बॉलिवूड अभिनेत्रींइतक्याच सुंदर आहेत त्यांच्या बहिणी, या क्षेत्रांमध्ये आहेत कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 02:19 PM2020-03-11T14:19:14+5:302020-03-11T14:41:51+5:30

कतरिना कैफची बहीण इसाबेल कैफ लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

अलिया भटची बहीण शाहीन भट ही लेखिका असून I've Never been (Un)Happier हे तिचे पुस्तक प्रकाशित झालेले आहे.

भूमीची बहीण समीक्षा ही हुबेहुब भूमीसारखीच दिसते. तिच्या सोशल मीडियावर आपल्याला भूमीसोबतचे अनेक फोटो पाहायला मिळतात.

दीपिका पादुकोणची बहीण अनिषा ही गोल्ड प्लेअर असून ती आपल्या देशाचे आंतराराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करते.

दिशा पटानीची मोठी बहीण खुशबू ही भारतीय सैन्यात असून ती ऑफिसर पदावर आहे.

जान्हवी कपूरची बहीण खुशी सध्या शिक्षणासाठी परदेशात आहे. ती अनेकवेळा जान्हवीसोबत सार्वजिनिक कार्यक्रमात हजेरी लावते.

कंगना रणौतची बहीण रंगोली चंडेल ही कंगनाची मॅनेजर असून तिचे सगळे काम सांभाळते.

कृति सॅननची बहीण नुपूरने अक्षय कुमारसोबत एका व्हिडिओत काम केले आहे. ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे म्हटले जाते.

तापसी पन्नूच्या बहिणीचे नाव शगुन असून तापसी सोशल मीडियावर तिच्या बहिणीसोबतचे फोटो नेहमीच शेअर करत असते.

यामी गौतमची बहीण सुरीली ही अभिनेत्री असून तिने मीत मिले ना रब्बा या मालिकेत तसेच पॉवर कट या पंजाबी चित्रपटात काम केले आहे.