कडाक्याच्या उन्हात शरीरातील पाणी कमी होणे, थकवा जाणवणं आणि पोटाचे विकार होणं या सामान्य समस्या आहेत. अशावेळी शरीराला गारवाच नाही तर ऊर्जा देणाऱ्या पेयाची गरज असते.(Summer Detox Drink) बाजारात मिळणारी थंड पेये तात्पुरती भागवतात, पण आरोग्यासाठी ती घातक ठरु शकतात. यावर 'आवळा-आलं' सरबत हा एक उत्तम आणि नैसर्गिक पर्याय आहे.(Healthy Indian Summer Drinks)
आयुर्वेदात आवळ्याला अमृतफळ मानलं जातं, तर आले हे पाचक गुणांसाठी प्रसिद्ध आहे. जेव्हा या दोन्ही घटकांचे मिश्रण करुन सरबत बनवले जाते. तेव्हा ते मॅजिकल ड्रिंकपेक्षा कमी नसते.(Natural Refreshing Summer Drink) उन्हाळ्यात उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी आणि शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी हे सरबत अत्यंत प्रभावी ठरते. आवळ्यातील मुबलक व्हिटॅमिन-सी आपली रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढवते, तर आले पचनसंस्था सुधारून पोटाला थंडावा देते. पाहूया अगदी ५ मिनिटांत तयार होणारं आवळा- आल्याचं सरबत कसं करायचं...
साहित्य
आवळा- २५० ग्रॅम
आले- ५० ग्रॅम
खडीसाखर - २०० ग्रॅम
लिंबू - १
मीठ - चवीनुसार
सैंधव मीठ - चवीनुसार
पुदिना - ७ ते ८ पाने
सबजा - १ चमचा
ताडगोळा
माठातलं पाणी
कृती
1. सगळ्यात आधी आवळा स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करा. नंतर मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्या. त्यानंतर एका सुती कापड्यात वाटलेला आवळा घेऊन त्याचा रस काढा.
2. आता आल्याचे साल काढून त्याचेही तुकडे करुन रस काढून घ्या. गॅसवर कढई ठेवून त्यात खडीसाखर आणि पाणी घालून विरघळवून घ्या. वरुन त्यात तयार आवळा- आल्याचा रस घाला. लिंबाचा रस, मीठ घालून ढवळून घ्या.घट्ट झाल्यानंतर एका काचेच्या बरणीत थंड झाल्यावर भरा.
3. ज्यूस पिण्याच्या आधी ताडगोळ्याचे वरचे साल काढून त्याचे बारीक तुकडे करा. यानंतर एका भांड्यात आवळा-आल्याचा तयार रस घ्या. वरुन पुदिन्याची चिरलेली पाने आणि पाणी घालून सर्व साहित्य मिक्सर करा.
4. सर्व्हिंग ग्लासमध्ये भिजवलेला सबजा, चिरलेल्या ताडगोळ्याचे तुकडे आणि तयार आवळ्या-आल्याचा रस घालून प्या. उन्हाळ्यामध्ये प्या गारेगार पाचक आवळ्या-आल्याचा रस.
