Ganesh Chaturthi 2022 : ‘या’ चार राशींवर असते गणरायाची विशेष कृपा, गणेश चतुर्थीला होणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 03:27 PM2022-08-30T15:27:45+5:302022-08-30T15:31:36+5:30

बुधवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे आणि ९ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी. या दरम्यान, काही राशीच्या लोकांवर गणरायाची विशेष कृपा राहणार आहे.

३१ ऑगस्ट रोजी देशभरात गणेश चतुर्थीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी भक्त घरोघरी गणरायाच्या मूर्तीची स्थापना करतात. गणेशोत्सव 10 दिवस साजरा केला जातो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाचं विसर्जन केलं जातं. ज्योतिष शास्त्रानुसार चार राशींवर श्रीगणेशाची विशेष कृपा राहणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी.

मिथुन - मिथुन राशीचे स्वामित्व बुध ग्रहाकडे आहे. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा कालावधी उत्तम ठरण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांसाठी व्यवसाय आणि करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच व्यवसायात एक मोठी डीलही होऊ शकते. कुटुंबात आणि कामाच्या ठिकाणी वातावरण शांत राहिल आणि श्रीगणेशाच्या कृपेने सर्व अडथळे दूर होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शुभ माहिती मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांशीही मधूर संबंध राहतील.

कर्क - कर्क ही चंद्राची रास आहे. चंद्राने आपली चूक सुधारून श्रीगणेशाचे वरदान मिळवले. त्यामुळे कर्क राशीवरही गणेशाची कृपा आहे. या वर्षी गणेश चतुर्थीला चंद्र कन्या राशीत आणि नंतर तूळ राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत गणेशाच्या कृपेने कर्क राशीच्या लोकांना बुद्धिमत्ता आणि कौशल्याचा फायदा होईल. मातृपक्षाकडूनही लाभाची संधी मिळेल. या राशीच्या लोकांना अल्प मुदतीच्या गुंतवणुकीमुळेही फायदा होण्याची शक्यता आहे.

कन्या - कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी हा कालावधी अनुकूल परिणाम देणार आहे. नोकरदार लोकांवर श्रीगणेशाची विशेष कृपा असेल, त्यामुळे त्यांच्या करिअरमध्ये चांगली वाढ होऊ शकते. या काळात भाऊ-बहिणीचे पूर्ण सहकार्य मिळेल आणि संबंधही सौहार्दपूर्ण राहतील. गणेशाच्या आशीर्वादाने तुमच्या कामात येणारे अडथळे दूर होतील आणि प्रगतीचे मार्ग खुले होतील. या काळात तुमचा सामाजिक लोकांशी संवाद वाढेल आणि काही नवीन मित्रही बनतील.

तूळ - या वर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र तूळ राशीत प्रवेश करेल. तूळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. तूळ राशीच्या लोकांवर श्रीगणेशाची कृपा राहील. या कालावधीत तूळ राशीच्या लोकांना लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजूही सुधारु शकते. या कालावधीत अचानक धनलाभही संभवतो. कला आणि रचनात्मक क्षमता विकसित होतील. या राशीच्या कलाकारांना कला सादर करण्याची संधी मिळेल आणि लाभाची संधी मिळू शकते.