जया किशोरी (Jaya Kishori) भारतातील एक प्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर आणि गायिका, कथावाचक आहेत. जया किशोरी सुंदर आवाजासाठी आणि प्रवचनांसाठीच ओळखल्या जात नाही तर त्याचं सौंदर्य आणि साधेपणा चर्चेचा विषय ठरतो. त्याचं व्यक्तिमत्व हे प्रमुख आकर्षण असून त्यांचे केस अनेकांना खूप आवडतात. कारण केसांमुळे त्यांच्या सुंदरतेत अधिकच भर पडतो. (What Does Jaya Kishori Apply On Her Hair Jaya Kishori Hair Care Routine Jaya Kishori Hair Secret)
लोकांना उत्सुकता असते की त्या त्यांच्या केसांची काळजी कशी घेतात. जया किशोरी यांनी आपल्या सुंदर केसांबाबत अधिक माहिती दिली आहे. जया किशोरी आपल्या सुंदर केसांसाठी कोणत्याही केमिकल उत्पादनांचा वापर करत नाहीत तर त्या काही नैसर्गिक उत्पादनं वापरतात. ज्यामुळे केस मऊ-मुलायम होतात. केस चांगले राहण्यासाठी कोणतेही महागडे उपाय न करता त्या घरगुती उपाय करण्याला जास्त महत्व देतात.
जया किशोरींच्या सौंदर्याचं गुपित काय?
एलोवेरा
कथा वाचक सुंदर केसांसाठी एलोवेरा जेलचा वापर करतात. एलोवेरा जेल केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे केसांमध्ये नैसर्गिक चमक येते आणि केसांच्या अनेक समस्यांपासून सुटकाही होते.
नारळाचं तेल
केसांमध्ये मॉईश्चर टिकून राहण्यासाठी नारळाचं तेल कोमट करून तुम्ही ते केसांना लावू शकता. नारळात एंटी ऑक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे केसांची वाढ चांगली होण्यास मदत होते.
ग्रीन टी
केसांच्या वाढीसाठी जया किशोरी ग्रीन टी सुद्धा पितात. ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते आणि केसांच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासही मदत होते. लांब काळ्या केसांसाठी जया किशोरी सिंपल हेअर केअर सिक्रेट्स फॉलो करतात. जया किशोरी केसांमध्ये नियमित तेल लावण्याकडे लक्ष जेतात. नारळाचं तेल किंवा बदामाच्या तेलानं हलकी मसाज केल्यानं केसांची मुळं मजबूत होतात आणि केसांमध्ये नैसर्गिक चमक येण्यास मदत होते.
जया किशोरी जास्त केमिकल्स असलेली उत्पादनं आपल्या केसांवर वापरत नाहीत. नॅच्युरल वस्तूंचा वापर त्या आपल्या केसांसाठी बऱ्याच काळापासून करत आहेत. केसांची सुंदरता बाहेरून नाही तर आतून सुद्धा महत्वाची असते. प्रोटीन, फळं आणि हिरव्या भाज्या खाल्ल्यानं केस मजबूत आणि दाट होण्यास मदत होते.
