Raigad: आज शरद पवार रायगडमध्ये, अनंत गीतेच्या प्रचारासाठी माणगाव मोर्बे येथे जाहीर सभा

By राजेश भोस्तेकर | Published: April 23, 2024 08:39 AM2024-04-23T08:39:27+5:302024-04-23T08:41:03+5:30

Maharashtra Assembly Election 2024: इंडिया आघाडीचे ठाकरे सेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या लोकसभा निवडणुकीसाठी आज मंगळवारी २३ एप्रिल रोजी माणगाव मोर्बे येथे सायंकाळी पाच वाजता जाहीर प्रचार सभा होणार आहे. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सभेला प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Maharashtra Assembly Election 2024: Today Sharad Pawar in Raigad, public meeting at Mangaon Morbe to promote Anant Geeta | Raigad: आज शरद पवार रायगडमध्ये, अनंत गीतेच्या प्रचारासाठी माणगाव मोर्बे येथे जाहीर सभा

Raigad: आज शरद पवार रायगडमध्ये, अनंत गीतेच्या प्रचारासाठी माणगाव मोर्बे येथे जाहीर सभा

- राजेश भोस्तेकर 
अलिबाग - इंडिया आघाडीचे ठाकरे सेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या लोकसभा निवडणुकीसाठी आज मंगळवारी २३ एप्रिल रोजी माणगाव मोर्बे येथे सायंकाळी पाच वाजता जाहीर प्रचार सभा होणार आहे. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सभेला प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत. महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या मतदार संघात निवडणूक प्रचाराची पहिलीच सभा शरद पवार घेत असल्याने याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

रायगड लोकसभा मतदार संघात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. अनंत गीते आणि सुनील तटकरे यांच्यात ही लढत होत आहे. इंडिया आघाडीची पहिलीच प्रमुख नेत्यांच्या उपस्थिती जिल्ह्यात जाहीर सभा होत आहे. माणगाव मोर्बे येथील सोशल सोसायटी हायस्कूल मैदानावर ही सभा आज सायंकाळी पाच वाजता होणार आहे. शरद पवार हे या सभेला संबोधित करणार असून इंडिया आघाडीचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत.

श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात सुनील तटकरे यांच्या होम ग्राऊंडवर ही सभा घेतली जात आहे. त्यामुळे शरद पवार हे या सभेत काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. सभेच्या अनुषंगाने इंडिया आघाडीतर्फे पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: Today Sharad Pawar in Raigad, public meeting at Mangaon Morbe to promote Anant Geeta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.