नंदिशचे चाललेय काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 16:08 IST2016-06-16T10:38:41+5:302016-06-16T16:08:41+5:30

उतरण फेम नंदिश संधू याने काही दिवसांपूर्वी आपल्या ड्रायव्हरविरोधात पोलिसांमध्ये चोरीची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासणीत या ...

What is going on? | नंदिशचे चाललेय काय?

नंदिशचे चाललेय काय?

रण फेम नंदिश संधू याने काही दिवसांपूर्वी आपल्या ड्रायव्हरविरोधात पोलिसांमध्ये चोरीची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासणीत या तक्रारीत काहीही तथ्य नसल्याचे दिसून आले आहे. नंदिशने केलेल्या तक्रारीत अहमद शेख या त्याच्या ड्रायव्हरने त्याच्या घरातून सव्वा चार लाख रुपये चोरले आहे असे म्हटले आहे. ही घटना जानेवारीच्या सुमारास घडली असे त्याचे म्हणणे आहे. आजही शेख नंदिशसोबतच काम करत आहे. पोलिसात तक्रार झाली तेव्हा शेख नंदिशसोबत मुंबईच्या बाहेर होता. त्यावेळी शेखच्या पत्नीने त्याला फोन करून ही गोष्ट सांगितली. पण याविषयी नंदिशने शेखशी काहीही बोलण्यास नकार दिला. त्यानंतर शेखने नंदिशची पत्नी रश्मी देसाईशी संपर्क साधला असता तिने त्याला मदत करण्याचे आश्वासन दिले. शेखने या प्रकणात त्याला गोवण्यात आल्याचे म्हटले आहे. शेखच्या मते नंदिशचे सध्या एका माजी विश्वसुंदरीसोबत प्रेमप्रकरण सुरू असून तो तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे. ही गोष्ट शेखला माहीत असल्याने त्याने ती रश्मीला सांगू नये यासाठी त्याच्यावर हे आरोप लावण्यात आले असल्याचे त्याचे म्हणणे आहे. 

Web Title: What is going on?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.