अभी मजा आयेगा ना बिंदू...! रिहानाच्या ट्विटनंतर कंगना राणौत झाली ट्रोल, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 01:41 PM2021-02-03T13:41:17+5:302021-02-03T13:57:07+5:30

जली ना? तेरी जली ना?

दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचा आवाज आता जगभर पसरत आहे. याच शेतकऱ्यांचा आवाज आता प्रसिद्ध सिंगर आणि परफॉर्मर रिहानापर्यंतही पोहोचला आहे. रिहानाने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केले. तिच्या या ट्विटनंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत भडकली. मग काय झाले तर ट्विटरवर मीम्सचा पूर आला.

होय, रिहाना शेतकऱ्यांच्या बाजूने बोलताच, नेटक-यांनी कंगनाला ट्रोल करण्यास सुरूवात केली.

एकापाठोपाठ एक असे मीम्स व्हायरल झालेत. हे मीम्स पाहून हसून हसून पोट दुखेल.

हॉलिवूड पॉप सिंगर रिहानाने भारतातील शेतकरी आंदोलनावर ट्विट केले. यासंदर्भात आपण चर्चा का करत नाही आहोत? असा सवाल तिने केला.

तिचे हे ट्विट पाहून कंगना लगेच अ‍ॅक्टिव्ह झाली. रिहानाच्या ट्विटला तिने लगेच उत्तर दिले.

‘यासंदर्भात यामुळे चर्चा होत नाहीय, कारण हे शेतकरी नाही, तर दहशतवादी आहेत. ज्यांची भारत तोडण्याची इच्छा आहे. म्हणजे चीन सारखे देश आपल्या राष्ट्रावर कब्जा करतील आणि यूएसए सारखी चायनीज कॉलनी तयार करतील. तू शांत रहा मूर्ख. आम्ही तुझ्या सारखे मूर्ख नाही, की आपल्या देशाला विकू,’ अशा शब्दांत कंगनाने रिहानाला फटकारले.

रिहाना कंगनाला उत्तर देणार नाहीच. पण नेटक-यांनी मजेदार अंदाजात कंगनाला उत्तर दिले.

जली ना? जली ना तेरी असे काय काय मीम्स नेटक-यांनी व्हायरल केलेत.

2005 मध्ये रिहानाने ‘म्युझिक आॅफ द सन’ हा तिचा पहिला स्टुडिओ अल्बम तुफान गाजला. अगदी बिलबोर्ड 200 चार्टच्या पहिल्या दहामध्ये पोहोचला होता.

2006 मध्ये रिहानाने ‘ए गर्ल लाइक मी’ या तिच्या दुस-या अल्बमनेही धूम केली. बॅटलशिप आणि ओसियन 8 यासारख्या हॉलिवूडपटात तिने कामही केले.

रिहाना अनेकदा सामाजिक मुद्यांवर बोलताना दिसते. असते. ट्रम्प सरकाराने घेतलेल्या इमिग्रेशन संदभार्तील निर्णयावरही तिने टीका केली होती.