ऐतिहासिक भूमिका साकारणाऱ्या स्नेहलताचा बोल्ड अंदाज; फोटो होतायेत तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 05:13 PM2022-05-13T17:13:32+5:302022-05-13T17:17:32+5:30

Snehlata vasaikar: स्नेहलताने संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमात भानू ही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचंही चांगलंच कौतुक करण्यात आलं होतं.

मराठीसह हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे स्नेहलता वसईकर. अनेक विनोदी, ऐतिहासिक मालिकांमध्ये स्नेहलता झळकली आहे.

उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना आपलंसं करणारी स्नेहलता सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं.

फू बाई फूमधून तिने तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र, ऐतिहासिक भूमिकांमुळे तिला खरी लोकप्रियता मिळाली.

स्नेहलताने मराठीसह हिंदी ऐतिहासिक मालिकांमध्येही काम केलं आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’, 'स्वराज्यरक्षक संभाजी' या ऐतिहासिक मालिकांमध्ये ती झळकली आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेली स्नेहलता खऱ्या आयुष्यात प्रचंड बोल्ड असून अलिकडेच तिने तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये तिने दिलेल्या पोझ, एक्स्प्रेशन्स नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. या फोटोमध्ये पहिल्यांदाच इतकी बोल्ड दिसत आहे.

स्नेहलताने संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमात भानू ही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचंही चांगलंच कौतुक करण्यात आलं होतं.

वेस्टर्न असो वा ट्रेडिशनल स्नेहलता प्रत्येक लूकमध्ये छान दिसते.