साडीचं सौंदर्य काही औरच! पाहा,तेजस्विनीच्या साड्यांचं खास कलेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 06:01 PM2021-09-13T18:01:16+5:302021-09-13T18:15:24+5:30

Tejaswini pandit: तेजस्विनीचा तेजाज्ञा हा कपड्यांचा ब्रँडदेखील आहे. त्यामुळे या ब्रँडच्या काही साड्याही ती नेसत असते.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्याच्या जोरावर तेजस्विनी आज अनेकांच्या मनावर राज्य करत आहे. ( फोटो सौजन्य: तेजस्विनी पंडित इन्स्टाग्राम)

'तु ही रे' या चित्रपटातील 'गुलाबाची कळी' या गाण्यामुळे तेजस्विनी विशेष लोकप्रिय झाली.

कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही अॅक्टीव्ह असणारी तेजस्विनी कायमच चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

अनेकदा तेजस्विनी इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर करत असते. यात तिच्या साडीवरील फोटोंना चाहत्यांकडून विशेष प्रेम मिळतं. त्यामुळेच तेजस्विनीच्या साड्यांचं नेमकं कलेक्शन कसं आहे ते पाहुयात.

कलाविश्वात सक्रीय असलेल्या तेजस्विनीला साड्यांची प्रचंड आवड असून ती अनेकदा इन्स्टावर साडीतील फोटो शेअर करत असते.

तेजस्विनीचा तेजाज्ञा हा कपड्यांचा ब्रँडदेखील आहे. त्यामुळे या ब्रँडच्या काही साड्याही ती नेसत असते.

तेजस्विनी साडी नेसून दिलेली सुरेख पोझ

तेजस्विनीच्या साड्यांच्या कलेक्शनमध्ये प्रत्येक प्रकारची आणि वेगवेगळ्या डिझाइन्सच्या साड्या पाहायला मिळतात.

तेजस्विनीने साडीमध्ये शेअर केलेला बोल्ड फोटो

सिंपल साडीमध्ये असलेला तेजस्विनीचा खास लूक

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!