"मोठे प्रश्न सोडवायचे आहेत तर मोदींचा चेहरा डोळ्यासमोर ठेवा अन् मतदान करा"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 03:05 PM2024-04-17T15:05:05+5:302024-04-17T15:09:19+5:30

या बैठकीत बोलताना अजित पवार यांनी खा. सुप्रिया सुळे यांचा नामोल्लेख न करता टीका केली...

"If you want to solve big issues, keep Modi's face in front of your eyes and vote" | "मोठे प्रश्न सोडवायचे आहेत तर मोदींचा चेहरा डोळ्यासमोर ठेवा अन् मतदान करा"

"मोठे प्रश्न सोडवायचे आहेत तर मोदींचा चेहरा डोळ्यासमोर ठेवा अन् मतदान करा"

इंदापूर (पुणे) : दीर्घकालीन प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी नरेंद्र मोदींचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून मतदान करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि. १७) येथे केले. व्यापारी व वकिलांच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. वाघ पॅलेसमध्ये ही बैठक झाली. या बैठकीत बोलताना अजित पवार यांनी खा. सुप्रिया सुळे यांचा नामोल्लेख न करता टीका केली. ते म्हणाले, गेल्या दहा वर्षांत सत्तेवर असणारांनी सतत पंतप्रधानांवर टीका केली. त्यामुळे केंद्रातील कोणतेही काम बारामती लोकसभा मतदारसंघात, इंदापूर विधानसभा मतदार संघात आले नाही असे सांगत खा. सुळे यांना टोला मारला.

सात मे रोजी पाच वाजल्यानंतर जो तुम्हाला ओळखेल, तुमचे कामे मार्गी लावेल, तुमच्या समस्या सोडवेल, विकासाचे धोरण उभे करेल तालुक्यात विविध नवनवीन संकल्पना आणण्याचा प्रयत्न करेल. मोठ्या संकटात तालुक्यासोबत उभा राहील अशाच उमेदवाराला मतदान करा असे आवाहन पवार यांनी केले.

इंदापूर तालुक्यात नव्या योजना आणण्यात येतील. शहरातील रखडलेली कामे लवकरच मार्गी लागतील. न्यायालयाच्या इमारतीत परिसरात नवीन सुधारणा करण्यात येतील. मुख्यबाजार पेठेमधील रस्ता रुंदीकरण, अतिक्रमणे व विविध विकासाचे विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याची ग्वाही पवार यांनी दिली. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर दर महिन्याला प्रशासनाची बैठक लावून सामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम सुरु करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
   
'ते' तुम्हाला बाहेरचे वाटणार नाहीत घरचे वाटतील-

खासदारांनी आपल्या कामात ढवळाढवळ करु नये अशीच आमदारांची वा आमदार होऊ इच्छिणारांची अपेक्षा असते. मला जो काही चाळीस वर्षांचा अनुभव आहे तो बघता आमचा जो उमेदवार आहे तो योग्य पध्दतीने काम करेल. कामात ढवळाढवळ करतील असे वाटत नाही. ते तुम्हाला बाहेरचे वाटणार नाहीत घरचे वाटतील, या शब्दात अजित पवार यांनी महायुतीच्या उमेदवार सूनेत्रा पवार यांची भलावण करत, शरद पवार यांच्या 'त्या' विधानाचा समाचार घेतला.

'पाहिजे तेवढा निधी देईन. निधी द्यायला आम्ही सहकार्य करु पण आमच्यासाठी मशीनची बटण दाब. म्हणजे मला ही निधी देता येईल नाहीतर माझा हात आखडता येईल'...असे विवादास्पद विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

Web Title: "If you want to solve big issues, keep Modi's face in front of your eyes and vote"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.