अभिनेत्री खासदार कंगना रानौत संसदेत जाताना अगदी खासदाराला शोभेल अशाच पोशाखात असते. एखाद्या वर्किंग वुमनचा फॉर्मल लूक असावा तर तो अगदी कंगना सारखाच असावा असं वाटायला लागतं.. आता पुन्हा एकदा कंगनाचा एक लूक खूप व्हायरल होत असून यामध्ये तिने नेसलेली कोडाली करुप्पुर ही साडी सध्या चर्चेचा विषय झाली आहे. ती साडी म्हणजे खरोखरच भारताचा इतिहास सांगणारी एक उज्ज्वल परंपरा आहे. या साडीचं नेमकं वैशिष्ट्य आणि तिचा इतिहास पाहुया..(actress Kangana Ranaut wore vintage royal look kodali karuppur saree)
कंगना रानौतने नेसलेल्या कोडाली करुप्पुर साडीचा इतिहास...
कंगना रानौतने नेसलेल्या या साडीला जवळपास ८०० वर्षांची समृद्ध परंपरा असून ही साडी खासकरून तंजावरच्या राजघराण्यातल्या महिला नेसायच्या. राणी- महाराणी यांच्या अंगावर कधीकाळी मिरवलेली ही साडी आता काळाच्या ओघात थोडी मागे पडत चालली आहे.
फक्त १५ मिनिटांत करा गुजरात स्पेशल काठियावाडी शेव टमाटर, चमचमीत भाजीची मस्त मेजवानी
कंगनाच्या रुपाने या साडीला पुन्हा लोकप्रियता मिळाली तर ते हातमागच्या दृष्टीने चांगलेच आहे. १८ व्या शतकात ही साडी तामिळनाडू येथील कुम्बकोणम जवळील कोडाली करुप्पुर या गावात तयार करण्यात यायची. ही साडी तयार करण्यासाठी खास सौराष्ट्रातून वीणकर यायचे. एक साडी तयार करण्यामागे कित्येक वीणकरांची महिनोंमहिन्यांची मेहनत असायची.
कोडाली करुप्पुर साडीचं वैशिष्ट्य
तंजावरच्या मराठा राजाकडून या साडीला राजाश्रय मिळाल्याने त्या काळात ही कला खूप बहरली. जमदानी आणि कलमकारी प्रकारातली नक्षी असलेली ही साडी अत्यंत क्लिष्ट पद्धतीने विणून तयार केली जायची.
अक्षय तृतीयेला आमरस करण्याआधी लक्षात ठेवा ४ टिप्स, रस होईल मस्त- खा मनसोक्त
त्यावरचं रंगकामही हातानेच केलं जायचं. वेल, बुटी आणि वेगवेगळ्या आकाराची नाजुक फुलं अशा पद्धतीची नक्षी या साडीवर जास्त दिसते. त्याचप्रमाणे भौमितिक आकार आणि नाजुक नक्षी अशीही डिझाईन आढळून येते. कंगनाच्या निमित्ताने ही साडी पुन्हा एकदा चर्चेत येऊन व्हायरल झाली आहे.
