पुण्यातील मोठा पराभव...! तानाजी सावंतांचा मुलगा पराभूत; मोहोळांशी मैत्री, माजी मंत्र्यांनी जंगजंग पछाडले तरीही... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 15:50 IST2026-01-16T15:50:15+5:302026-01-16T15:50:47+5:30

PMC Result 2026 Giriraj Tanaji Sawant defeat : पुणे मनपा निकाल २०२६: प्रभाग ३७ मध्ये किशोर धनकवडे, वर्षा तापकीर, अरुण राजवाडे आणि तेजश्री बदक विजयी. भाजपचा मोठा विजय, तानाजी सावंतांच्या मुलाचा पराभव.

PMC Result 2026 Giriraj Tanaji Sawant defeat: Big defeat in Pune...! Tanaji Sawant's son defeated; Friendship with Mohol, former ministers despite being in trouble... | पुण्यातील मोठा पराभव...! तानाजी सावंतांचा मुलगा पराभूत; मोहोळांशी मैत्री, माजी मंत्र्यांनी जंगजंग पछाडले तरीही... 

पुण्यातील मोठा पराभव...! तानाजी सावंतांचा मुलगा पराभूत; मोहोळांशी मैत्री, माजी मंत्र्यांनी जंगजंग पछाडले तरीही... 

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीत सर्वात लक्षवेधी ठरलेल्या प्रभाग क्रमांक ३७ मध्ये भारतीय जनता पक्षाने 'क्लीन स्वीप' दिला आहे. या निकालाने राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांना मोठा राजकीय धक्का बसला असून, त्यांचे पुत्र आणि शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार गिरीराज सावंत यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.

प्रभाग ३७ मधील भाजपचे विजेते उमेदवार: १. किशोर धनकवडे - (माजी उपमहापौर) विजयी २. वर्षा तापकीर - विजयी ३. अरुण राजवाडे - विजयी ४. तेजश्री बदक - विजयी

गिरीराज सावंत यांचा पराभव चर्चेत
 तानाजी सावंत यांचे चिरंजीव गिरीराज सावंत यांच्यासाठी या प्रभागात शिवसेनेने आणि स्वतः सावंतांनी मोठी ताकद लावली होती. मराठा समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले होते, मात्र मतदारांनी भाजपच्या जुन्या आणि अनुभवी कार्यकर्त्यांना पसंती दिली आहे. भाजपच्या या विजयामुळे धनकवडी-आंबेगाव परिसरात भाजपचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. भाजप आणि शिंदे गट महायुतीत असले तरी पुण्याच्या काही जागांवर ते एकमेकांविरुद्ध लढले होते. प्रभाग ३७ मध्ये भाजपने आपल्या मित्रपक्षाच्या बड्या नेत्याच्या मुलाला पराभूत करून आपली ताकद दाखवली आहे. किशोर धनकवडे आणि वर्षा तापकीर यांच्यासारख्या स्थानिक नेत्यांनी आपला जनसंपर्क कायम राखल्याचे या निकालावरून स्पष्ट होत आहे.

Web Title : पुणे में तानाजी सावंत के बेटे पराजित; भाजपा ने वार्ड जीता।

Web Summary : पुणे में, तानाजी सावंत के बेटे, गिरिराज, नगरपालिका चुनाव हार गए। भाजपा ने वार्ड 37 में क्लीन स्वीप किया, अपनी ताकत और किशोर धनकवडे जैसे स्थानीय नेताओं की लोकप्रियता का प्रदर्शन किया।

Web Title : Tanaji Sawant's son defeated in Pune election; BJP sweeps ward.

Web Summary : In Pune, Tanaji Sawant's son, Giriraj, lost the municipal election despite his father's efforts. BJP secured a clean sweep in Ward 37, showcasing its strength and the popularity of local leaders like Kishore Dhankawade.