Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > रोज १ वाटी 'ही' डाळ खा; व्हिटामीन B-12 भरपूर मिळेल, रक्त वाढेल-थकवाही होईल दूर

रोज १ वाटी 'ही' डाळ खा; व्हिटामीन B-12 भरपूर मिळेल, रक्त वाढेल-थकवाही होईल दूर

Eat These Dal For Vitamin B-12 Deficiency : व्हिटामीन बी-१२ ची कमतरता दूर करण्यासाठी काय खायला हवं समजू घेऊ.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 16:55 IST2026-05-01T16:38:09+5:302026-05-01T16:55:08+5:30

Eat These Dal For Vitamin B-12 Deficiency : व्हिटामीन बी-१२ ची कमतरता दूर करण्यासाठी काय खायला हवं समजू घेऊ.

Eat These Dal For Vitamin B-12 Deficiency : Which Dal Is Good Source Of Vitamin B-12 | रोज १ वाटी 'ही' डाळ खा; व्हिटामीन B-12 भरपूर मिळेल, रक्त वाढेल-थकवाही होईल दूर

रोज १ वाटी 'ही' डाळ खा; व्हिटामीन B-12 भरपूर मिळेल, रक्त वाढेल-थकवाही होईल दूर

व्हिटामीन बी-१२ असा घटक आहे  आपल्या शरीराला अनेक समस्यांशी लढण्यास मदत करतो. शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्हिटामीन बी-१२ ची कमतरता दूर करणं खूपच गरजेचं आहे.  जर तुमच्याही शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता असेल तर थकवा, एनिमिया,  स्मरणशक्ती कमी होणं, नर्व्सस सिस्टिमशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. व्हिटामीन बी-१२ ची कमतरता दूर करण्यासाठी काय खायला हवं समजू घेऊ. (Eat These Dal For Vitamin B-12 Deficiency)

 व्हिटामीन बी-१२ ची कमतरता दूर करण्यासाठी डाळी खा (What To Eat to Get Vitamin B-12)

 क्लाऊड नाईन केअरच्या रिपोर्टनुसार डाळी पोषक तत्वांचा भंडार असतात. जे लोक शाकाहारी आहे त्यांनी व्हिटामीन बी १२ ची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात डाळी खायला हव्यात. हा एक हेल्दी आणि उत्तम पर्याय आहे. मुगाच्या डाळीचे सेवन तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकते. कारण यात प्रोटीन, फायबर्स, आयर्न, फॉलेट आणि इतर व्हिटामीन्स असतात. तुम्ही रात्रीच्या जेवणात मुगाच्या डाळीची खिचडी खाल्ली तरी व्हिटामीन्सची कमतरता भरून निघण्यास मदत होईल. (Ref)

मुगाची डाळ  बनवण्यासाठी सगळ्यात आधी १ वाटी डाळ  घ्या आणि २ ते ३ पाण्यांनी व्यवस्थित धुवून घ्या.  यात ३ कप पाणी, हळद, आलं आणि मीठ घालून बाजूला गॅसवर शिजायला ठेवा. उकळ आल्यानंतर आच मंद करा. डाळ शिजल्यानंतर गॅस बंद करा. तुम्ही कुकरमध्येही डाळ शिजवून घेऊ शकता.

नंतर एका कढईत तूप गरम करून त्यात जीरं आणि हिंगाची फोडणी द्या.  यात कांदा घाला. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्या. यात टोमॅटो घाला आणि चमच्यानं ढवळत राहा. नंतर यात धणे पावडर, लाल तिखट, गरम मसाला, घालून व्यवस्थित एकजीव करा नंतर शिवजलेली डाळ यात घाला. शेवटी कोथिंबीर घाला.  ही डाळ तुम्ही सूपप्रमाणे पिऊ शकता किंवा भात आणि चपातीसोबतही खाऊ शकता.

कोणत्या डाळींमध्ये व्हिटामीन B-12 जास्त असते? (Which Dal Is Good  Source Of Vitamin B-12?)

मुगाची डाळ आणि मसूरची डाळ व्हिटामीन B-12 साठी उत्तम ठरते. मुगाच्या डाळीत फॉलेट, आयर्न, फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेची लक्षणं कमी करण्यासाठी मुगाच्या डाळीचे सेवन करायला हवे. 

Web Title : रोज़ यह दाल खाएं: बी-12 बढ़ाएं, खून बढ़ाएं, थकान दूर करें

Web Summary : दालों से विटामिन बी-12 की कमी दूर करें। मूंग और मसूर की दालें बी-12, आयरन और फाइबर का अच्छा स्रोत हैं। रात में मूंग दाल की खिचड़ी भी मदद करती है। नियमित रूप से इन दालों का सेवन थकान कम कर सकता है और समग्र स्वास्थ्य में सुधार कर सकता है।

Web Title : Eat This Lentil Daily: Boost B-12, Increase Blood, Beat Fatigue

Web Summary : Combat Vitamin B-12 deficiency with lentils. Mung and masoor dal are excellent sources of B-12, iron, and fiber. Mung dal khichdi at night also helps. Regularly consuming these lentils can reduce fatigue and improve overall health.