Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Fitness > डिलिव्हरीनंतर वाढलेलं वजन दीपिकानं कसं कमी केलं? तिचा साधा-सोपा फिटनेस प्लॅन,पाहा

डिलिव्हरीनंतर वाढलेलं वजन दीपिकानं कसं कमी केलं? तिचा साधा-सोपा फिटनेस प्लॅन,पाहा

Deepika Padukone Fitness Secrets After Delivery : दीपिकानं कोणतंही स्ट्रिक्ट डाएट फॉलो केलेलं नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 16:43 IST2026-05-15T16:27:10+5:302026-05-15T16:43:29+5:30

Deepika Padukone Fitness Secrets After Delivery : दीपिकानं कोणतंही स्ट्रिक्ट डाएट फॉलो केलेलं नाही.

Bollywood Actress Deepika Padukone Fitness Secrets After Delivery | डिलिव्हरीनंतर वाढलेलं वजन दीपिकानं कसं कमी केलं? तिचा साधा-सोपा फिटनेस प्लॅन,पाहा

डिलिव्हरीनंतर वाढलेलं वजन दीपिकानं कसं कमी केलं? तिचा साधा-सोपा फिटनेस प्लॅन,पाहा

बाळाला जन्म दिल्यानंतर पुन्हा फिट दिसणं खरोखरच खूप कठीण असते. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोणनं हे करून दाखवलं आहे. डिलिव्हरीनंतर वाढलेलं वजन तिनं कमी वेळात पुन्हा कमी  केलं. तिची फिटनेस ट्रेनर यास्मीन कराचीवालानं काही फिटनेस ट्रिक्स शेअर केल्या आहेत. दीपिकानं कोणतंही स्ट्रिक्ट डाएट फॉलो केलेलं नाही. (Bollywood Actress Deepika Padukone Fitness Secrets After Delivery)

पिलेट्स व्यायामाला बनवा व्यायामाचा एक भाग

 दीपिका पादुकोणनं पोस्ट प्रेग्नंसी फिटनेससाठी पिलेट्स व्यायाम निवडला. यास्मीन कराचीवाला सांगतात की पिलेट्स व्यायामुळे कोअर मसल्स मजबूत होतात. शरीराची लवचीकता वाढते आणि फॅट्स बर्न होण्यस मदत होते.  हा सर्वात महत्वपूर्ण व्यायाम मानला जातो. दीपिकानं या व्यायामाला आपल्या रूटीनचा एक हिस्सा बनवलं आणि शरीर पुन्हा योग्य आकारात आणण्यासाठी तिला या व्यायामाची मदत झाली.

रेग्युलर ट्रेडमिल रनिंग

 दीपिका आपल्या  फिटनेसच्या प्रवासात रनिंगला खूप महत्व देते. फिटनेस एक्सपर्ट्स सांगतात की ती ट्रेडमिलवर नियमित रनिंग करते. ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. याशिवाय मेटाबॉलिझ्मही वेगानं वाढतो. ज्यामुळे वजन सहज कमी होते. या पद्धतीनं रनिंग केल्यास तब्येतीला बरेच फायदे मिळतात.

पौष्टीक आणि घरचं जेवण

आहाराच्या बाबतीतही दीपिकाने कोणताही क्रॅश डाएट केला नाही. तिने घरगुती आणि पौष्टिक अन्नावर भर दिला. प्रोटीनयुक्त पदार्थ, भाज्या, फळे आणि पुरेसे पाणी यांचा तिच्या आहारात समावेश होता. वेळेवर जेवण आणि योग्य झोप यांनाही तिने महत्त्व दिले. तिच्या मते, शरीराला उपाशी ठेवून वजन कमी करण्यापेक्षा योग्य पद्धतीने फिट राहणे अधिक महत्त्वाचे आहे.

 हेल्दी रुटीनला ती खूप महत्व देते. हेल्दी डाएट प्लॅन फॉलो करते. दीपिकानं आपल्या आहारावर पूर्णपणे लक्ष दिले.  तिला फक्त घरी बनवलेला हलका आहार आवडतो. याशिवाय कमी तेलात, कमी मसाल्यांमध्ये शिजलेले पदार्थ खाण्याला तिनं प्राधान्य दिले. दीपिकानं प्रोसेस्ड आणि जंक फूड खाणं टाळलं ज्यामुळे तिचं वजन सहज कमी झालं.

मानसिक आरोग्याकडे लक्ष 

डिलिव्हरीनंतर मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे असते, हे दीपिकाने अनेकदा सांगितले आहे. त्यामुळे तिने स्वतःसाठी वेळ काढणे, सकारात्मक विचार ठेवणे आणि ताण कमी ठेवणे याकडेही लक्ष दिले. दीपिकाचे उदाहरण अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे. तिने सिद्ध केले की संयम, नियमित व्यायाम आणि संतुलित आहार यांच्या मदतीने नैसर्गिकरीत्या वजन कमी करता येते.

Web Title : डिलीवरी के बाद दीपिका पादुकोण का वजन घटाने का राज: एक सरल फिटनेस प्लान

Web Summary : दीपिका पादुकोण ने डिलीवरी के बाद पिलेट्स, दौड़ और संतुलित आहार से वजन घटाया। उन्होंने सख्त परहेज से परहेज किया, पौष्टिक, घर के बने भोजन पर ध्यान केंद्रित किया और मानसिक कल्याण को प्राथमिकता दी। नियमित व्यायाम और स्वस्थ जीवनशैली ने उन्हें अपनी फिटनेस वापस पाने में मदद की।

Web Title : Deepika Padukone's weight loss secrets after delivery: A simple fitness plan

Web Summary : Deepika Padukone lost weight after delivery with Pilates, running, and a balanced diet. She avoided strict diets, focusing on nutritious, home-cooked meals and prioritizing mental well-being. Regular exercise and a healthy lifestyle helped her regain her fitness.