वसंत मोरेंच्या प्रभागात मोठा ट्विस्ट! मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांसह बसून; मतदानापेक्षा १०३५ मते कमी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 22:21 IST2026-01-16T22:19:17+5:302026-01-16T22:21:57+5:30
PMC PCMC Result 2026, Vasant More Counting Status : मतमोजणी केंद्रावर कार्यकर्त्यांची गर्दी प्रभाग ३८ मधील महत्त्वाचे उमेदवार वसंत मोरे आणि त्यांचे कार्यकर्ते विजयाच्या आशेने धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय येथील मतमोजणी केंद्रावर ठाण मांडून बसले आहेत.

वसंत मोरेंच्या प्रभागात मोठा ट्विस्ट! मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांसह बसून; मतदानापेक्षा १०३५ मते कमी?
पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत प्रभाग क्रमांक ३८ मधील निकालाने मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. या प्रभागाची अधिकृत आकडेवारी अद्याप निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. सध्या मतमोजणी केंद्रावर सहाव्या फेरीची घोषणा सुरू असून, अद्याप चार फेऱ्यांची मतमोजणी बाकी आहे. त्यामुळे या प्रभागाचा अंतिम कौल नेमका कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
मतमोजणी केंद्रावर कार्यकर्त्यांची गर्दी प्रभाग ३८ मधील महत्त्वाचे उमेदवार वसंत मोरे आणि त्यांचे कार्यकर्ते विजयाच्या आशेने धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय येथील मतमोजणी केंद्रावर ठाण मांडून बसले आहेत. सातव्या फेरीपासून व्यंकोजी खोपडे आणि वसंत मोरे यांच्यात 90 मतांचा फरक होता, मात्र दहाव्या फेरीत १०३५ चा फरक आल्यामुळे वसंत मोरे यांनी आक्षेप घेतली रिकाउंटिंगची मागणी केली आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांनी काल 79 हजार 826 मतदान झाल्याची आकडेवारी प्रसिध्द होती. मात्र आत्ता एकूण 78719 मतदान झाल्याचे दाखवले आहे, तब्बल 1 हजार 35 मते कमी झाल्याचे दिसत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रभाग क्रमांक 38 चे उमेदवार यांनी निवडणुक निकालावर आक्षेप घेत, रेकॉर्डिंगची मागणी केली आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
"जोपर्यंत शेवटच्या फेरीची मतमोजणी पूर्ण होत नाही आणि सर्व तांत्रिक प्रक्रिया पार पडत नाही, तोपर्यंत अंतिम निर्णय सांगता येणार नाही," असे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या सहा फेऱ्या पूर्ण झाल्या असून उर्वरित चार फेऱ्यांमधील मतांची बेरीज निकालाचे पारडे फिरवू शकते.
वसंत मोरे यांची प्रतिष्ठा पणाला
पुण्याच्या राजकारणात फायरब्रँड नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसंत मोरे यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. प्रभाग ३८ हा त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या प्रभागात चौरंगी लढत होण्याची शक्यता असल्याने शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये होणारी मतांची ओढाताण निर्णायक ठरणार आहे. पुढील काही तासांत प्रभाग ३८ चा अधिकृत निकाल जाहीर होण्याची शक्यता असून, तोपर्यंत धनकवडी परिसरात तणावपूर्ण शांतता आणि उत्सुकतेचे वातावरण आहे.