‘Jai Bhim’मध्ये सर्वांना रडवणारी ‘सेंगानी’ आहे तरी कोण? रिअल फोटो पाहून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 05:36 PM2021-11-15T17:36:54+5:302021-11-15T17:52:05+5:30

समाजातील धगधगतं वास्तव दाखवणा-या ‘Jai Bhim’ या चित्रपटात साऊथ स्टार सूर्या लीड भूमिकेत आहे. त्याने यात वकीलाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचा स्टार सूर्या वाटतो. पण या चित्रपटाची खरी स्टार आहे सेंगानी.

अ‍ॅमेझॉन प्राइमवर नुकताच प्रदर्शित झालेला ‘जय भीम’ हा चित्रपट सध्या सिनेप्रेमींच्या मनावर गारूड घालतोय. ‘जय भीम’ हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे.

समाजातील धगधगतं वास्तव दाखवणा-या या चित्रपटात साऊथ स्टार सूर्या लीड भूमिकेत आहे. त्याने यात वकीलाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचा स्टार सूर्या वाटतो. पण या चित्रपटाची खरी स्टार आहे सेंगानी.

आदिवासी जमातीचा राजकन्नू हा तरुण त्याच्यावर पोलिस आणि उच्चजात वर्गाकडून लावल्या गेलेल्या चोरीच्या खोट्या आरोपांचा अत्यंत ठामपणे, प्राणपणानं विरोध करतो. त्याची पत्नी सेंगानी तेवढ्याच निधार्रानं न्यायासाठी झगडते. संगिनीची ही भूमिका लिजोमोल जोस या अभिनेत्रीने साकारली आहे.

राजकन्नू तुरुंगात गेल्यावर कथेचा भार सेंगानीवर पडतो. जो ती उत्तमरित्या पेलते. सूर्या आणि प्रकाशराजसारखे दिग्गज कलाकारांपुढे ती ती काहीशी वेगळी ठरते .

चित्रपटात लिजोमोलने साकारलेली सेंगानी पाहताना अक्षरश: अंगावर शहारे येतात. आज याच लिजोमोलबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

लिजोमोलचे फिल्मी करिअर फार मोठं नाही. 2016 मध्ये Maheshinte Prathikaaram या मल्याळम सिनेमातून तिने आपल्या सिने कारकिर्दीची सुरूवात केली. यानंतर ती अनेक चित्रपटांत झळकली.

‘हनी बी’ हा तिचा सर्वात गाजलेला सिनेमा. याशिवाय Sivappu Manjal Pachai, Theethum Nandrum अशा काही तामिळ सिनेमातही तिने काम केले आहे.

तिच्या पर्सनल लाईफबद्दल सांगायचं तर याचवर्षी 5 ऑक्टोबरला ती अरूण अँथोनीसोबत लग्नबेडीत अडकली.

Read in English

टॅग्स :TollywoodTollywood