Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > उन्हाळ्यात खा भरपूर लिची - हे लहानसं फळ आहे कमालीचं औषधी !! पचन ,त्वचा साऱ्यावर रामबाण ...

उन्हाळ्यात खा भरपूर लिची - हे लहानसं फळ आहे कमालीचं औषधी !! पचन ,त्वचा साऱ्यावर रामबाण ...

Eat lots of litchi in summer - this small fruit is a great medicine!! good for digestion, skin : लिची आरोग्यासाठी फार चांगली असते. नक्की खा रोज.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2026 15:29 IST2026-04-19T15:26:59+5:302026-04-19T15:29:49+5:30

Eat lots of litchi in summer - this small fruit is a great medicine!! good for digestion, skin : लिची आरोग्यासाठी फार चांगली असते. नक्की खा रोज.

Eat lots of litchi in summer - this small fruit is a great medicine!! good for digestion, skin... | उन्हाळ्यात खा भरपूर लिची - हे लहानसं फळ आहे कमालीचं औषधी !! पचन ,त्वचा साऱ्यावर रामबाण ...

उन्हाळ्यात खा भरपूर लिची - हे लहानसं फळ आहे कमालीचं औषधी !! पचन ,त्वचा साऱ्यावर रामबाण ...

उन्हाळा सुरू झाला की शरीराला थंडावा देणारे, रसाळ आणि पौष्टिक फळ खाण्याची इच्छा होते आणि शरीराला त्याची गरजही असते. अशा वेळी आपण अनेक फळ खातो. कलिंगड तर उन्हाळ्यात खास असतेच मात्र त्यासोबत आणखी एक फळ बाजारात मिळते ते म्हणजे लिची. हे फळ केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरते. (Eat lots of litchi in summer - this small fruit is a great medicine!! good for digestion, skin...)लिचीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे ती शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते आणि उन्हाळ्यात येणारा थकवा कमी करते.

लिचीमध्ये व्हिटामिन सी मुबलक प्रमाणात आढळते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी महत्त्वाचे असते. त्यामुळे वारंवार सर्दी-खोकला होणाऱ्यांसाठी लिची उपयुक्त ठरते. तसेच त्वचेसाठीही हे फळ फायदेशीर आहे, कारण ते त्वचेला नैसर्गिक चमक देण्यास मदत करते. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता म्हणजेच डिहायड्रेशन होण्याचा धोका असतो. लिची खाल्ल्याने शरीरात पाण्याची पातळी संतुलित राहते आणि उष्माघाताचा धोका कमी होतो. त्यामुळे गरम हवामानात हे फळ विशेषतः उपयुक्त ठरते.

लिचीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरातील विषारी घटक कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे शरीर आतून स्वच्छ राहते आणि थकवा कमी होतो. याशिवाय लिची पचनक्रियेसाठीही चांगली असते. हलकी आणि रसाळ असल्यामुळे ती सहज पचते आणि पोटावर ताण येत नाही.

हृदयाच्या आरोग्यासाठीदेखील लिची उपयुक्त ठरते. यात असलेले पोषक घटक रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. तसेच ऊर्जा देणारे नैसर्गिक साखर घटक असल्यामुळे लिची खाल्ल्याने त्वरित ऊर्जा मिळते, जी उन्हाळ्यात खूप आवश्यक असते. लिची कितीही फायदेशीर असली तरी ती मर्यादेत खाणे महत्त्वाचे आहे. जास्त प्रमाणात खाल्ल्यास काहींना उष्णता किंवा पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात. योग्य प्रमाणात आणि संतुलित आहारासोबत लिचीचा समावेश केल्यास उन्हाळ्यात आरोग्य टिकवणे अधिक सोपे होते.

एकंदरीत, लिची हे फळ उन्हाळ्यात आहारात असायलाच हवे. चव, ताजेपणा आणि पोषण यांचा उत्तम संगम असलेली लिची शरीराला थंडावा देत आरोग्य सुधारण्यास मदत करते. चवीलाही गोड असल्याने लहान मुले आवडीने खातात. 

Web Title : गर्मी में लीची खाएं: एक स्वादिष्ट और सेहतमंद फल

Web Summary : लीची गर्मी का फल है, जो विटामिन सी और एंटीऑक्सीडेंट से भरपूर है। यह पाचन में मदद करता है, शरीर को हाइड्रेट रखता है, लू से बचाता है, त्वचा और हृदय के लिए अच्छा है। इसे सीमित मात्रा में खाना चाहिए।

Web Title : Eat Litchi in Summer: A Delicious and Healthy Summer Fruit

Web Summary : Litchi is a hydrating, immunity-boosting summer fruit rich in Vitamin C and antioxidants. It aids digestion, hydrates the body, protects against heatstroke, and promotes healthy skin and heart function. Moderation is key to avoid any discomfort.