In Pics: लॉकडाऊननंतर दीपिका पादुकोण सर्वात आधी काय करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 11:06 AM2020-07-20T11:06:51+5:302020-07-20T11:18:23+5:30

दीपिका अन् लॉकडाऊन...

अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या जाम चर्चेत आहे. होय, लवकरच दीपिका साऊथ सुपरस्टार प्रभाससोबत दिसणार आहे. तूर्तास दीपिका सेल्फ क्वारंटाईनमध्ये आहे.

दीपिका सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर नेहमी बातचीत करत असते. सोशल मीडियावर तिच्या अनेक पोस्ट व्हायरल होत असतात.

अभिनेत्री नुकताच इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी काही खुलासे दीपिकाने केले आहेत

दीपिकाने चाहत्यांबरोबर केलेल्या या संवादामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरे दिलीत

लॉकडाऊनंतर सर्वप्रथम ती काय करणार, असा प्रश्न एका चाहत्याने तिला केला. यावर तिने सर्वात आधी ती बंगळुरूमध्ये जाऊन माझ्या मॉम डॅडला भेटीन, असे उत्तर दिले.

तुझ्या विचित्र सवयी कोणत्या आहेत, असे एका चाहत्याने विचारले. याचेही उत्तर दीपिकाने हजरजबाबीपणे दिले आहे.

या प्रश्नाचे उत्तर माझा नवरा रणवीर आणि बहिण अनिशा अधिक चांगले देऊ शकतील, असे मजेशीर उत्तर तिने दिले.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास दीपिका लग्नानंतर पहिल्यांदा पती रणवीर सिंगबरोबर ‘83’ या सिनेमामध्ये दिसणार आहे.

दीपिका पादुकोण ‘बाहुबली’ प्रभाससोबत झळकणार आहे. दीपिकाने एक व्हिडीओ शेअर करत यावर शिक्कामोर्तब केले आहे.

हा सिनेमा प्रभासचा 21 वा सिनेमा आहे. त्यामुळे ‘प्रभास 21’ असे या सिनेमाचे नामकरण करण्यात आले आहे. दिग्दर्शक नाग अश्विन हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत.