'तुला पाहते रे' फेम गायत्री दातार खऱ्या आयुष्यात आहे खूपच एडव्हेंचरस, SEE PICS

Published: May 14, 2021 11:29 AM2021-05-14T11:29:31+5:302021-05-14T11:35:59+5:30

'तुला पाहते रे' ही मालिकेमधून गायत्री दातार लोकप्रिय झाली होती. मालिकेत ईशा आणि विक्रांत सरंजामे यांची अनोखी कहाणी सगळ्यांना पसंत पडली होती.मालिकेनंतर गायत्री दाताराचा प्रचंड मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे.

गायत्री दातारने साकारलेली ईशा निमकरने तर भरभरु रसिकांची पसंती मिळवली.

गायत्री दातारने मालिकेत साकारलेली ईशा निमकर ही अत्यंत साधी आणि सोज्वळ मुलगी होती.

पण खऱ्या आयुष्यात गायत्री स्वतः खूप एडव्हेंचरस आहे.

तिला ट्रेकिंगची तसेच फिरायची खूप आवड आहे.

गायत्रीने मनालीला ट्रेकिंगचा आणि कोयना नदीत रिव्हर राफ्टिंगचा धमाल अनुभव घेतलेला आहे.

गायत्रीने अनेक निर्सगरम्य ठिकाणी भेट दिली आहे त्यातील एक म्हणजे लेह लडाख.

तिचे हे सर्व अनुभव तिने तिच्या सोशल मीडियावर फोटोंच्या रूपात शेअर केले आहेत.

गायत्रीलाही प्रचंड भटकंतीची आवड असल्याचे सोशल मीडियावर नजर टाकल्यास समजते.

सोशल मीडियावर गायत्री प्रचंड सक्रीय असते.

विविध अंदाजातील फोटो शेअर करत चाहत्यांची वाहवा मिळवत असते.

जितका सोज्वळ तितकाच ग्लॅमरस अंदाज पाहून चाहतेही फिदा होतात.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!