‘आयाराम-गयारामां’ची यंदा लाट'; भाजपचा प्रत्येक चारपैकी एक उमेदवार ‘इनकमिंग’वाला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 07:10 AM2024-04-08T07:10:31+5:302024-04-08T07:11:23+5:30

तिकीट नाही, साेडला पक्ष; भाजपचा प्रत्येक चारपैकी एक उमेदवार ‘इनकमिंग’वाला

This year's wave of 'Ayaram-Gayaram'; One out of every four BJP candidates is an 'incoming' candidate | ‘आयाराम-गयारामां’ची यंदा लाट'; भाजपचा प्रत्येक चारपैकी एक उमेदवार ‘इनकमिंग’वाला

‘आयाराम-गयारामां’ची यंदा लाट'; भाजपचा प्रत्येक चारपैकी एक उमेदवार ‘इनकमिंग’वाला

लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राजकारणात ‘आयाराम गयाराम’ हा वाक्प्रचार फार प्रचलित आहे. साधारणत: ६०च्या दशकात त्याचा वापर सुरू झाला. यावेळच्या लाेकसभा निवडणुकीत हा शब्द जास्तच वापरला जात आहे. याचे कारण म्हणजे पक्षांतर केलेल्या उमेदवारांची संख्या खूप जास्त आहे. महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, तेलंगणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये जणूकाही पक्षांतराची लाटच आली आहे. 

यंदाच्या निवडणुकीतील ४१७ उमेदवारांपैकी भाजपच्या ११६ उमेदवारांनी पक्षांतर केलेले आहे. भाजपचा दर चार पैकी एक उमेदवार पक्षांतर केलेला आहे. 

भाजपचे ११६ उमेदवार कुठून आले?
काॅंग्रेस    ३७
बीआरएस    ९
बसप     ८
तृणमूल    ७
बीजेडी     ६
एनसीपी    ६
सपा    ६
अण्णाद्रमुक    ४
आप    २
इतर    ३१
 

भाजप साेडण्यासाठी दिलेली कारणे
nभाजप आता अटलजींच्या काळाप्रमाणे राहिली नाही.
nपक्षात निष्ठा आणि मेहनतीकडे दुर्लक्ष.
nभाजपच्या कथनी आणि करणीमध्ये फरक.
nव्यक्तिविशेषला महत्त्व, कार्यकर्त्यांचे ऐकले 
जात नाही.

काॅंग्रेस साेडण्यासाठी उमेदवारांची कारणे?
nराम मंदिर, सनातन धर्माचा विराेध सहन नाही.
nपंतप्रधान नरेंद्र माेदी आणि राष्ट्रीय विचारधारेने प्रभावित.
nपक्षात एका कुटुंबासमाेर इतर काेणीच नाही. नेत्यांपर्यंत पाेहाेचणे कठीण.
nपक्षातील अंतर्गत लाेकशाही संपली, कार्यकर्त्यांचे ऐकणारे काेणीच नाही.

पक्षांतराचे गणित
n६८.९ टक्के एवढे उमेदवार पक्षांतर केलेले १९७७च्या निवडणुकीत हाेते.
n६६.७ टक्के भाजपचे दलबदलू उमेदवार २०१४ मध्ये विजयी झाले हाेते.
n५६.५ टक्के विजयी उमेदवार भाजपचे हाेते २०१९मध्ये. 
n१४.९ टक्के सरासरी २०१९च्या निवडणुकीत आहे.
n९.५ टक्के प्रमाण काॅंग्रेसच्या उमेदवारांचे हाेते.
n५ टक्के विजयी उमेदवार काॅंग्रेसचे हाेते.
n५.३ टक्के दलबदलू विजयी उमेदवारांचे प्रमाण काॅंग्रेसचे हाेते.
n५.३ टक्के दलबदलू उमेदवारांच्या विजयाचे प्रमाण भाजपमध्ये २०१९ मध्ये. 

Web Title: This year's wave of 'Ayaram-Gayaram'; One out of every four BJP candidates is an 'incoming' candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.