PMC Election 2026: गजा मारणे मतदानासाठी शहरात येणार; उच्च न्यायालयाकडून परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 16:57 IST2026-01-13T16:56:36+5:302026-01-13T16:57:50+5:30

- पत्नी राष्ट्रवादीकडून उमेदवार; मारणेच्या हालचालीवर पोलिसांची राहणार करडी नजर

PMC Election 2026 Gaja Marane will come to the city to vote; Permission from the High Court | PMC Election 2026: गजा मारणे मतदानासाठी शहरात येणार; उच्च न्यायालयाकडून परवानगी

PMC Election 2026: गजा मारणे मतदानासाठी शहरात येणार; उच्च न्यायालयाकडून परवानगी

पुणे : महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मकोकाच्या गुन्ह्यातील आरोपी गजानन मारणेला गुरुवारी (दि. १५) व शुक्रवारी (दि. १६) पुण्यात येण्याकरिता उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. गजानन मारणेची पत्नी जयश्री मारणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवीत आहे. त्यामुळे मारणे याच्या हालचालीवर गुन्हे शाखेची नजर राहणार आहे.

कोथरूड येथील आयटी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गजानन पंढरीनाथ मारणे याच्यासह मारणे टोळीच्या दहाजणांवर ‘मकोका’ अन्वये गुन्हा दाखल आहे. त्याविरोधात मारणेने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. त्यानंतर या गुन्ह्यात मारणेला पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यावेळी मारणेने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील निर्णय होईपर्यंत खटल्याच्या सुनावणीच्या तारखेशिवाय पुणे महापालिका हद्दीत प्रवेश करू नये, अशी अट न्यायालयाने घातली आहे.

दरम्यान, गजानन मारणेची पत्नी जयश्री मारणे हिचा निवडणुकीतील प्रचारासाठी, मतदानाचा हक्क बजावण्याकरिता पुण्यात प्रवेशबंदीची अट शिथिल करण्याची विनंती मारणेने पुण्याच्या विशेष न्यायालयाकडे केली होती. मात्र, ही विनंती फेटाळण्यात आल्यानंतर गजानन मारणेने ॲड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली. 'पत्नीला निवडणूक प्रचारासाठी मदत करण्यासाठी; तसेच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शहरात येण्याची परवानगी द्यावी. आरोपीने जामिनाच्या सर्व अटींचे पालन केले आहे,' असा युक्तिवाद ॲड. ठोंबरे यांनी केला. तो ग्राह्य धरत उच्च न्यायालयाने गजानन मारणेला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन दिवस पुण्यात येण्यास परवानगी दिली, असे ॲड. ठोंबरे यांनी सांगितले. 

Web Title : गजा मारणे को पुणे में वोट डालने की अनुमति; अदालत ने दी इजाजत

Web Summary : मकोका मामले में आरोपी गजा मारणे को पत्नी के चुनाव के लिए पुणे में वोट डालने की अदालत से अनुमति मिली। पुलिस उसकी गतिविधियों पर नजर रखेगी।

Web Title : Gaja Marne Allowed to Vote in Pune; Court Grants Permission

Web Summary : Gaja Marne, accused in MCOCA case, gets court permission to vote in Pune for his wife's election. Police will monitor his movements.