Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > पिझ्झासारखा दिसणारा कांदा-बटाटा डोसा खा, प्रेमात पडाल या डोशाच्या! चव बेमिसाल, मसाला डोसापेक्षा भारी सोपी रेसिपी

पिझ्झासारखा दिसणारा कांदा-बटाटा डोसा खा, प्रेमात पडाल या डोशाच्या! चव बेमिसाल, मसाला डोसापेक्षा भारी सोपी रेसिपी

Dosa is a great breakfast dish - there are many types of dosa, one of which is potato - onion dosa, see the recipe : लहान मुलांसाठी करा असा डोसा. चवीला मस्त आणि करायला सोपा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2025 16:30 IST2025-12-02T14:26:11+5:302025-12-02T16:30:20+5:30

Dosa is a great breakfast dish - there are many types of dosa, one of which is potato - onion dosa, see the recipe : लहान मुलांसाठी करा असा डोसा. चवीला मस्त आणि करायला सोपा.

Dosa is a great breakfast dish - there are many types of dosa, one of which is potato - onion dosa, see the recipe | पिझ्झासारखा दिसणारा कांदा-बटाटा डोसा खा, प्रेमात पडाल या डोशाच्या! चव बेमिसाल, मसाला डोसापेक्षा भारी सोपी रेसिपी

पिझ्झासारखा दिसणारा कांदा-बटाटा डोसा खा, प्रेमात पडाल या डोशाच्या! चव बेमिसाल, मसाला डोसापेक्षा भारी सोपी रेसिपी

लहान मुलांना पिझ्झा आवडतो. मात्र तो अत्यंत अनहेल्दी असल्याने देणे टाळायलाच हवे. त्याऐवजी मुलांसाठी असा डोसा तयार करा जो दिसतो पिझ्यासारखा आणि चवीला लागतो एकदमच भारी. तसेच त्यात अनहेल्दी काही नाही. (Dosa is a great breakfast dish - there are many types of dosa, one of which is potato - onion dosa, see the recipe)आपल्या रोजच्या आहारातील पदार्थ वापरुन करायचा. कांदा - बटाटा घालून करा मसालेदार डोसा. नाश्त्यासाठी
नक्की करा. 

साहित्य 
बटाटा, कांदा, तांदूळ, उडदाची डाळ, पाणी, मेथीचे दाणे, मीठ, तेल, लाल तिखट, कोथिंबीर, हळद

कृती
१. डोसा बॅटरसाठी दोन वाटी तांदूळ, एक वाटी उडदाची डाळ, चमचाभर मेथीचे दाणे भिजत ठेवायचे. रात्रभर ठेवा. दुसऱ्या दिवशी ते मिक्सरच्या भांड्यातून वाटून घ्या. नंतर त्यात चमचाभर तेल घालायचे. तसेच बॅटर फेटून घ्यायचे. छान मऊ असे तयार होते. 

२. बटाटा उकडून घ्यायचा. उकडून झाल्यावर सोलून घ्यायचा आणि मग कुस्करायचा. त्यात चमचाभर मीठ घालायचे. तसेच त्यात लाल तिखट घालायचे. हळद घालायची. एकजीव करायचे आणि मग बारीक चिरलेली कोथिंबीरही घालायची. 

३. कांदा सोलून घ्यायचा आणि कांद्याचे गोलाकार तुकडे करायचे. एका पॅनमध्ये थोडे तेल घ्यायचे. त्यावर कांद्याचे तुकडे लावायचे. त्यामध्ये बटाट्याचे सारण भरायचे. एका बाजूने परतून झाल्यावर दुसऱ्या बाजूनेही परतायचे. त्यावर डोश्याचे पीठ लावायचे. गोलाकार पसरवायचे. सेट झाले  आणि एका बाजूने परतले गेले की उलथायचे आणि दुसरी बाजूही परतायची. 

४. दोन्ही बाजू छान परतून झाल्यावर त्यावर कोथिंबीर घाला. तसेच आवडत असेल तर तूपही घालू शकता. गरमागरम डोसा चटणीसोबत खा. चवीला वेगळा लागतो.  

Web Title : पिज़्ज़ा जैसा प्याज-आलू डोसा: बच्चों के लिए स्वस्थ नाश्ता!

Web Summary : बच्चों के लिए आलू और प्याज से पिज़्ज़ा जैसा हेल्दी डोसा बनाएं। यह अस्वास्थ्यकर पिज़्ज़ा का स्वादिष्ट और आसान विकल्प है। डोसा बैटर तैयार करें, मसालेदार आलू-प्याज मिश्रण भरें और सुनहरा होने तक पकाएं। चटनी के साथ गरमागरम परोसें।

Web Title : Pizza-like onion-potato dosa: A healthy, tasty kids' treat!

Web Summary : Make a healthy pizza-like dosa for kids using potato and onion. It's a flavorful, easy-to-make alternative to unhealthy pizza. Prepare dosa batter, stuff with spiced potato-onion mixture, and cook until golden. Serve hot with chutney.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.