Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > फक्त १५ मिनिटांत करा गुजरात स्पेशल काठियावाडी शेव टमाटर, चमचमीत भाजीची मस्त मेजवानी

फक्त १५ मिनिटांत करा गुजरात स्पेशल काठियावाडी शेव टमाटर, चमचमीत भाजीची मस्त मेजवानी

Kathiyawadi Shev Tamatar Recipe: ढाब्यावर मिळणारी काठियावाडी पद्धतीची शेव टमारट भाजी घरी करणं अगदी सोपं आहे...(how to make kathiawadi shev tamatar?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2026 16:11 IST2026-04-14T15:24:30+5:302026-04-14T16:11:27+5:30

Kathiyawadi Shev Tamatar Recipe: ढाब्यावर मिळणारी काठियावाडी पद्धतीची शेव टमारट भाजी घरी करणं अगदी सोपं आहे...(how to make kathiawadi shev tamatar?)

kathiyawadi shev tamatar recipe, how to make kathiawadi shev tamatar, kathiawadi shev tamatar sabji in just 15 minutes  | फक्त १५ मिनिटांत करा गुजरात स्पेशल काठियावाडी शेव टमाटर, चमचमीत भाजीची मस्त मेजवानी

फक्त १५ मिनिटांत करा गुजरात स्पेशल काठियावाडी शेव टमाटर, चमचमीत भाजीची मस्त मेजवानी

उन्हाळ्यात जेवण थोडं कमीच जातं. त्यातही दुपारी आपण जरा बरे जेवतो, पण रात्रीच्या जेवणाचा कंटाळा यायला लागतो. काहीतरी वेगळं आणि चवदार खावं असं वाटतं. पण सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने खूप मसालेदार, तेलकट पदार्थ खायलाही नकोच वाटतं. म्हणूनच आता गुजराती पद्धतीची काठियावाडी शेव टमाटर ही भाजी करून पाहा. गुजराती जेवण जास्त तिखट आणि मसालेदार नसतं. त्यामुळे ही भाजी उन्हाळ्यासाठी परफेक्ट आहे (how to make kathiawadi shev tamatar?). शिवाय ती करायलाही खूपच कमी वेळ लागतो. आधीपासून तयारी करून ठेवण्याची गरजही नाही.(kathiawadi shev tamatar sabji in just 15 minutes)

गुजरात स्पेशल काठियावाडी शेव टमाटर भाजी

 

साहित्य

४ मध्यम आकाराचे टोमॅटो

१ चमचा आलं लसूण पेस्ट, २ ते ३ हिरव्या मिरच्या

घरच्या घरीच ब्लीच करण्याची मस्त ट्रिक, चेहऱ्यावर येईल सोन्यासारखी झळाळी, त्वचा दिसेल फ्रेश

फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, जिरे, हळद.

चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर

शेव आणि गरजेनुसार थोडासा गूळ किंवा साखर

कृती 

 

काठियावाडी शेव टमाटर करण्यासाठी टोमॅटो स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. गॅसवर कढई गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये तेल घालून फोडणी करून घ्या.

फोडणी झाल्यानंतर आलं, लसूण पेस्ट घालून हलकीशी परतून घ्या. आता त्यामध्येच बारीक चिरलेले टोमॅटो घालून थोडी वाफ येऊ द्या. यानंतर त्यामध्ये मीठ घाला.

चिंचेचा फेसपॅक-कधी ऐकला नसेल तुम्ही असा आंबटचिंबट उपाय-एकदा लावा आणि पाहा तुमच्या चेहऱ्यावरची जादू

टोमॅटो थोडे मऊ पडले की मग ते मॅश करून घ्या. चांगले मॅश झाल्यानंतर त्यामध्ये ग्रेव्हीसाठी तुमच्या आवडीप्रमाणे हवे तेवढे पाणी घाला. 

नंतर लाल तिखट, जिरेपूड, धनेपूड, थोडंसं मीठ आणि गूळ किंवा साखर घालून सगळं उकळून घ्या. यानंतर सगळ्यात शेवटी भाजी वाढायच्या वेळी त्यामध्ये शेव घाला. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली की काठियावडी शेव टमाटर तयार. 


 

Web Title : झटपट काठियावाड़ी शेव टमाटर रेसिपी: मिनटों में गुजराती स्वाद

Web Summary : गर्मी को मात दें इस आसान और स्वादिष्ट काठियावाड़ी शेव टमाटर के साथ! इस गुजराती व्यंजन को बनाने में कम समय लगता है और यह केवल 15 मिनट में बन जाता है। बस टमाटर को मसालों के साथ भूनें, ग्रेवी के लिए पानी डालें, और ऊपर से सेव और धनिया डालें। एक आदर्श हल्का और स्वादिष्ट गर्मी का भोजन।

Web Title : Quick Kathiawadi Shev Tamatar Recipe: A Gujarati Delight in Minutes

Web Summary : Beat the summer heat with this easy and flavorful Kathiawadi Shev Tamatar! This Gujarati dish requires minimal prep and cooks in just 15 minutes. Simply sauté tomatoes with spices, add water for gravy, and top with sev and coriander. A perfect light and tasty summer meal.