; it will satisfy your gut )उन्हाळ्यात सतत गार काही प्यावेसे वाटते. कैरी पन्हं तर आपण पितोच पण एकदा कैरीचं सरबतही पिऊन पाहा. करायला एकदम सोपं आहे. 

साहित्य 
कैरी, मीठ, पुदिना, लिंबू, कोथिंबीर, हिरवी मिरची, पाणी, साखर, बर्फ, चाट मसाला, सैंधव मीठ , जिरे 

कृती
१. मस्त आंबट कैरी किसून घ्यायची. कोणतीही कैरी घ्या फक्त आंबट असायला हवी. कैरी किसून घेतल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायची. त्यात पुदिन्याची ताजी स्वच्छ पाने घालायची. मिक्सरची पावर जास्त असेल तर कैरीचे तुकडेही करुन चालते. 

२. कोथिंबीरीची ताजी जुडी निवडून घ्यायची. निवडून झाल्यावर जरा चिरायची आणि मिक्सरच्या भांड्यात घालायची. कैरी, पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर घातल्यावर त्यात हिरव्या मिरचीचे तुकडेही घालायचे. लिंबाचा रस घालायचा. चवीनुसार मीठ घालायचे. तसेच थोडे सैंधव मीठ घालायचे. 

३. चमचाभर जिरे घालायचे. चवीनुसार चाट मसाला घालायचा. त्यात साखर घालायची. साखर तुमच्या आवडीनुसार घालायची. सगळे पदार्थ एकत्र करायचे. त्यात पाणी घालायचे आणि त्याची पेस्ट वाटून घ्यायची. सगळे पदार्थ पूर्णपणे वाटले गेले की मिश्रण गाळून घ्यायचे. गाळण्यासाठी पातळ कॉटनचं कापड वापरा. व्यवस्थित पिळून रस काढून घ्यायचा. 

४. त्यात किसलेले कैरी घालायची. जास्त नाही थोडीच घाला. बर्फ घाला आणि गरजेनुसार पाणीही घाला. सगळं मिक्स करुन घ्यायचं. त्यात थोडा चाट मसाला घालायचा. चवीला आंबट गोड आणि पोटासाठी चांगले ठरते. नक्की करुन पाहा. 

Web Title : झटपट कैरी का शरबत: मिनटों में ताज़गी भरा पेय!

Web Summary : मिनटों में ताज़ा कैरी (कच्चा आम) का शरबत बनाएं! यह मीठा, खट्टा और थोड़ा मसालेदार पेय गर्मियों के लिए एकदम सही है। कैरी को पुदीना, धनिया, हरी मिर्च और मसालों के साथ मिलाएं। छानकर, बर्फ डालकर इस ठंडे और पाचक पेय का आनंद लें।

Web Title : Quick raw mango sarbat: Refreshing summer drink in minutes!

Web Summary : Make a refreshing raw mango (kairi) sarbat in minutes! This sweet, sour, and slightly spicy drink is perfect for summer. Blend kairi with mint, coriander, green chili, and spices. Strain, add ice, and enjoy this cooling, digestive beverage.