अतिशय सुंदर आहे सोनू सूदची पत्नी, पाहा त्याच्या संपूर्ण कुटुंबियांचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 17:20 IST2020-05-29T17:20:00+5:302020-05-29T17:20:01+5:30

अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीत मजूरांसाठी देवदूत ठरला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोनूने लॉकडाऊनमुळे अडकलेल्या हजारो स्थलांतरीत मजूरांना त्यांच्या घरी रवाना केले.
सोनूच्या या कामाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. सोशल मीडियावर सोनू ट्रेंड करतोय.
सोनू चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत असला तरी सध्या यामुळे खऱ्या आयुष्यात तो नायक बनला आहे.
सोनूचे खऱ्या आयुष्यात लग्न झाले असून त्याची पत्नी दिसायला खूपच सुंदर आहे. तिचे नाव सोनाली सूद आहे.
सोनाली अनेक सार्वजनिक कार्यक्रमात सोनूसोबत हजेरी लावते.
सोनूला दोन मुलं असून त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटला आपल्याला त्यांचे अनेक फोटो पाहायला मिळतात.
सोनू आणि सोनाली यांचे १९९६ मध्ये लग्न झाले. सोनालीचा चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नाहीये. सोनू इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना त्याची आणि सोनालीची ओळख झाली.
सोनू आणि सोनाली यांचा प्रेमविवाह झाला आहे. सोनू पंजाबी तर सोनाली साऊथ इंडियन आहे. सोनूच्या संघर्षाच्या काळात सोनाली नेहमीच त्याच्या पाठिशी उभी राहिली.
सोनूचा मोठा मुलगा त्याच्यासारखा फिटनेस फ्रिक असून अनेक तास जिममध्ये घाम गाळतो.