कामाचा माणूस हरला की जिंकला...! अमोल बालवडकरांचे काय झाले? निकाल जाहीर झाला की नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 15:22 IST2026-01-16T15:20:00+5:302026-01-16T15:22:55+5:30

Amol Balwadkar PMC Election Results 2026 : अमोल बालवडकर यांनी भाजपमध्ये उमेदवारी न मिळाल्याने ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला होता.

PMC Election Results 2026 : What happened to the hardworking man, Amol Balwadkar Result? Whether the results were announced or not... | कामाचा माणूस हरला की जिंकला...! अमोल बालवडकरांचे काय झाले? निकाल जाहीर झाला की नाही...

कामाचा माणूस हरला की जिंकला...! अमोल बालवडकरांचे काय झाले? निकाल जाहीर झाला की नाही...

पुण्यातील बहुतांश जागांवरील निकाल हाती आले आहेत. काही जागांवरील निकाल मतमोजणी सुरु असली तरी स्पष्ट झाले आहेत. पुण्यातील सर्वांचे लक्ष लागलेली आणखी एक जागा, कामाचा माणूस अमोल बालवडकरांच्या जागेबाबत अद्याप काहीच समोर आलेले नाही. यामुळे पुणेकरांच्या नजरा या जागेकडे लागले आहेत. तर अमोल बालवडकर यांच्या प्रभागाची मतमोजणी अद्याप सुरु झालेली नाही, यामुळे या जागांचा निकाल येण्यासाठी सायंकाळ उजाडणार आहे. 

प्रभाग क्रमांक ९ (बाणेर-बालेवाडी) मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार अमोल बालवडकर हे उभे राहिले आहेत. अमोल बालवडकर यांनी भाजपमध्ये उमेदवारी न मिळाल्याने ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वासघात केल्याचा आरोप बालवडकर यांनी केला होता. तसेच स्वत:ला कामाचा माणूस म्हणून घोषित केले होते. 

भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी लहू बालवडकर यांच्या विजयाचा मोठा दावा केला होता. या प्रभागाकडे संपूर्ण पुण्याचे लक्ष लागले आहे, कारण येथे 'बालवडकर विरुद्ध बालवडकर' अशी एकाच कुटुंबातील आणि नात्यातील लढत होती.

Web Title: PMC Election Results 2026 : What happened to the hardworking man, Amol Balwadkar Result? Whether the results were announced or not...