Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > तूप काढल्यानंतर उरलेली बेरी 'या' पद्धतीने गरम करा- आणखी भरपूर तूप मिळेल, घ्या भन्नाट ट्रिक 

तूप काढल्यानंतर उरलेली बेरी 'या' पद्धतीने गरम करा- आणखी भरपूर तूप मिळेल, घ्या भन्नाट ट्रिक 

Kitchen Tips: तूप काढल्यानंतर उरलेल्या बेरीतून पुन्हा आणखी तूप कसं काढायचं याची ही मस्त रेसिपी...(how to make more ghee from leftover ghurchan or beri?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2026 17:46 IST2026-05-07T17:45:23+5:302026-05-07T17:46:01+5:30

Kitchen Tips: तूप काढल्यानंतर उरलेल्या बेरीतून पुन्हा आणखी तूप कसं काढायचं याची ही मस्त रेसिपी...(how to make more ghee from leftover ghurchan or beri?)

how to make more ghee from leftover ghurchan or beri, tips and tricks to make ghee at home, how to get maximum ghee from makhkhan | तूप काढल्यानंतर उरलेली बेरी 'या' पद्धतीने गरम करा- आणखी भरपूर तूप मिळेल, घ्या भन्नाट ट्रिक 

तूप काढल्यानंतर उरलेली बेरी 'या' पद्धतीने गरम करा- आणखी भरपूर तूप मिळेल, घ्या भन्नाट ट्रिक 

आपल्याला कित्येक वेगवेगळ्या ब्रॅण्डचे तूप विकत मिळतात. पण तरीही घरी जे साजुक तूप तयार केलं जातं, त्याची चव कशालाच नाही. म्हणूनच तर आजही बहुतांश घरांमध्ये दुधावरची साय वेगळी जमा केली जाते आणि त्यापासून तूप काढलं जातं. आपल्याला माहितीच आहे की जेव्हा आपण लोणी कढवतो तेव्हा बेरी आणि तूप असे दोन पदार्थ तयार होतात. तूप तर आपण साठवून ठेवतोच, पण बेरीही आवडीने खातो. कारण बेरीमध्ये तुपाचा अर्क असल्याने ती खूप चवदार लागते. काही घरांमध्ये मात्र बेरी आवडत नाही आणि ती फेकून दिली जाते. तुम्हीही असंच करत असाल तर आता त्याच बेरीपासून पुन्हा एकदा तूप कसं काढायचं ते पाहा... ज्यांना बेरी खायला आवडत नाही त्यांच्यासाठी हा उपाय खूप कामाचा आहे...(how to make more ghee from leftover ghurchan or beri?)

तूप काढल्यानंतर उरलेल्या बेरीपासून पुन्हा तूप कसं मिळवायचं?

 

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी तुमच्याकडे जी बेरी तयार झाली आहे ती पुन्हा त्याच पातेल्यामध्ये घाला. तिच्यामध्ये एक ते दिड ग्लास पाणी घाला आणि ते गॅसवर उकळायला ठेवा. बेरी केवढी आहे यावरून तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू किंवा कमी करू शकता.

'या' जादुई पाण्याने रोज गुळण्या करा- दातांवरचा पिवळट थर जाऊन मोत्यांसारखे चमकतील

आता बेरीमध्ये घातलेल्या पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. सगळं पाणी हलवून घ्या आणि थंड झाल्यानंतर ते पातेलं फ्रिजमध्ये ठेवून द्या.

 

साधारणपणे १० ते १२ तासांंनंतर पातेलं फ्रिजमधून बाहेर काढा. त्यावर एक तुपकट थर जमा झालेला दिसेल.

अधिक मास विशेष: जावयाला कोणकोणत्या पदार्थांचे वाण देता येऊ शकते? पाहा पारंपरिक आणि पौष्टिक पर्याय

हा तुपकट थर पुन्हा एकदा कढईमध्ये घाला आणि गरम करा. या पाण्याला २ ते ३ मिनिटे चांगलं उकळवून घेतलं की गॅस बंद करा आणि पाणी गाळून घ्या. तुम्हाला पुन्हा एकदा तूप मिळेल. एकदा ट्राय करून पाहा. 


 

Web Title : बचे हुए 'बेरी' से इस आसान ट्रिक से और घी निकालें!

Web Summary : घी बनाने के बाद बचे हुए 'बेरी' को फेंकें नहीं! पानी मिलाकर, ठंडा करके, और जमी हुई वसा को दोबारा गरम करके, आप और भी घी निकाल सकते हैं। यह आसान तरीका उन लोगों के लिए बिल्कुल सही है जिन्हें 'बेरी' खाना पसंद नहीं है और वे घी की मात्रा बढ़ाना चाहते हैं।

Web Title : Get more ghee from leftover 'beri' with this simple trick!

Web Summary : Don't throw away the leftover 'beri' after making ghee! By adding water, refrigerating, and reheating the collected fat, you can extract even more ghee. This simple method is perfect for those who don't enjoy eating 'beri' directly and want to maximize their ghee yield.