‘वेलकम’ चित्रपटातील अक्षय कुमारची मामी आठवते? आता झालाय कमालीचा बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 12:52 PM2022-01-14T12:52:41+5:302022-01-14T12:57:31+5:30

Supriya karnik: परदेस, ताल, जिस देश में गंगा रहता है, वेलकम, वेलकम बॅक अशा जवळपास ५० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांमध्ये सुप्रिया झळकली आहे.

२००७ साली प्रदर्शित झालेला 'वेलकम' हा चित्रपट अनेकांच्या लक्षात असेल. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. अक्षय कुमार, कतरिना कैफ, नाना पाटेकर, अनिल कपूर आणि परेश रावल हे दिग्गज कलाकार या चित्रपट महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले होते.

या दिग्गज कलाकारांच्या यादीत आणखी एका अभिनेत्रीने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ती अभिनेत्री म्हणजे सुप्रिया कर्णिक.

सुप्रियाने या चित्रपटात अक्षय कुमारच्या मामीची भूमिका साकारली होती.

अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकलेल्या सुप्रियाचा सध्या कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. त्यामुळे ही अभिनेत्री कशी दिसते. काय करते असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडतात.

सुप्रियाचा जन्म मुंबईत झाला असून तिला दोन बहिणीदेखील आहेत.चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिका साकारणारी सुप्रिया खऱ्या आयुष्यातदेखील तशीच आहे. अनेकदा तिने छेड काढणाऱ्या मुलांना धडादेखील शिकवला आहे.

कलाविश्वात येण्यापूर्वी सुप्रियाने टायपिस्ट, सेक्रेटरी, कार रिपेअर, शेअर मार्केट, रिअल इस्टेट अशा अनेक क्षेत्रांमध्ये काम केलं आहे. इतकंच नाही तर तिने सौदी अरेबियामध्ये एअर हॉस्टेसचं काम केल्याचही सांगण्यात येतं.

सुप्रियाने शांती, तहकीकात, वो रहनेवाली महालों की, दास्तान, देवी, कानून यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये त्यांना काम केलं आहे. तसंच ‘तिसरा डोळा’ या मराठी मालिकेतही तिने काम केलं आहे.

परदेस, ताल, जिस देश में गंगा रहता है, यादे, राजा हिंदुस्तानी, तुझे मेरी कसम, मुझसे शादी करोगी, आर्यन, वेलकम, दे दना दन, वेलकम बॅक अशा जवळपास ५० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांमध्ये सुप्रिया झळकली आहे.

सुप्रियाचा सध्या कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. पण, ती सोशल मीडियावर सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. सुप्रिया अद्यापही अविवाहित असून आता तिच्यात कमालीचा बदल झाला आहे.