Maharashtra Election 2019: Right to vote, despite having no both hands in Parvati assembly constituency | महाराष्ट्र निवडणूक २०१९: दोन्ही हात नसतानाही 'त्यांनी' बजावला मतदानाचा हक्क; तुम्हीही करा मतदान
महाराष्ट्र निवडणूक २०१९: दोन्ही हात नसतानाही 'त्यांनी' बजावला मतदानाचा हक्क; तुम्हीही करा मतदान

पुणे : विधानसभेची निवडणूक आज पार पडत आहे. सकाळपासूनच नागरिकांनी मतदान केंद्रांवर मतदानासाठी गर्दी केली होती. पुण्यातील पर्वती मतदारसंघात सुरेखा खुडे यांना दोन्ही हात नाहीत. तरीही सकाळीच मतदानकेंद्रावर येत त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानकेंद्रातील कर्मचाऱ्यांनी त्यांना मतदान करण्यास मदत केली.

अनेकदा नागरिक मतदानाची सुट्टी मतदानासाठी न वापरता इतर कामासाठी वापरतात. काही लोक मतदान करण्याबद्दल अनास्था दाखवतात. अश्या नागरिकांचे डोळे उघडण्याचे काम खुडे यांनी केले आहे. सकाळीच त्या मतदान केंद्रावर आल्या. त्यांना तेथील कर्मचाऱ्यांनी मतदान करण्यास मदत केली. मतदान केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यांनी इतर लोकांनी सुद्धा घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले. 

दरम्यान 3 वाजेपर्यंत पुण्यात 41 टक्के मतदान झाले होते. लोकसभेला 50 टक्क्यांहून कमी मतदान झाले होते. त्यामुळे पुणेकर लोकसभेपेक्षा अधिक मतदान करतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title: Maharashtra Election 2019: Right to vote, despite having no both hands in Parvati assembly constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.